Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Daily hacks शिकण्यासाठी 56 टक्के महिला वापरतात YouTube! - Oxford Economics चा अहवाल

Oxford Economics Research Reports

YouTube India: गुगल फॉर इंडिया (Google for India) हा युट्यूबचा (YouTube) इव्हेंट नुकताच नवी दिल्ली येथे पार पडला. या इव्हेंटमध्ये ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सने (Oxford Economics) 2021 वर्षातील युट्यूब क्रिएटर, युजर, व्हिडीओ आणि त्यांचे विषय यावर संशोधन केले होते. या संशोधन अहवालात युट्यूब इंडियाविषयी नेमके काय म्हटले आहे हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

Report on YouTube India 2021: भारतात 1 कोटीहून अधिक युट्यूब चॅनल (YouTube channels) आहेत, तर 47.7 कोटी अॅक्टीव्ह वापरकर्ते आहेत. आज युट्यूब क्रिएटर (YouTube Creator) भारताच्या जीडीपी (GDP) मध्ये 10 हजार कोटींचे योगदान देत आहेत, असे ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या  (Oxford Economics) अहवालात म्हटले आहे. हा अहवाल नुकत्याच झालेल्या, युट्यूबच्या गुगल फॉर इंडिया (Google for India) या इव्हेंटमध्ये युट्यूब साऊथ ईस्ट एशियाचे संचालक अजय विद्यासागर यांनी सादर केला.

भारतात, 4 हजार 500 हून अधिक चॅनेलचे 10 लाखांहून अधिक सबस्क्राईबर (subscribers) आहेत, ज्यांची कमाई वार्षिक कमाई 1 लाख किंवा त्याहून अधिक आहे. या युट्यूब चॅनलची कमाई वर्षागणिक 60 टक्क्यांनी वाढत आहे. युट्यूब क्रिएटरनी 2020 मध्ये 6 हजार 800 कोटींचे योगदान भारताच्या जीडीपी (GDP) मध्ये  दिले होते. तर, 2021 मध्ये 10 हजार कोटींचे योगदान दिले. हे योगदान 7 लाख 50 नोकऱ्यांच्या बरोबरीचे आहे. 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये झालेली वाढ ही तब्बल 47 टक्क्यांची आहे. युट्यूब (YouTube) ने 2021 मध्ये फक्त आरोग्य विषयांवरील व्हिडिओवर 30 अब्ज पेक्षा जास्त व्ह्यूज नोंदवले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील हॉस्पिटल, आरोग्य संस्था ज्या YouTube वर Content पुरवतात त्या 100 हून अधिक क्रिएटरसोबत युट्यूब सलग्न होणार आहे, युट्यूबने त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

Oxford Economicsच्या संशोधन अहवालात कोणती निरिक्षणं नोंदवली?

ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्स (Oxford Economics) ने 2021 मध्ये  युट्यूब (YouTube) च्या प्रभावाचे विश्लेषण करण्यासाठी 4 हजार 21 YouTube वापरकर्ते, 5 हजार 633 क्रिएटर आणि त्यावरील विविध 523 व्यवसायांचे किंवा विषयांच्या सेक्टरचे सर्वेक्षण केले. या सर्व्हक्षणानुसार,  सध्या अॅक्टीव्ह (Active) असलेल्या प्रत्येक दोन युजर (Users) पैकी एक युजर (User) त्याचे करिअर पुढे नेण्यासाठी नवे कौशल्य शिकण्यासाठी व्हिडीओची मदत घेत आहेत. तर 45 टक्के युजर (User) हे नवी नोकरी मिळवत असून, नोकरी मिळवण्यासाठीच ते विशिष्ट कौशल्य युट्यूबच्या माध्यमातून शिकत आहेत.

युट्यूब हे ग्लोबल रिसोर्स (Global Resource) असून याकडे पालक, विद्यार्थी आणि शिक्षक एक हे शिकण्यासाठीचे फायदेशीर आणि पारंपरिक शिक्षण पद्धतीला पूरक माध्यम समजत आहे, असे मत 13 वर्षाखालील मुलांसाठी युट्यूब किड्स (YouTube Kids) वापरणारे 83 टक्के पालक,  ७६ टक्के शिक्षक आदींचे आहे.

दैनंदिन आयुष्यातील लहान - मोठ्या गोष्टी शिकण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठीचे हॅक्स (Hacks) पाहण्यासाठी मुख्यत्वे स्त्रिया युट्यूब निवडतात. 56 टक्के महिला युजर (User) म्हणतात की युट्यूब (YouTube) हे दैनंदिन जीवनात मदत करणारी कौशल्ये शिकण्यास सहाय्य करतात. विशेषत: महिला टायर बदलणे, वैयक्तिक वित्तविषयक सल्ले, प्रेरक सल्ला, उपयुक्त व्यावसायिक कौशल्ये, छंदातून कमाई कशी करावी, करिअर घडवण्यात सहाय्य करतील अशा विषयांवरील व्हिडीओना प्राधान्य देतात. या अहवालात असे दिले आहे की,  77 टक्के महिला युजर (User) सांगतात की युट्यूब (YouTube) आयुष्यभर शिकत राहण्यासाठी उपयुक्त असे व्यासपीठ आहे. तर, 90 टक्के महिला क्रिएटर सांगतात की युट्यूब (YouTube) त्यांना क्रिएटीव्ह (Creative) होण्यास मदत करते.

युट्यूब युजर (YouTube Users) चा अभ्यास करूनच युट्यूबवर नवीन फीचर आणले आहेत. ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सने (Oxford Economics) दिलेल्या या  अहवालानुसार युट्यूब युजर हे शिकण्यासाठी या माध्यमाचा वापर करतात, यामुळेच कोर्सेस आणि त्यासाठी सहाय्य गोष्टींचे फीचर युट्यूबवर सुरु होणार आहेत.