Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Shiba Inu Cryptocurrency: शिबा इनू मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी

Shiba Inu Cryptocurrency: शिबा इनू मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी

Shiba Inu Cryptocurrency: डोजेकॉइन ही एक व्यंगात्मक करन्सी होती. क्रिप्टोकरन्सीबद्दल संपूर्णपणे समजून न घेता लोक कशा प्रकारे ती विकत घेतात हे दाखवण्यासाठी ती सुरू करण्यात आली होती.

Shiba Inu Cryptocurrency: शिबा इनू ज्याला क्रिप्टो मार्केटमध्ये शिबा टोकन म्हणून ओळखले जाते. ही एक प्रकारची क्रिप्टो करन्सी असून ऑगस्ट, 2020 मध्ये रयोशी नावाच्या एका माणसाने ती तयार केली. शिबा इनू ही जपानमधील कुत्र्यांची एक जात आहे; त्याचाच फोटो शिबा इनूच्या कॉईनवर देण्यात आला आहे.

शिबा इनू म्हणजे काय?

शिबा टोकन हे ऑगस्ट 2020 मध्ये रयोशी नावाच्या एका अज्ञात माणसाने तयार केलेली क्रिप्टोकरन्सी आहे. या करन्सीचे नाव “शिबा इनू” या जपानमधील कुत्र्याच्या एका ब्रीडवर आधारित असून त्याचे चित्र डॉजेकॉइनच्या चिन्हावर होते. डोजेकॉइन आणि शिबा इनू हे दोन्ही कॉइन एक गंमतीचा भाग म्हणून सुरू झाले होते.

शिबा इनू हे इथेरियम ब्लॉकचेनवर निर्मित इआरसी-20 अल्टकॉइन आहे. या टोकनच्या माहितीपत्रकात असे म्हटले आहे की, वेगवेगळ्या गोष्टींसाठी पर्यावरणपूरक 3 टोकनची स्थापना करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यातील इतर दोन टोकनची नावे लीश आणि बोन अशी आहेत. या टोकनसाठी शिबास्वॅप नावाचे एक एक्सचेंज देखील तयार केले आहे.

शिबा इनू कॉइन इतके लोकप्रिय का आहे?

डोजेकॉइननंतर लोकप्रियता मिळवणाऱ्या अनेक पाळीव प्राण्यांच्या नावाच्या कॉइनपैकी शिबा टोकन एक आहे. डोजेकॉइन ही एक व्यंगात्मक करन्सी होती. संपूर्णपणे न समजून घेता लोक क्रिप्टोकरन्सी कशा प्रकारे विकत घेतात हे दाखवण्यासाठी ती सुरू करण्यात आली होती. डोजेकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यापासून जे वंचित राहिले होते ते पुढच्या डोजेकॉनची वाट पाहत होते. याचमुळे ही क्रिप्टोकरन्सी प्रचंड लोकप्रिय झाली.

भारतात शिबा इनू कॉइन विकत घेण्याची पद्धत

शिबा इनू कॉइनचे लिस्टिंग करणारे फारसे एक्सचेंज प्लॅटफॉर्म भारतात नाहीत. भारतीय रुपयांत व्यापार करण्याकरिता क्रिप्टोकरन्सीचे लिस्टिंग देणाऱ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांद्वारे तुम्ही शिबा इनू कॉइनची खरेदी करू शकता.