Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Free Flour Mill Yojana Maharashtra : महिलांनो स्वावलंबी होण्यासाठी घ्या ‘मोफत पिठाची गिरणी’ योजनेची मदत

Free Flour Mill Yojana Maharashtra

मोफत पिठाची गिरणी (Free Flour Mill Yojana Maharashtra), मिनी डाळ गिरणी देण्याची योजना सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेविषयी जाणून घेऊया.

महाराष्ट्र शासनामार्फत महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना (Free Flour Mill Yojana Maharashtra) राबविण्यात येत आहे. 100% अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी दिली जाते. या मोफत पीठ गिरणी योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल असा शासनाला विश्वास आहे. त्याचप्रमाणे महिलांनाही रोजगार मिळणार आहे. त्यामुळे मोफत पिठाची गिरणी (मोफत पिठाची गिरणी) ही विशेषत: महिलांसाठी राबविण्यात येणारी एक महत्त्वाची योजना आहे. मोफत पिठाची गिरणी, मिनी डाळ गिरणी देण्याची योजना सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेविषयी जाणून घेऊया.

आवश्यक कागदपत्रं (Necessary documents)

  • अर्जदार महिला ही 12 वी शिकलेली असल्याचा पुरावा
  • अर्जदार महिलेच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत
  • घराचा 8अ उतारा
  • उत्पन्नाचा दाखला (तलाठी किंवा तहसिलदार) लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 20 हजार पेक्षा कमी असल्याचा पुरावा
  • बँक पासबुक ची पहिल्या पानाची झेरॉक्स
  • लाईट बिलची झेरॉक्स

योजनेची पात्रता : (Eligibility of the scheme)

  • या योजनेचा लाभ हा 18 ते 60 वयोगटातील मुली व महिलांना मिळेल.
  • लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाखांप र्यंत असणं किंवाच त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • मोफत पिठाची योजनेचा फायदा ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला घेऊ शकतात.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण केलेल्या असाव्यात.

येथे करा अर्ज (Apply here)

तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या किंवाच तालुका पंचायत समिती येथील महिला व समाज कल्याण विभाग या विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटावे लागेल.त्यानंतर या योजनेबाबत त्यांच्यासोबत चर्चा करावी की आपल्या जिल्हयासाठी देखील अशी काही योजना सुरू आहे का आणि जर सुरू असेल तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अचूक अर्ज सादर करावा व योजनेचा लाभ घ्यावा.

अर्ज कसा करायचा? (How to apply?)

  • अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे
  • सर्वप्रथम वरील दिलेल्या लिंकवरून अर्ज डाऊनलोड करा.
  • अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा.
  • या योजनेच्या अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये जाऊन भेट द्या.