Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Power Solar Systems : टाटा पॉवर राजस्थानात उभारणार 1,755 कोटींचा सौर ऊर्जा प्रकल्प!

Tata Power Solar Systems : टाटा पॉवर राजस्थानात उभारणार 1,755 कोटींचा सौर ऊर्जा प्रकल्प!

Tata Power Solar Systems : टाटा पॉवर सौरप्रकल्प उभारणार आहे. यासंबंधीच्या बोलीप्रक्रियेत टाटा पॉवरनं बाजी मारली जवळपास 1,755 कोटी रुपये मूल्य असलेला हा प्रकल्प आहे. टाटा पॉवरची उपकंपनी असलेल्या एनएलसी (Neyveli Lignite Corporation) हा सौरप्रकल्प उभारणार आहे.

सौरऊर्जा निर्मिती (Solar energy) ही काळाजी गरज आहे. विविध कंपन्या सौरऊर्जेची निर्मिती करतात. ऊर्जेचा शाश्वत स्रोत विकसित करण्यावर सध्या भर दिला जात आहे. त्या दृष्टीकोनातून सौरऊर्जेची निर्मिती वाढवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. सरकारकडून विविध उद्योगसमुहांवर ही जबाबदारी देण्यात येते. नुकतीच यासंबंधीची बोलीप्रक्रिया पार पडली. त्यात टाटासारख्या जुन्या आणि विश्वासू उद्योग समुहानंही भाग घेतला होता. टाटा उद्योग समुहाची उपकंपनी असलेल्या एनएलसी इंडियानं या सौरऊर्जेच्या निर्मितीसाठीची बोली जिंकलीय. यासंबंधीच्या कामाला आता लवकरच सुरुवात होणार आहे.

6 ट्रिलियन टन कार्बन डायऑक्साइड कमी करण्याचं लक्ष्य

राजस्थानातल्या बिकानेर जिल्ह्यात हा प्रकल्प उभारला जाणार आहे. इथल्या बारसिंगरमध्ये एनएलसी इंडियासाठी हा 300 मेगावॅटचा अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पातून 750 दशलक्ष युनिट्सपेक्षाही जास्त सौर ऊर्जेची निर्मित करण्याचं कंपनीचं लक्ष्य असणार आहे. या माध्यमातून जवळपास 6 ट्रिलियन टन कार्बन डायऑक्साइड कमी करण्याचं आमचं लक्ष्य आहे, असं कंपनीनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

18 महिन्यांच्या आत  सुरू होणार प्रकल्प

टाटा पॉवर सोलर सिस्टीम लिमिटेड (TPSSL) ही डिझायनिंगसह कमिशनिंग आणि इतर कामांची जबाबदारी सांभाळणार आहे. या पूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी आणि डिलिव्हरी पॉइंटपर्यंत इव्हॅक्युएशन सिस्टम हाताळणार आहे. पुलिंग सब स्टेशनच्या 220 KV बाजूंचा यात समावेश आहे. व्यावसायिक ऑपरेशन घोषित झाल्यानंतर TPSSL या प्रकल्पाचे तीन वर्षांसाठी ऑपरेशन आणि देखभालही करणार आहे. प्रकल्पासंबंधीचं पत्र मिळाल्यापासून 18 महिन्यांच्या आत हा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. हा प्रकल्प मिळवल्यानंतर EPCअंतर्गत कंपनीचा सौर पोर्टफोलिओमध्ये वृद्धी झालीय. तो 11.5 GWpवर पोहोचलाय. तर टीपीएसएसएलचे एकूण ऑर्डर बुक सुमारे 17,000 कोटी आहे.

न संपणारी ऊर्जा

सूर्यापासून निघालेल्या किरणांपासून तयार होणारी ही ऊर्जा म्हणजेच सौरऊर्जा. सध्याच्या काळात इंधनाचे कमी होत असलेले साठे, इंधन दरात सातत्यानं होत असलेली वाढ यामुळे ऊर्जेचा शाश्वत स्रोत गरजेचा आहे. संपत चाललेली खनिज संपत्ती, अणू ऊर्जा आणि त्यातले धोके या सर्वांचा विचार करता सौरऊर्जा हा सुरक्षित आणि न संपणारा स्रोत आहे. आपल्या देशात सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकते. कारण वर्षातला बहुतांश काळ सूर्यप्रकाश आपल्याकडे उपलब्ध होतो. त्यामुळे त्याचा योग्य तो वापर करण्याला प्राधान्य असायला हवे.

टाटा पॉवरविषयी...

टाटा पॉवर सोलर सिस्टीम लिमिटेड ही कंपनी सौरऊर्जेची निर्मिती करणार आहे. टाटा पॉवर ही टाटा समुहाचीच एक उपकंपनी आहे. या माध्यमातून विजेची निर्मिती, पारेषण त्याचप्रमाणे वितरण केलं जातं. टाटा पॉवरमार्फत मुंबईतल्या बेस्टला वीजपुरवठा केला जातो. औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठीही विजेची उपलब्धता टाटा पॉवरमार्फत होते. टाटा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय म्हणून 1910साली कंपनीची सुरुवात झाली. ही कंपनी 1916मध्ये आंध्र व्हॅली पॉवर सप्लायसोबत विलीन झाली. महाराष्ट्रात विविध ठिकाणी कंपनीनं प्रकल्प सुरू केले. सुरुवातीच्या काळात 1915 मध्ये खोपोलीत 72 मेटावॅट, 1919मध्ये भिवपुरीत 75 मेगावॅट, 1922मध्ये भिरा याठिकाणी 300 मेगावॅट अशा विविध ठिकाणी प्रकल्प उभारणी कंपनीतर्फे करण्यात आली.

42,576 कोटींचा व्यवसाय 

आर्थिक वर्ष 2022मध्ये कंपनीनं 42,576 कोटींचा व्यवसाय केला होता. टाटा पॉवर सोलर, टाटा पॉवर दिल्ली वितरण लिमिटेड, टीपी सेंट्रल ओडिशा वितरण लिमिटेड, ओडिशाची वेस्टर्न इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी, ओडिशाची नॉर्थ ईस्टर्न वीज पुरवठा कंपनी, टीपी सदर्न ओडिशा वितरण लिमिटेड, टीपी अजमेर डिस्ट्रिब्युशन लिमिटेड, टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड, टाटा पॉवर ट्रेडिंग कंपनी लिमिटेड अशा विविध उपकंपन्या याअंतर्गत काम करतात. आता एनएलसी राजस्थानात सौरऊर्जा प्रकल्प सुरू करणार आहे.