शिबा इनू (Shiba Inu) ही क्रिप्टोकरन्सी क्रिप्टोमार्केटमध्ये बऱ्याच काळापासून टिकून आहे. 2023 पासून याच्या मीम कॉईनमुळे याची क्रिप्टो मार्केटमधील रेलचेल अंदाजे 40 टक्क्यांनी वाढली. दरम्यान, शिबा इनूचे क्रिप्टोकरन्सी मार्केटमधील एका मोठ्या भागात वर्चस्व आहे. गुंतवणूकदारांसाठी शिबा इनू हा एक उत्तम पर्याय ठरत असल्यामुळे त्याची लोकप्रियता अजून टिकून आहे.
शिबा इनूची वाढती लोकप्रियता लक्षात घेता शिबा इनू कॉईनचा (Shiba Inu Coin) व्यापार कोठे करता येईल, याबद्दल काही शिबा इनू कॉईनची सर्वाधिक संख्या असलेल्या गुंतवणूकदारांमध्ये खलबते सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून अनेक व्यवसायिकांनी 2023 पासून शिबा इनूचा पेमेंट म्हणून स्वीकार करण्यास सुरुवात केली आहे. ही सुरूवात कुठे सुरू झाली आहे; याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. अर्थात हे पर्याय भारतात नाही तर परदेशात उपलब्ध असणार आहेत. कारण भारतात अजूनही क्रिप्टोकरन्सीबाबत सरकारने अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. त्यात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांता दास (Shaktikanta Das, Governor, RBI) यांनी जाहीररीत्या आगामी अर्थसंकल्पात क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालावी अशी मागणी केली.
Table of contents [Show]
सर्व प्रकारची खाद्यपदार्थ (All Foods)
रोख रक्कम किंवा इतर इतर वेगवेगळ्या पेमेंट पद्धतीचे पर्याय ग्राहक वापरत आहेत. आता त्यांना त्यात काहीही नाविन्य वाटत नाही. त्यामुळे आता नक्कीच क्रिप्टोकरन्सी देवाण-घेवाणीची वेळ आली आहे, असे अनेकांना वाटते. कारण क्रिप्टोकरन्सीने खरेदी करणे लोकांना आवडू शकते. त्यामुळे आता सरसकट किराणा सामानाचे पैसे शिबा इनू नाण्याने देखील दिले जाऊ शकतात! शिबा इनूने पेमेंट करण्यासाठी कोणत्याही पेमेंट अॅप्लिकेशन वापर केला जाऊ शकतो.
गेम्सटॉप (Gamestop)
गेमस्टॉपवर शिबा इनू कॉईन स्वीकारण्यास यापूर्वीच सुरुवात झाली आहे. Shiba Inu Token आणि Gamestop हे शिबा इनू कॉईनचे मूल्य वाढवण्यासाठी उत्तम पर्याय ठरत आहे.
नॉर्डस्ट्रॉम (Nordstrom)
अमेरिकेतील आणखी एक प्रसिद्ध रिटेलर नॉर्डस्ट्रॉम (Nordstrom). जो आता शिबा इनू टोकनचा पेमेंट म्हणून स्वीकार करू लागला आहे. अनेक पेमेंट ॲप्लिकेशन्सने जाहीर सुद्धा केले आहे की, ग्राहक त्यांच्या स्मार्टफोन फोनचा वापर करून शिबा इनू कॉईनने पेमेंट करू शकतात.
पेटको (Petco)
शिबा इनू क्रिप्टो कॉईनचा वापर करून क्रिप्टोकरन्सीचा वापर करणारे Petco वरून त्यांच्या प्राण्यांसाठी (Pet) खाण्याचे पदार्थ ऑर्डर करू शकतात. यामध्ये कुत्रा, मांजरी, पक्षी आणि इतर बऱ्याच प्राण्यांसाठी तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर काही छोटे-छोटे प्राणी विकतही घेऊ शकता. त्याचबरोबर Petco डॉग ट्रेनिंग, मेडिकल सर्व्हिसेसही देते. त्याचा फायदा घेता येऊ शकेल.
अमेरिकन कॅन्सर सोसायटी (American Cancer Society)
अमेरिकन कॅन्सर सोसायटी ही कर्करोगाचे उच्चाटन करण्यासाठी काम करणारी संस्था आहे. या संस्थेने लोकांकडून निधी गोळा करण्यासाठी शिबा इनू कॉईन स्वीकारण्यास सुरूवात केली. म्हणजे एखाद्याकडे नियमित चलनातील पैसे नसतील तर तो शिबा इनू क्रिप्टोकॉईनचा वापर करून देणगी देऊ शकतो.
होस्टकी (Hostkey)
होस्टकीद्वारे खाजगी क्लाऊड सोल्यूशन्ससारख्या वेब सर्व्हिसेस दिल्या जातात. नेदरलॅण्ड आणि अमेरिकेमध्ये या कंपनीचे सर्व्हर आहेत. या कंपनीने पेमेंट म्हणून शिबा इनू क्रिप्टोकॉईन स्वीकारण्यास सुरूवात केली.
ॲपमेक्स (APMEX)
APMEX ही अमेरिकेतील मौल्यवान धातू जसे की, सोने, चांदी, प्लॅटिनम, हिरे आदींची ऑनलाईन विक्री करणारे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मने खरेदी करताना ग्राहकांकडून शिबा इनू स्वीकारण्यास सुरूवात केली. कंपनीचे अॅप Apple Store आणि Play Store दोन्हीवर उपलब्ध आहे.
स्लिंग (Sling)
स्लिंग ही ऑनलाईन प्रक्षेपण करणारी अमेरिकेतील कोलोरॅडो येथील कंपनी आहे. स्लिंग टीव्हीद्वारे लाईव्ह कार्यक्रम केले जातात आणि त्याचे प्रक्षेपण अमेरिकेपुरतेच होते. अमेरिकेत यांचे सुमारे 2.5 दशलक्ष ग्राहक आहेत. तर या कंपनीनेही व्यवसायाच्या देवाण-घेवाणीसाठी शिबा इनूचा वापर करण्याचा सुरूवात केली आहे.
डेव्हिड एसडब्ल्यू (DavidSW)
डेव्हिड एसड्ब्ल्यू हे ट्रस्टेड ऑनलाईन लक्झरी घड्याळे विकणारे प्लॅटफॉर्म आहे. यांनी आपल्या व्यवहारात शिबा इनूचा वापर करण्यास सुरूवात केली. खरेदीदार शिबा इनूचा वापर करून DavidSW मधून आपल्या पसंतीच्या घडाळ्यांची खरेदी करू शकतात.
जोमाशॉप (Jomashop)
Jomashop हे एक फॅशन रिटेलर आहे; आणि याची स्थापना 1987 मध्ये झाली आहे. Jomashop मध्ये हॅण्डबॅग्ज, दागिने, चष्मा, दागिने आणि इतर असंख्य वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या वस्तू शिबा इनू क्रिप्टोकॉईनचा वापर करून खरेदी करता येऊ शकतात.
स्त्रोत: https://bit.ly/3WJHnRl