Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Shinde Fadnavis Government: शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्ती; वर्षभरात घेतले हे फायद्याचे निर्णय

Shinde Fadnavis Government 1 Year Complete

Image Source : www.hindustantimes.com

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला शुक्रवारी (दि. 30 जून) एक वर्ष पूर्ण झाले. या नवीन सरकारने राज्यातील जनतेसाठी कोणत्या योजना दिल्या? काय सोयीसुविधा दिल्या? एकूणच नागरिकांना या सरकारकडून काय मिळाले हे आपण पाहणार आहोत.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला शुक्रवारी (दि. 30 जून) एक वर्ष पूर्ण झाले. यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारमधील भागीदार असलेल्या शिवसेनेची साथ सोडून वेगळा गट निर्माण करून एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर राज्यात सरकार स्थापन केले. त्या सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले.

या वर्षभरात शिंदे-फडणवीस सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बरीच राजकीय खडाजंगी झाली. तो मुद्दा सोडून या नवीन सरकारने राज्यातील जनतेसाठी कोणत्या योजना दिल्या? काय सोयीसुविधा दिल्या? एकूणच नागरिकांना या सरकारकडून काय मिळाले हे आपण पाहणार आहोत.

शिंदे-फडणवीस सरकारने नागरिकांच्या हिताचे घेतलेले निर्णय

75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास

महिलांना एसटीच्या तिकिटात 50 टक्के सवलत

दिवाळी आणि आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांना 100 रुपयांत आनंदाच्या शिधा वाटप

देशाच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त राज्यात 75,000 नोकर भरतीचा निर्णय

राज्यात 7,231 पोलिसांची पदे भरणार

आषाढी एकादशीच्या वारी सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना सुरू

राज्यात 700 ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू

पेट्रोल आणि डिझेलच्या करात अनुक्रमे 5 आणि 3 रुपयांची कपात

केंद्राच्या किसान सन्मान योजनेत 6 हजार रुपयांची भर घालून राज्यातील शेतकऱ्यांना 12 हजार अनुदान देणार

नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान

अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मदतीत वाढ; एनडीआरएफच्या दुप्पट रक्कम देणार

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 3 हेक्टर शतजमिनीपर्यंत सरकार करणार मदत

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील मदत 1.50 लाखावरून 5 लाख रुपये केली

राज्यातील 12 कोटी नागरिकांना मिळणार जन आरोग्य योजनेचा लाभ 

मागील वर्षभरात सरकारने तसे बरेच महत्त्वाचे निर्णय घेतले. सरकारने बजेटच्या माध्यमातूनही अनेक घोषणा केल्या आहेत. त्यातील काही घोषणांची पूर्तता देखील सरकार करत आहे.