Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit-Debit Card : क्रेडिट-डेबिट कार्ड गहाळ किंवा चोरीला गेल्यास 'हे' करा, नाहीतर बसेल आर्थिक फटका!

Credit-Debit Card : क्रेडिट-डेबिट कार्ड गहाळ किंवा चोरीला गेल्यास 'हे' करा, नाहीतर बसेल आर्थिक फटका!

Image Source : www.dignited.com

क्रेडिट-डेबिट कार्डमुळे बऱ्याच गोष्टी सोयीच्या झाल्या आहेत. पण, त्याचबरोबर त्याच्या फसवणुकीच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे सर्रास ऐकायला मिळत आहे. त्यामुळेच आपले कार्ड गहाळ झाले किंवा चोरीला गेल्यास आपल्याला लगेच अ‍ॅक्शन घेणे गरजेचे ठरते. नाहीतर आपल्याला आर्थिक फटका बसू शकतो.

Credit-Debit Card : पूर्वी बँकेतून त्वरित पैसे मिळवणे खूप अवघड होते. कारण, पैसे काढायला गेल्यावर बँकेत प्रचंड गर्दी दिसून यायची. पण, आता या डिजिटल युगात सर्व गोष्टी क्लिकवर उपलब्ध आहेत. मात्र, या सुविधेबरोबर आपल्याला फसवणुकीचे प्रकारही ऐकायला मिळत आहे. तसेच फसवणुकीचे काही प्रकार क्रेडिट-डेबिट कार्डच्या बाबतीतही घडत आहेत. त्यामुळे आपल्याला त्यापासून सतर्क राहणे आवश्यक आहे. जर तुम्ही क्रेडिट-डेबिट कार्ड वापरत आहात आणि ते अचानक गहाळ किंवा चोरीला गेल्यास, तुम्हाला तातडीने काही निर्णय घेणे गरजेचे ठरते. त्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.  

बँकेत संपर्क साधा

अचानक तुमचे क्रेडिट-डेबिट कार्ड गहाळ झाल्यास किंवा चोरीला गेल्यास तातडीने तुमच्या कार्ड जारीकर्त्या बँकेस संपर्क करा. तुमच्याजवळ तेवढा वेळ नसल्यास, तुम्ही ते मोबाईल अ‍ॅप किंवा ऑनलाइन बँकिंगगद्वारे कार्ड लाॅक करू शकता की नाही याची तपासणी करा. त्यामुळे तुम्ही कार्ड लगेच लाॅक केल्यास, तुमच्या कार्डचा वापर पैसे काढण्यासाठी किंवा इतर खरेदी करण्यासाठी होणार नाही.

पासवर्ड त्वरित करा अपडेट

जर तुम्हाला वाटले की तुमचे कार्ड चोरी झाले आहे. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता लगेच तुमचा लाॅग इन, पासवर्ड आणि पिन अपडेट करा. त्यामुळे तुमच्या खात्याद्वारे कोणालाही फसवणूक करता येणार नाही. त्यामुळे वेळोवेळी तुम्ही या गोष्टींवर लक्ष ठेवून राहायला पाहिजे.

कार्ड स्टेटमेंटवर ठेवा लक्ष

तुम्ही बँकेला माहिती दिल्यानंतर तुमच्या कार्डचे स्टेटमेंट तपासत राहा. त्यामुळे तुमच्या खात्यातून पैसे चोरीला गेले असल्यास तुम्ही ते बँकेला त्वरित कळवू शकता. त्यामुळे वारंवार ऑनलाईन स्टेटमेंट तपासणे आवश्यक आहे. त्यावरूनच तुम्हाला तुमचे कार्ड चोरीला गेले की नाही हे समजायला मदत होऊ शकते.

पोलिसात नोंदवा तक्रार

बँकेला कार्ड गहाळ झाल्याचे सूचित केल्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवा. असे केल्यास त्याचा वाईट गोष्टीसाठी वापर झाल्यास, ती तुमची जबाबदारी राहणार नाही. तसेच, तुम्ही कार्ड गहाळ झाल्याचा पुरावा तक्रारीत जोडल्यास, तुम्हाला लगेच दुसरे कार्ड मिळण्यात मदत होऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन एफआयआरही नोंदवू शकता.

क्रेडेन्शियल्स कोणालाच नका देऊ

तुमचे कार्ड गहाळ किंवा चोरी झाले नसले तरी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून अनोळखी माणसांसमोर पैसे काढू नका. तसेच, नियमित कालांतराने तुमचा पासवर्ड बदलत राहा. तुमचे क्रेडेन्शियल्स कोणालाही देऊ नका. याविषयी आरबीआयदेखील सांगत असते की बँकाना तुमच्या क्रेडेन्शियल्सची आवश्यकता नाही. त्यामुळे ही खबरदारी तुम्ही स्वत: घेतली तर तुमची होणारी आर्थिक फसवणूक तुम्ही टाळू शकता. त्यामुळे व्यवहार करताना नेहमी सतर्क राहा.