Gratuity : ग्रॅच्युटीच्या नवीन नियमानुसार, कोणत्याही कंपनीत, संस्थेत 10 पेक्षा जास्त कर्मचारी कामावर आहेत, त्यांना कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी द्यावीच लागणार आहे. मात्र, कर्मचाऱ्यांना त्यासाठी नियमात बसणे आवश्यक आहे. म्हणजेच, कर्मचाऱ्याने त्या कंपनीत किंवा संस्थेत 4 वर्षे 10 महिने 11 दिवसांची सेवा बजावणे आवश्यक आहे. तरच कर्मचाऱ्याला ग्रॅच्युटी मिळू शकते.
मात्र, तरी देखील काही वेळा कंपनी ग्रॅच्युटी द्यायला टाळाटाळ करते. तुमच्यासोबतही असाच प्रकार घडला असल्यास, तुम्ही पद्धतशीर कंपनीचा समाचार घेऊ शकता. म्हणजेच कंपनीला कायदेशीर नोटिस पाठवू शकता. तरीही कंपनीकडून काहीच प्रतिसाद आला नाही. अशावेळी तुम्ही अन्य मार्गाचा वापर करु शकता. चला सविस्तर पाहूया.
कंपनीने ग्रॅच्युटी देण्यास नकार दिलाय?
तुम्ही प्रामाणिकपणे कंपनीत सेवा देत आहात. तसेच, तुम्ही कंपनीत पाच वर्ष पूर्ण केली आहे. म्हणजे तुम्ही ग्रॅच्युटीसाठी पात्र आहात. पण, तरी सुद्धा कंपनी तुम्हाला ग्रॅच्युटीचे पैसे देत नाही आहे. अशावेळी कर्मचारी म्हणून तुम्ही थेट कंपनीला कायदेशीर नोटिस पाठवू शकता. तेवढ्याने देखील काम भागत नसल्यास, तुम्ही जिल्ह्यातील कामगार आयुक्तांकडे तक्रार करु शकता. जर कंपनी त्यात आरोपी आढळली तर कंपनीला व्याजासहित दंड भरावा लागणार आहे. यासाठी नोटिस दिल्यानंतर, त्यावर योग्य उत्तर न आल्यास, तुम्ही ही स्टेप उचलू शकता.
कंपनी ग्रॅच्युटी न देण्याचे कारण
जर एखाद्या कर्मचाऱ्यावर अनैतिक वर्तनाचा आरोप असेल, त्याच्या निष्काळजीपणामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले असेल, तर कंपनीला तुमचे ग्रॅच्युटीचे पैसे रोखण्याचा अधिकार आहे. मात्र, त्याआधी कंपनीला पुरावे आणि योग्य कारणे द्यावी लागणार आहेत. त्यानंतर त्याचा तपास केला जाईल. त्यामुळे कंपनी कोणत्याही कारणाने तुमची ग्रॅच्युटी रोखू शकत नाही. त्याआधी कंपनीला कारणे दाखवा नोटिस जारी करायला लागेल. त्यात जर कर्मचाऱ्यावर केलेल आरोप सिद्ध झाल्यास, ग्रॅच्युटीचे पैस रोखले जाऊ शकते.
तेही कंपनी पूर्ण पैसे रोखू शकत नाही. ग्रॅच्युटी अॅक्ट आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, जर एखादा कर्मचारी तोट्यात आरोपी असल्यास, त्याच्यामुळे जेवढे नुकसान झाले तेवढेच पैसे कंपनी रोखू शकते. बाकीचे पैसे कंपनीला द्यावेच लागणार आहेत. त्यामुळे एखादी कंपनी तुमची ग्रॅच्युटी देण्यास टाळाटाळ करत असल्यास, तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे योग्य स्टेप उचलू शकता आणि तुमच्या मेहनतीचा पैसा सहज मिळवू शकता.