निखिल कामत (Nikhil Kamath) यांची गणना देशातील सर्वात तरुण अब्जाधीशांमध्ये केली जाते. देशातील सर्वात मोठी ब्रोकरेज आणि ट्रेडिंग फर्म झिरोधाचे (Zerodha's Nikhil Kamath) ते सह-संस्थापक आहेत. निखिल कामत (35) हा घटस्फोटित आहे. त्याने एप्रिल 2019 मध्ये अमांडा नावाच्या महिलेशी लग्न केले पण 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला करत आहेत डेट
झिरोधाचे को-फाऊंडर अब्जाधीश निखिल कामथ आणि माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर एकमेकांना डेट करत आहेत. असा दावा एका वृत्तपत्राच्या वृत्तात करण्यात आला आहे. दरम्यान, एक फोटोही समोर आला आहे ज्यामध्ये ते ऋषिकेशमध्ये एकत्र पूजा करताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 35 वर्षीय निखिल कामत आणि 25 वर्षीय मानुषी 2021 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल काहीही सांगितले नाही. या बातमीमुळे दोघांच्याही कमाईची चर्चाही रंगली आहे.
निखिल कामत यांचे नेटवर्थ
आज निखिल कामत यांची गणना देशातील श्रीमंतांमध्ये केली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांची संपत्ती 17,500 कोटी रुपये आहे. 2022 च्या हुरुन इंडिया 40 आणि अंडर सेल्फ मेडच्या गणनेत त्याला अव्वल स्थान मिळाले. फोर्ब्सच्या 2020 च्या यादीतील टॉप 100 मध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. निखिलने त्याचा भाऊ नितीन कामत यांच्यासोबत 2010 साली 'झिरोधा'ची सुरुवात केली. त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी कॉल सेंटरमध्ये काम करून करिअरला सुरुवात केली. तेथे त्यांचा पगार आठ हजार रुपये होता.
मानुषी छिल्लरची संपत्ती
मानुषी मिस वर्ल्ड झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिची संपत्ती 3 दशलक्ष डॉलर आहे. तिची सॅलरी 24 लाख रुपये आहे. मानुषीला गाड्यांची खूप आवड आहे, तिच्याकडे मर्सिडीज बेंझ आणि रेंज रोव्हर सारख्या आलिशान गाड्या आहेत.