Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Yes Bank: येस बँकेच्या क्रेडिट कार्डवरून यूपीआय पेमेंट करता येणार; जाणून घ्या प्रक्रिया

Yes Bank Rupay Credit Card Link to UPI

Yes Bank: आता देशातील खासगी क्षेत्रातील येस बँकेच्या ग्राहकांना रूपे क्रेडिट कार्डवरून (Rupay Credit Card) यूपीआय पेमेंट (UPI Payment) करता येणार आहे. त्यासाठी त्यांना रुपेचे क्रेडिट कार्ड यूपीआयशी लिंक करावे लागणार आहे. ते कसे लिंक करायचे जाणून घेऊयात.

येस बँकेने (Yes Bank) आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. बँकेच्या रूपे क्रेडिट कार्डवरून (Rupay Credit Card) आता यूपीआय (UPI) पेमेंट करता येणार आहे. येस बँकेचे रूपे क्रेडिट कार्ड एनपीसीआयद्वारे संचालित BHIM अ‍ॅपवर लाईव्ह करण्यात आले आहे. यामुळे आता ग्राहक येस बँकेचे रूपे क्रेडिट कार्ड यूपीआयशी लिंक करू शकतात आणि आर्थिक व्यवहार करू शकतात. यापूर्वी केवळ 8 बँकांच्या क्रेडिट कार्डवरील आर्थिक व्यवहार यूपीआयच्या मदतीने केले जात होते. मात्र आता यामध्ये येस बँकेचा देखील समावेश करण्यात आला आहे. जर तुम्हीही येस बँकेचे रूपे क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर तुमचे कार्ड यूपीआयशी कसे लिंक करायचे,जाणून घ्या. 

UPI शी क्रेडिट कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

तुमच्याकडे देखील येस बँकेचे रूपे क्रेडिट कार्ड असेल, तर तुम्ही ते यूपीआयशी लिंक करून आर्थिक व्यवहार करू शकता. त्यासाठी खालील प्रक्रिया फॉलो करा.

1) सर्वप्रथम BHIM अ‍ॅप ओपन करा आणि यामध्ये लिंक केलेल्या बँक अकाउंटवर क्लिक करा.

2) क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्लस (+) या आयकॉनवर क्लिक करावे लागेल. जिथे तुम्हाला Add Account मध्ये दोन पर्याय पाहायला मिळतील. Bank account आणि Credit Card यापैकी क्रेडिट कार्ड पर्यायाची निवड करा.

3) क्रेडिट कार्ड पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरशी लिंक केलेल्या क्रेडिट कार्डचा तपशील तुम्हाला याठिकाणी भरावा लागेल. ज्यामध्ये क्रेडिट कार्डचे शेवटचे 6 अंक आणि वैधतेचे तपशील नोंदवावे लागतील.

4) हे तपशील भरल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी (OTP) पाठवण्यात  येईल. त्यानंतर तुम्हाला यूपीआय पिन बनवावा लागेल आणि तो कन्फर्म करावा लागेल.

अशा प्रकारे तुम्ही यूपीआयशी रूपे क्रेडिट कार्ड लिंक करू शकता. आता तुम्ही दुकानातील QR Code स्कॅन करा आणि रूपे क्रेडिट कार्ड निवडून यूपीआय पिन टाकून आर्थिक व्यवहार करु शकता.

यावर्षीपासून UPI ची सुविधा मिळायला सुरुवात झाली

बँकेतील रूपेचे क्रेडिट कार्ड यूपीआयशी (UPI) लिंक करून आर्थिक व्यवहार करण्याची सुविधा 2022 साली देण्यात येऊ लागली. महत्त्वाचं म्हणजे केवळ रूपेच्याच क्रेडिट कार्डवरून यूपीआय लिंक करता येते. या मदतीने ग्राहक कोणत्याही दुकानात जाऊन QR Code स्कॅन करून आर्थिक व्यवहार चुटकीसरशी पूर्ण करू शकतात. हा व्यवहार केवळ व्यापारी ते व्यापारी या आधारावर केला जाऊ शकतो. व्यक्ती ते व्यक्ती अशा व्यक्तिगत आधारावर पेमेंट करता येणार नाही. Bhim UPI व्यतिरिक्त काही बँकांचे रूपे क्रेडिट कार्ड Google Pay, Paytm, Phonepe, Freecharge आणि PayZapp यासारख्या ठराविक अ‍ॅपशी देखील लिंक करता येते आणि त्या आधारावर आर्थिक व्यवहार करता येतात.

Source: hindi.news18.com