Yamaha New Bikes: Yamaha कंपनीने आपल्या सर्वाधिक पसंतीच्या बाइक्सची नवीन सिरिज भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. FZS ची चौथी जेनरेशन भारतात लाँच झाली आहे. यामध्ये कंपनीने 149 सीसी फ्युएल इंजेक्टेड इंजिन दिले आहे. बाईकमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. यामध्ये कंपनीने अधिक प्रकाश देणारा नवीन हेडलाइट दिला आहे, त्यासोबत एलईडी फ्लॅशर्स देखील दिले आहेत.
Table of contents [Show]
एफजेडएस वर्जन 4.0
नवीन FZS मध्ये, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टमसह, कंपनीने एक नवीन LCD स्क्रीन देखील दिली आहे, ज्यामध्ये वाय कनेक्ट आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील दिली गेली आहे. तुम्हाला स्क्रीनवरच मोबाईल कनेक्शन स्टेटस, बॅटरी स्टेटस, कॉल अलर्ट आणि एसएमएस अलर्ट मिळतील. यासोबतच नवीन 3D प्रतीक, उत्तम एलईडी टेल लॅम्प, ABS, 140 कलररंगांसह 1.27 लाख रुपये एक्स-शोरूम किंमतीत खरेदी केली जाऊ शकते, तर दिल्लीतील FZ FI सिरिज -3 ची एक्स-शोरूम किंमत 1.15 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
कंपनीने FZ सीरीजची नवीन X बाईकही लॉन्च केली आहे. ज्या ग्राहकांना लहान ब्रेक घेऊन कमी अंतराचा प्रवास करायला आवडते अशा ग्राहकांसाठी ही बाईक तयार करण्यात आली आहे. बाईकचे डिझाईन रेट्रो बाईकसारखे ठेवण्यात आले असून त्यात 149 cc फ्युएल इंजेक्टेड इंजिन आहे. बाईकमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीमही देण्यात आली आहे.
एफजेड एक्स
याशिवाय यात यामाहा मोबाईल कनेक्ट, सोनेरी रंगाची अलॉय व्हील, चमकदार एलईडी टर्न इंडिकेटर, डीआरएलसह बाय-फंक्शन एलईडी हेडलाइट्स, एलईडी टेललाइट, मेटल टँक कव्हर, मेटल साइड कव्हर, एलसीडी मीटर, मेटल अंडर काउल, दोन- लेव्हल सीट, मोबाईल चार्जिंगसाठी पॉवर सॉकेट, कॉल अलर्ट, एसएमएस आणि ई-मेल अलर्ट, अॅप कनेक्टिव्हिटी स्टेटस, फोन बॅटरी लेव्हल स्टेटस यासारखी वैशिष्ट्ये.
एमटी-15
तरुणांना आकर्षित करण्यासाठी यामाहाने MT-15 अपडेटसह लॉन्च केले आहे. कंपनीने त्याची दुसरी सिरिज भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. नवीन MT-15 मध्ये 155 सीसी इंजिनसह VVA तंत्रज्ञान देण्यात आले आहे. यासोबतच ड्युअल चॅनल एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम, एलईडी टर्न इंडिकेटर, अपसाइड डाउन फ्रंट फोर्क, युनि-लेव्हल सीटसह ग्रॅब बार, असिस्ट आणि स्लिपर क्लच, अॅडव्हान्स्ड पूर्ण डिजिटल एलसीडी मीटर यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
या वैशिष्ट्यांव्यतिरिक्त, इंधन वापर ट्रॅकर, शेवटचे पार्किंग स्थान, रेव्ह डॅशबोर्ड, देखभाल शिफारस, खराबी सूचना, रँकिंग इत्यादी वाय कनेक्ट अॅपद्वारे पाहता येतील. ही बाईक Cayenne Storm, Metallic Black Deluxe, Racing Blue, Ice-Fluo Vermilion सारख्या रंगांमध्ये 1.68 लाख रुपये दिल्लीच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी केली जाऊ शकते.
R-15
यामाहाच्या मते, रेसिंग त्यांच्या डीएनएमध्ये आहे. कंपनीने चौथी जनरेशन R-15 आणि नवीन R15-M लॉन्च केली आहे. नवीन R15 मध्ये 155 सीसी इंजिनसह VVA तंत्रज्ञान देण्यात आले आहे. कंपनीने रंगीत TFT मीटरसह नवीन R15 M लाँच केले आहे. यात LED फ्लॅशर्स, स्पेशल सीट, 140 मिमी सुपर वाइड रेडियल रियर टायर, 141 किलो वजनाचे हलके, अॅल्युमिनियम स्विंग आर्म, अपसाइड डाउन फ्रंट फोर्क, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, क्विक शिफ्टर सिस्टम, एरोडायनामिक डिझाइन, Y कनेक्टसह अनेक वैशिष्ट्यांचा प्रवेश देखील मिळतो.
R15-M दिल्लीमध्ये एक्स-शोरूम किंमत 1.94 लाख रुपये आहे. R15 च्या चौथ्या सिरिजच्या रेसिंग ब्लू कलरची दिल्लीमध्ये एक्स-शोरूम किंमत 1.86 लाख रुपये आहे. डार्क नाइटची किंमत 1.82 लाख रुपये आणि मेटॅलिक रेडची किंमत 1.81 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.