Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Rupees 2000 Note: बँकेत आत्तापर्यंत 2000 रुपयांच्या 'इतक्या' नोटा जमा; सविस्तर माहिती जाणून घ्या

Rupees 2000 Note

Rupees 2000 Note: रिझर्व्ह बँकेने 2 हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेऊन 1 महिना झाला आहे. या एका महिन्यात 2000 रुपयांच्या किती नोटा बँकेत जमा करण्यात आल्या आहेत, याबाबत सविस्तर माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने देशात क्लीन नोट पॉलिसी (Clean Note Policy) राबवण्याचा निर्णय घेतला आणि 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. यापुढे लोकांना 2000 रुपयांच्या नोटा चलनात वापरता येणार नाहीत. मात्र या नोटा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत जवळच्या बँकेमधून बदलून घेता येणार आहेत.

याच नोटांसंदर्भात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Reserve Bank Governor Shaktikanta Das) यांनी रविवारी महत्त्वाची माहिती दिली. ज्यानुसार रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतल्यानंतर एका महिन्यात 2000 रुपयांच्या किती नोटा बँकेमध्ये परतल्या आहेत, याबाबत सांगण्यात आले. त्याबद्दल जाणून घेऊयात.

इतक्या नोटा बँकेत परत आल्या

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Reserve Bank Governor Shaktikanta Das) यांनी सांगितले की, 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एका महिन्यात जवळपास 3.62 लाख कोटी रुपयांच्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त म्हणजेच 2.41 लाख कोटी रुपयांहून अधिक नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत.

आरबीआयच्या कार्यालयात वृत्त संस्थेशी बोलताना शक्तीकांत दास म्हणाले की, 2000 रुपयांच्या 85 टक्के नोटा बँक खात्यात ग्राहकांनी जमा केल्या आहेत. यावरून असे दिसून आले आहे की, लोक नोटा बदलण्याऐवजी बँक खात्यात जमा करत आहेत. तर 15 टक्के लोकांनी बँकेत नोटा बदलल्या आहेत.

या नोटा चलनातून बाद केल्याने अर्थव्यवस्थेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नसल्याचे एसबीआयच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय नोटा बाद केल्याने अर्थव्यवस्थेला गती मिळू शकते आणि चालू आर्थिक वर्षात विकास दर 6.5 टक्क्यांहून अधिक वाढू शकतो असा अंदाज देखील एसबीआयच्या अहवालात मांडण्यात आला आहे.

यापूर्वी 8 जूनला पतधोरण समितीच्या आढाव्यानंतर देण्यात आलेल्या माहितीनुसार 1.8 लाख कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा परत आल्या होत्या. चलनात असणाऱ्या एकूण नोटांपैकी या 50 टक्के नोटा होत्या.

सकारात्मक निकाल लवकरच पाहायला मिळेल

एसबीआयच्या अहवालाबाबत शक्तीकांत दास (Reserve Bank Governor Shaktikanta Das) यांना विचारले असता, 2000 रुपयांच्या नोटा जेव्हा चलनातून बाद करायचा निर्णय घेण्यात आला तेव्हा त्याचा आर्थिक विकासाशी काहीही संबंध नव्हता. या निर्णयाचा परिणाम काय असेल ते नंतर कळेल. मात्र एक गोष्ट खात्रीपूर्वक सांगता येईल की, 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे अर्थव्यवस्थेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. या घटनेचा सकारात्मक निकाल लवकरच पाहायला मिळेल, असे मत त्यांनी मांडले.

Source: hindi.news18.com