Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Term Insurance Plan: टर्म प्लॅन घ्यायचाय! पण ऑनलाईन घेऊ की ऑफलाईन?

Term Insurance Plan Online or Offline

Term Insurance Plan: डिजिटलायझेशनमुळे ऑनलाईन पॉलिसीने पॉलिसीचे प्रकार, ऑप्शन्स, आणि पेमेंट पद्धतीचे आयामच बदलून टाकले. तरीही काहींना पॉलिसी ऑनलाईन की ऑफलाईन खरेदी करायची, हे ठरवता येत नाही? चला तर यातील दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करू.

टर्म इन्शुरन्स प्लॅन. आजच्या काळामध्ये “Must have” कॅटेगरी मध्ये येणारी अत्यंत मोलाची किंवा त्यापेक्षाही  “अमूल्य” गोष्ट. प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक कमावत्या, आर्थिक योगदान देणाऱ्या व्यक्तीचा स्वतःचा “टर्म इन्शुरन्स प्लॅन” अर्थात “मुदत विमा योजना” असणे आवश्यक आहे. अत्यंत धकाधकीच्या आणि तितक्याच अन-प्रेडिक्टेबल झालेल्या आजच्या जीवनामध्ये शाश्वत असणारी एकच गोष्ट म्हणजे व्यक्तीच्या मागे असलेल्या कुटुंबाला लागणार आर्थिक आधार, त्यांची आर्थिक सुरक्षा.

फॅमिली फ्रेंड इन्शुरन्स एजंट की ऑनलाईन कंपन्यांचे एजंट?

एक काळ असा होता कि, लाईफ इन्शुरन्स प्लॅन देऊ पाहणाऱ्या एजंटसच्या तोंडावर दरवाजा बंद केला जात असे. मात्र कालांतराने हेच विमा-एजंटस् घरातील अडी-अडचणी समजून घेणारी, सुख-दुःख्खामध्ये सहभागी असणारी आणि आर्थिक कानमंत्र देणारे “फॅमिली-फ्रेंड” बनले. मात्र पॉलिसी सुचविणारे, त्यांच्या काळजी घेणारे एजण्ट्स काय किंवा इन्शुरन्स ब्रोकर्स काय, यांच्या भौगोलिक संपर्क-क्षमतेला (geographical reach) मर्यादा होत्या. मात्र आताच्या प्रायव्हेटायझेशन आणि डिजिटलायझेशनच्या युगाने “ऑनलाईन टर्म प्लॅन / पॉलिसी”ने पॉलिसीचे प्रकार, ऑप्शन्स, निवड-प्रक्रिया आणि पेमेंट पद्धती यांचे आयामच (dynamics) बदलून टाकलेय. “एका क्लिकवर पॉलिसी पर्चेस शक्य” होऊ लागलेय. पण मग “पॉलिसी ऑनलाईन खरेदी करावी की ऑफलाईन?” हा प्रश्न द्विधा मनःस्थिती निर्माण करतोच.

अर्थातच या प्रश्नाचे उत्तर खूपच व्यक्तिसापेक्ष म्हणजे subjective स्वरूपाचे असेल. पॉलिसी विकत घेण्याच्या पद्धती जरी वेगवेगळया असतील तरी त्यांचे स्वतःचे असे फायदे-तोटे आहेतच. त्यांपैकी काही मुद्द्यांची चर्चा करूयात.

समोरासमोर चर्चा करून निवड करणे योग्य वाटू शकते

विविध इन्शुरन्स कंपन्यांच्या वेबसाईटवर त्यांची डिजाईन केलेली टर्म इन्शुरन्स प्रॉडक्ट्स आपल्याला ऑनलाईन चेक करता येतात, त्यांची केवळ त्यांच्या कंपनीच्या प्रॉडक्ट्स सोबतच नव्हे तर इतर कॉम्पिटेटिव्ह कंपन्यांच्या टर्म प्लॅन्स सोबत देखील तुलना करता येते. ऑनलाईन टर्म प्लॅन्स कॅल्क्युलेटर्सच्या सहाय्याने पॉलिसीची रक्कम (Sum Assured), पॉलिसी टर्म्स, त्यांचे प्रीमियम, प्रीमियम पेमेंट करण्याची वर्षे कमी जास्त करून काही सेकंदामध्ये तुलना करता येते. ऑनलाईन रिव्ह्यूज् चेक करता येतात. आणि मुख्य म्हणजे आपल्याला आपल्या वेळेनुसार टर्म प्लॅन्सची निवड शक्य होते. विमा-एजंट्स किंवा ब्रोकर्सच्या प्रत्यक्ष संपर्कामध्ये वेळ, वित्त आणि श्रम यांचा व्यय तुलनेने जास्त होतो. मात्र “फेस-टू-फेस” संवादामधून निर्णय घेण्याची आवड असणाऱ्या व्यक्तींना ऑफलाईन पद्धतीनेच पॉलिसीची निवड जास्त योग्य वाटते.

