Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gratuity किती वर्षांच्या सर्व्हिसवर लागू होते? जाणून घ्या नियम

Gratuity Rules change

Image Source : www.coverfox.com

Gratuity: ग्रॅच्युटी म्हटले की अजूनही लोकांच्या डोक्यातून जुना 5 वर्षांचा नियम काही जात नाही. पण आता सरकारने ग्रॅच्युटीच्या नियमांमध्ये केलेले काही नवीन बदल जाणून घ्या.

एखादा कर्मचारी आपल्या आयुष्याची बरीच वर्षे एखाद्या कंपनीसाठी देतो. तेव्हा कंपनीदेखील त्याला बरेच काही देत असते. जेव्हा एक कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच कंपनीसाठी आपली सेवा देतो. तेव्हा ती कंपनी त्याबदल्यात कर्मचाऱ्याला काही बेनिफिट देत असते. त्या बेनिफिटमधील ग्रॅच्युटी हा एक घटक आहे.

ग्रॅच्युटीबाबत अनेक जणांना पुरेशी माहिती नसते. म्हणजे मुळात ग्रॅच्युटी काय असते? त्याचा आणि पीएफचा काही संबंध असतो का? किंवा ग्रॅच्युटीसाठी पगारातून प्रत्येक महिन्याला काही रक्कम कापली जाते का? यासारखे बरेच प्रश्न लोकांच्या मनात ग्रॅच्युटीला धरून असतात. तर आज आपण अशाच बेसिक प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.

ग्रॅच्युटी म्हणजे काय?

जो कर्मचारी बरीच वर्षे एका कंपनीत राहून प्रामाणिकपणे आपली सेवा देत असतो. तेव्हा ती कंपनी त्या कर्मचाऱ्याच्या कामाचे अॅप्रिसेशन म्हणून त्याला आर्थिक मोबदला देते. हा मोबदला त्या कर्मचाऱ्या पगारावर अवलंबून असतो. भारतातील सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ तर मिळतोच. पण त्याचबरोबर खाजगी कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे.

ग्रॅच्युटीचा नियम काय आहे?

Payment of Gratuity Act मधील नवीन नियमानुसार, एखाद्या कंपनीत, संस्थेत 10 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत असतील तर त्या कंपनीला/संस्थेला कर्माचाऱ्यांना ग्रॅच्युटी देणे बंधनकारक आहे. पण यासाठी कर्मचाऱ्यांनी काही बेसिक पात्रता किंवा नियम पूर्ण करणे गरजेचे आहे. जसे की, कर्मचाऱ्याने त्या कंपनीत 4 वर्षे 10 महिने 11 दिवसांची सलग सेवा देणे गरजेचे आहे. जो कर्मचारी ही बेसिक पात्रता पूर्ण करतो. त्याला कायद्यानुसार ग्रॅच्युटी लागू होते.

ग्रॅच्युटी कशी दिली जाते?

पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी अॅक्टमध्ये दोनप्रकारे ग्रॅच्युटी मोजली जाते. त्यातील पहिला प्रकार म्हणजे ज्या कंपन्यांना ग्रॅच्युटी अॅक्ट लागू होतो. ती कंपनी कर्मचाऱ्याचा शेवटचा पगार गुणिले 15 भागिले 26 आणि त्यातून आलेल्या उत्तराला त्या कर्मचाऱ्याची सर्व्हिस जितकी वर्षे झाली आहे, त्याने गुणायचे. त्यातून जो आकडा मिळतो, तो त्या कर्मचाऱ्याला ग्रॅच्युटी म्हणून दिली जाते.

Last drawn salary X 15 / 26 X number of years of service

आणि ज्या कंपन्यांना Payment of Gratuity Act लागू होत नाही.  त्याकंपन्यांना खालीलप्रमाणे फॉर्म्युला लागू होतो.

Last drawn salary X 15 / 26 X number of years of service

ग्रॅच्युटीच्या रकमेवर टॅक्स लागतो?

इन्कम टॅक्स कायद्यातील तरतुदीनुसार, सेंट्रल-स्टेट गव्हर्नमेंट आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांना मिळणारी ग्रॅच्युटी पूर्णपणे टॅक्स-फ्री आहे. खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना 20 लाखापर्यंतच्या ग्रॅच्युटीवर टॅक्स भरावा लागत नाही. म्हणजे 20 लाखापर्यंत रक्कम टॅक्स-फ्री आहे.

ग्रॅच्युटी पीएफप्रमाणे पगारातून कापली जाते का? याबाबतही अनेकांचा संभ्रम असतो. पण ग्रॅच्युटी ही पगारातून कापली जात नाही. ती एकूण सर्व्हिसच्या आधारे कॅल्क्युलेट  केली जाते. म्हणूनच ग्रॅच्युटीला बेनिफिट म्हटले जाते. जी कंपनी कर्मचाऱ्यांना देत असते.  

Payment of Gratuity Act च्या नियमानुसार, कर्मचाऱ्यांना जे लाभ दिले जातत. त्यामध्ये सुद्धा बदल झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात बेसिक पगाराबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या भत्ते दिले जातात. ते सर्व मिळून महिन्याचा पगार कर्मचाऱ्याला दिला जातो. पण आता नवीन नियमानुसार कर्मचाऱ्याच्या एकूण पगाराचा 50 टक्के भाग बेसिक पगार असावा, अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आपोआप कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटीमध्ये वाढ होण्यास मदत झाली आहे.