Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best Performing Funds: चांगला परफाॅर्मन्स देणाऱ्या फंडमध्ये गुंतवणूक करायची आहे? मग 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Best Performing Funds: चांगला परफाॅर्मन्स देणाऱ्या फंडमध्ये गुंतवणूक करायची आहे? मग 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Image Source : www.livemnt.com

Best Performing Funds: गुंतवणूक करायचं ठरलं आहे. दोघा-तिघांना विचारून ही झाले आहे. आता बस पैसे गुंतवायचे बाकी आहेत. तुम्ही अशा पद्धतीची गुंतवणूक करायची ठरवत असल्यास, तुम्हाला चांगलाच आर्थिक भूर्दंड बसू शकतो. त्यामुळे गुंतवणूक करायच्या आधी काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

गुंतवणूक करायची म्हटल्यावर, बहुतेक गुंतवणुकदार वेबसाईट, दैनिक, टीव्ही अशा ठिकाणावरून माहिती गोळा करतात. त्या ठिकाणी त्यांना एखाद्या फंडने चांगली कामगिरी केल्याचे आढळते. बाहेरही प्रत्येकजण त्याविषयीच बोलत असतो. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या मनात तिच गोष्ट राहते आणि तो तिथे पैसे गुंतवतो. कालांतराने त्याच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होत नसल्याने, तो लगेच त्याच्या पोर्टफोलीओमध्ये बदल करतो. परत तो काही चांगल्या प्राॅडक्टवर गुंतवणूक करतो. पण, परतही तेच घडते. हे टाळण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

गुंतवणुकीसाठी ध्येय आवश्यक

कोणाचेही ऐकूण किंवा मनात निश्चय करून एकाच ठिकाणी गुंतवायचं ठरवल्यास, अवघड होऊ शकते. कारण, गुंतवणुकीचा प्रश्न असल्यावर, अशी डोळे झाकून गुंतवणूक करायची म्हटल्यावर तुम्हाला तोटा होऊ शकतो. त्यामुळे ध्येय ठरवून गुंतवणूक करणे चांगले. जर तुम्हाला तुमच्या मुलाला भविष्यातील शिक्षणासाठी परदेशी पाठवायचे आहे. त्यासाठी 10 वर्ष वेळ आहे. तुम्हाला त्यासाठी 20 लाखाची आवश्यकता आहे. अशावेळी तुम्ही एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेतला तर तो तुम्हाला 10 वर्षासाठी प्रत्येक महिन्याला अंदाजे 10000 रुपये गुंतवण्याची शिफारस करतो. त्यामुळे 10 टक्के रिटर्न पकडला तरी तुमचे पैसे जमा व्हायला मदत होऊ शकते.

पोर्टफोलिओमध्ये फेरबदल टाळा

जिथे जास्त रिटर्न मिळेल अशाच ठिकाणी आपण गुंतवणूक करतो. जे आपले ध्येय असेल ते 5 वर्षांत पूर्ण व्हावे असा आत्मविश्वास ठेऊन आपण हाय रिस्कमध्ये गुंतवणूक करतो. मग काही दिवसानंतर आपल्या लक्षात येते की आपला पोर्टफोलीओ चांगले काम करत नाही किंवा ते निगेटिव्ह रिटर्न देत आहे. लगेच तुम्ही पोर्टफोलीओमध्ये फेरबदल करता आणि सध्या जे लोकप्रिय आहे तिथे गुंतवणूक करता. 

समजा तुम्ही एका विशिष्ट ठिकाणी 100 रुपयांची गुंतवणूक केली. जर ती गुंतवणूक 50 वर येऊन थांबली. तर याचा अर्थ तुम्हाला 50 टक्के नुकसान झाले. आता मुळची रक्कम परत मिळवण्यासाठी तुम्हाला दुप्पट रक्कम गुंतवावी लागणार आहे. याचाच अर्थ तुम्हाला 100 टक्के रिटर्न आवश्यक असेल. त्यामुळे काही काळ तुम्हाला तग धरावा लागणार आहे.

दीर्घकालीन उद्दिष्टं हवे

जर आपण गुंतवणुकीचे उद्दिष्ट 10 वर्षांपेक्षा जास्त ठेवले, त्या वेळेला  ती गुंतवणूक आपल्याला चांगली वाटते. मात्र, दोन तीन वर्ष झाल्यावर तिच्याकडून निगेटिव्ह रिटर्न मिळणे सुरू होते.  खरे तर इक्विटी फंड निगेटिव्ह रिटर्न देऊ शकतात. सध्याच्या परिस्थितीत दोन अंकी परतावा देणारे फंड निवडून त्यात गुंतवणूक केल्यास तेच फंड तुम्हाला कमी रिटर्न किंवा निगेटिव्ह रिटर्न देण्याची शक्यता असते. 

त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीच्या उत्पादनांमध्ये गुंतवणूक करत असाल आणि ते फंड पहिल्या काही वर्षांत निगेटिव्ह रिटर्न देत असतील तर तुम्ही ठरवलेल्या ध्येयापर्यंत  पोहचू शकणार नाही. तुम्ही तुमच्या पंसतीच्या फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता परंतु तुमच्याकडे दीर्घकालीन ध्येय असणं गरजेचे आहे. दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी, रिटर्नच्या रिस्कवर लक्ष ठेवून राहावे लागेल.

एखाद्यावेळी आपली कार किंवा बाईक बदलायची इच्छा होते आणि आपण ती बदलतोही. त्याप्रमाणे  गुंतवणुकीत फेरफार करणे ही माणसाची वृत्ती आहे. मात्र, चांगला रिटर्न मिळत नाही म्हणून फेरफार करणे हा गुंतवणुकीच्या हिशोबाने चांगला दृष्टीकोन नाही आहे.