ऑनलाईन खरेदीत 15 ते 30 टक्क्यांची बचत होऊ शकते

सर्वात जास्त चर्चिला जाणारा मुद्दा म्हणजे “एजंट्सना दिल्या जाणाऱ्या कमिशनच्या रकमेचा”. अर्थातच ऑनलाईन टर्म प्लॅनच्या खरेदीमध्ये पॉलिसीधारक पॉलिसी पोर्टलवर जाऊन स्वतः खरेदी करीत असतो. त्यामुळे ऑनलाईन टर्म इन्शुरन्स प्लॅन खरेदी करताना ऑफलाईन खरेदीच्या तुलनेमध्ये 15 ते 30 % इतक्या प्रमाणामध्ये पैशांची बचत होते. कंपनीला एजंट्सना द्यावे लागणारे कमिशन वाचत असल्याने इन्शुरन्स कंपनीज् तो फायदा पॉलिसीधारकाकडे थेट पास करतात. साहजिकरीत्या पॉलिसीधारकाला टर्म प्लॅन तुलनेने किफायतशीर पडतो. अर्थात एजन्ट्स ही कसर व्यक्तीची मेडिकल तपासणी किंवा पॉलिसीधारकाचे पॉलिसी डॉक्युमेंट्स घरपोच आणून देणे सारख्या वैयक्तिक संपर्कांद्वारे भरून काढण्याचा प्रयत्न करतात.

एका क्लिकवर पॉलिसी खरेदी करणे शक्य

डिजिटल इन्शुरन्सच्या काळामध्ये “एका क्लिकवर पॉलिसी” खरेदी शक्य झाली आहे. कस्टमर-फ्रेंडली सॉफ्टवेअर्सचा सहज, स्वच्छ आणि सूचनांसहित वापर होत असल्याने पॉलिसी-इच्छुकाला स्वतःचा वेळेनुसार, कोणाच्याही प्रभावाखाली अथवा दबावाखाली न येता (without favor or fear) पॉलिसी खरेदी करता येते. पेपरवर्क करावयाची गरज नसल्याने पॉलिसीचे डॉक्युमेंट्स देखील इन्शुरन्स रिपॉझिटरी सारख्या “डिजिटल लॉकरमध्ये” सेफ / सुरक्षित जमा होत असतात. ECS च्या मदतीने प्रिमिअमचे पेमेंट देखील ऑनलाईन पद्धतीने करणे सोपे झाले आहे. विशेषतः CoviD-19 च्या काळामध्ये जिथे व्यक्तिसंपर्क कमीत कमी होता आणि आयुष्याची सुरक्षितता हीच प्राधान्य (priority) होती, तेव्हा ऑनलाईन टर्म प्लॅन खरेदीने इन्सुरन्स व्यवसायाची गणिते बदलून टाकली. याच काळामध्ये ऑफलाईन पॉलिसी-खरेदी आणि पॉलिसी सर्व्हिसिंगला मात्र मर्यादा आल्या.  

ऑनलाईन खरेदीत ‘पर्सनल टच’ हरवला

पॉलिसी खरेदी करताना पॉलिसीधारकाच्या संपर्कात राहणे, त्याला मेडिकल चाचण्यांच्या वेळी व्यक्तिगत आपुलकीने सेवा देणे, पॉलिसी डॉक्युमेंट्स घरपोच नेऊन देणे इत्यादी सेवा पुरविणे हे एजंट्सचे महत्त्वाचे वैशिष्टय. ऑनलाईन टर्म प्लॅन खरेदीमध्ये जरी “डेडिकेटेड कॉल सेंटर्स”चा पॉलिसी-सर्व्हिसिंगला उपयोग होत असतील, तरी एजन्ट्सचा स्वतःचा असणारा वैयक्तिक जिव्हाळ्याचा “पर्सनल टच” काही प्रमाणात हरवतो, हे मात्र नक्की.

मात्र ऑनलाईन पॉलिसी चेक करणे, त्रुटी असल्यास बदल करून घेणे, पेपरलेस पॉलिसी डॉक्युमेंट्स हाताळणे, ह्या गोष्टींसोबत तुलना केली असता, तंत्रज्ञानाचा इन्शुरन्स खरेदी आणि सेवा प्रक्रियेवरचा प्रभाव कोणालाही नाकारता येणार नाही. अर्थात टर्म इन्शुरन्स प्लॅन ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन, प्रत्येकाने खरेदी मात्र नक्की करावा, हाच मतितार्थ.