Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cryptocurrency Fraud: मुंबईतील महिलेचे क्रिप्टो अकाऊंट हॅक करून, चोरले 12 लाख!

Cryptocurrency Fraud

Cryptocurrency Fraud: सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता मुंबईतील महिलेचे क्रिप्टो अकाऊंट हॅक करून त्यातील 12 लाख रुपये चोरले असल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे कोणतेही ऑनलाईन व्यवहार करताना सुरक्षा बाळगली पाहिजे.

Cryptocurrency Fraud: डिजिटल करन्सी, क्रिप्टोची दरदिवशी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चा होत असते. मागील वर्ष क्रिप्टोसाठी विशेष नव्हते, मात्र तरी क्रिप्टोकरन्सीद्वारे कमाई करावी म्हणून अनेकांनी यात पैसे गुंतवले. ठाण्यातील गुंतवणुकदार महिलेचे क्रिप्टो अकाऊंट हॅक झाले आणि त्यातील 12 लाख रुपये चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा क्रिप्टोच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.

महाराष्ट्रातील ठाणे शहरात, 37 वर्षीय महिलेचे क्रिप्टोकरन्सी खाते प्रथम कोणीतरी हॅक केले. त्या खात्यातून 15 हजार 97  युएस डॉलर म्हणजे, सुमारे 12 लाख रुपये चोरले, ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना 1 नोव्हेंबर रोजी घडली होती, परंतु त्या व्यक्तीने आधी अॅपवर तक्रार दाखल केली, तेथे दाद न मिळाल्याने शेवटी पोलीस ठाण्यात नुकतीच तक्रार दाखल केली आहे.

श्रीनगर पोलिसांनी शनिवारी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 420 फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला. क्रिप्टो अकाऊंटधारक महिलेच्या तक्रारीच्या आधारे कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास सायबर सेलकडे सोपवण्यात आला असून, सायबर सेल पुढील तपास करणार आहे.

मुंबईतील कांदिवली येथे राहणारी तरुणी 1 नोव्हेंबर रोजी ठाण्यात काही कामानिमित्त गेली होती. त्याच वेळी, कोणीतरी त्यांचे क्रिप्टो खाते ऑनलाइन हॅक केले आणि त्यातून सुमारे 12 लाख रुपये गायब झाले. नंतर ही रक्कम थेट एका कंपनीच्या बँक खात्यात वर्ग केल्याचे आढळून आले आहे.

पीडीत महिलेने दोन महिने उलटल्यावर तक्रार दाखल केल्याने, तपासात काही अडचणी येऊ शकतात. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल किंवा करणार असाल तर सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचे क्रिप्टो खाते सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता,  असेही पोलिसांनी सांगितले आहे.

काय काळजी घ्यावी?

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सुरक्षित अॅपची निवड करावी. मोबाईलमध्ये सिक्युरीटी सिस्टीम इन्स्टॉल करावी. तसेच आपले पासवर्ड, ओटीपी कोणासाोबतही शेअर करू नयेत. क्रिप्टोच्या अकाऊंटला सिक्युरीट पासवर्ड ठेवावा. तसेच फोनचे सेल्फ रेकॉर्डींग बंद ठेवावे. कोणतेही ट्रान्झॅक्शन करताना सुरक्षित ठिकाणी तसेच सुरक्षित इंटरनेटसह करावे. सार्वजनिक इंटरनेटचा वापर करून व्यवहार करणे टाळावे, असे सायबर तज्ज्ञ महेश पाटील यांनी सांगितले.