Yamaha R15 V4: Yamaha ने देशातील तिची अतिशय लोकप्रिय YZF-R15 V4 बाइक अपडेट केली आहे. ही बाइक नवीन 'डार्क नाइट' कलरसह लॉन्च करण्यात आली आहे. मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 1लाख 82 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. ही बाइक रेड, ब्ल्यू, व्हाइट कलरमध्येदेखील उपलब्ध आहे, यामधील रेड कलर बाइकची किंमत एक्स-शोरूम किंमत 1लाख 81 हजार, त्याचबरोबर ब्ल्यु कलर बाइकची किंमत 1लाख 82 हजार आणि व्हाइट कलर बाइकची 1लाख 86 हजार आहे.
Yamaha R15 V4 इंजिन आणि इतर वैशिष्टे
या बाइकमध्ये 155cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 18.4bhp पॉवर आणि 14.2Nm टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशन ड्युटी सपोर्ट आणि स्लिपर क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्सद्वारे हँडल केले जाऊ शकते. बाइकला USD फोर्क अपफ्रंट आणि मोनोशॉक रिअर सस्पेंशन सेटअप मिळतो. ब्रेकिंगसाठी 282 mm फ्रंट डिस्क आणि 220 mm रियर डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. Yamaha R15 V4 ला ड्युअल-चॅनल ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) मिळते.
Yamaha R15 V4 मध्ये यात बाय-फंक्शनल हेडलाइट, LED पोझिशन लाइट, साइड स्टँड इंजिन कट-ऑफ स्विच, डिजिटल LCD मीटर कन्सोल, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, यामाहा Y-Connect अॅप इत्यादींचा समावेश आहे. Yamaha R15 V4 च्या डायमेनशन बद्दल बोलायचे झाले तर त्याची लांबी 1990mm, रुंदी 725mm आणि उंची 1135mm आहे. याचा व्हीलबेस 1325mm आहे आणि याला 170mm ग्राउंड क्लीयरन्स मिळतो. बाइकच्या सीटची उंची 815mm आहे.
Yamahaच्या आगामी बाइक कोणत्या?
जपानी दुचाकी उत्पादक कंपनी लवकरच Yamaha MT-03 सोबत Yamaha R3 भारतात परत आणणार आहे. दोन्ही मॉडेल्सना 321cc, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळते, जे जास्तीत जास्त 42PS पॉवर आणि 29Nm टॉर्क जनरेट करते. बाइक्समध्ये 298mm डिस्क अपफ्रंट आणि 202mm रियर ब्रेक आहेत. सस्पेंशन सेटअपमध्ये USD फोर्क आणि लिंक केलेले मोनोशॉक युनिट समाविष्ट आहे.
येत्या काही महिन्यांत, कंपनी MT-03 स्पोर्ट्स नेकेड बाइक, MT-07 आणि MT-09 स्ट्रीट नेकेड बाइकदेखील लॉन्च करण्याची शक्यता आहे. Yamaha MT-07 मध्ये 689cc पॅरलल-ट्विन इंजिन वापरण्यात आले आहे आणि Yamaha MT-09 मध्ये 890cc इनलाइन ट्रिपल-सिलेंडर मोटर वापरण्यात आली आहे.
Source :www.amarujala.com