नवीन वर्षात म्युच्युअल फंडांच्या 15 न्यू फंड ऑफर्स बाजारात दाखल होणार आहेत. यातील बहुतांश योजना न्यू फंड ऑफर आणि इंडेक्सआधारित डेट फंडांच्या योजना आहेत. यामुळे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीची सुरुवात करणाऱ्या गुंतवणूकदारांना नवीन पर्याय उपलब्ध होणार आहेत.
जानेवारीत खुल्या होणाऱ्या 15 नवीन फंड योजनांमध्ये 4 योजना इक्विटी आणि हायब्रीड फंड योजना आहेत. उर्वरित फंड योजना डेट फंडाच्या आहेत. यापैकी एसबीआय एफएमपी 74 आणि एसबीआय एफएमपी 75 हे दोन फंड खुले झाले असून यामध्ये 9 जानेवारी 2023 गुंतवणूक करता येईल. यूटीआय क्रिसिल एसडीएल मॅच्युरिटी जून 2027 इंडेक्स फंड देखील खुला झाला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सहा एनएफओ खुले झाले आहेत.
टाटा म्युच्युअल फंड, आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड यांच्याकडून हायब्रीड आणि इक्विटी फंड जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात खुल्या होणार आहेत. त्याशिवाय एचएसबीसी म्युच्युअल फंड, टाटा म्युच्युअल फंडाकडून मल्टीकॅप फंड योजना याच महिन्यात खुल्या होणार आहेत. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड कंपन्यांची आणि त्या योजनेच्या कामगिरीचा आढावा घेणे आवश्यक आहे.
टाटा निफ्टी जी-सिक्युरिटीज डिसेंबर 2029 इंडेक्स फंड 3 जानेवारी रोजी खुला झाला असून 10 जानेवारीपर्यंत गुंतवणूक करता येईल. अॅक्सिस क्रिसिल आयबीएक्स 5050 गिल्ट प्लस एसडीएल जून 2028 इंडेक्स हा म्युच्युअल फंड 5 जानेवारी रोजी खुला होणार असून तो 16 जानेवारी रोजी बंद होईल.एचडीएफसी लॉंग टर्म ड्युरेशन डेट फंड 6 जानेवारी रोजी खुला होणार असून यात 17 जानेवारी 2023 रोजी बंद होईल.