Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

World Bank कडून भारतीयांसाठी खुषखबर, जाणून घ्या बँक काय म्हणते

World Bank

Image Source : thevaultznews.com

World Bank ने पुढील वर्षी आपला विकास दर कमी राहण्याचा अंदाज तर वर्तवला आहे. मात्र, तरीही जागतिक बँकेचा अभ्यास भारतासाठी एका दृष्टीने चांगला ठरला आहे. कसा ते जाणून घेऊया.

जागतिक बँकेने आपल्या ताज्या अंदाजात म्हटले आहे की चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.9 टक्के वेगाने वाढेल. 2024-25 मध्ये विकास दर 6.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. असे असले तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने एक चांगला अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था

2023-24 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर 6.6 टक्क्यांपर्यंत खाली येईल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. असे असूनही, सात सर्वात मोठ्या उदयोन्मुख बाजारपेठ आणि विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये (EMDEs) भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील. जागतिक बँकेने आपल्या ताज्या अंदाजात म्हटले आहे की चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.9 टक्के वेगाने वाढेल. 2024-25 मध्ये विकास दर 6.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. 2021-22 मध्ये तो 8.7% होता. यानुसार, जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेचा निर्यात आणि गुंतवणुकीवर परिणाम होईल.

जागतिक बँकेने म्हटले आहे की सरकारने पायाभूत सुविधा आणि व्यवसायासाठी सुविधांवर खर्च वाढवला आहे. यामुळे खाजगी गुंतवणुकीला चालना मिळण्यास आणि उत्पादन क्षमतेच्या विस्तारास मदत होईल. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर) जीडीपी वाढीचा दर वार्षिक आधारावर 9.7 टक्के राहिला आहे. हे खाजगी वापर आणि गुंतवणुकीत वाढ दर्शवते.

परकीय चलनाचा साठा 550 अब्ज डॉलर 

श्वेक इन्स्टिट्यूटने म्हटले आहे की, रुपयाची घसरण रोखण्यासाठी भारताने विनिमय दरातील अस्थिरता हेज करण्यासाठी आंतरराष्ट्रीय राखीव निधीचा वापर केला आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये भारताचा परकीय चलन साठा 550 अब्ज डॉलर  किंवा GDP च्या 16 टक्के होता.