Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

WhatsApp : ट्रेन वेळेवर येईल की उशीर होईल? व्हॉट्सअॅपवर तपासा

WhatsApp

ट्रेनची रनिंग स्टेटस जाणून घेण्यासाठी आपण इंटरनेटद्वारे पीएनआर द्वारे माहिती मिळवतो. पण अनेक वेळा योग्य माहिती उपलब्ध होत नाही. परंतु आता आपल्याला याची गरज भासणार नाही. व्हॉट्सॅपमुळे (Whatsapp) हे शक्य झाले आहे.

जेव्हाही आपण एका शहरातून दुसऱ्या शहरात ट्रेनने जातो तेव्हा आपल्या मनात एकच प्रश्न वारंवार येतो, ट्रेन वेळेवर धावते की नाही, ट्रेन उशीरा येते की नाही. ट्रेन उशिराने धावणे ही आपल्या देशात खूप जुनी समस्या आहे. यामुळे भारतीय रेल्वेवर अनेकदा टीका सुद्धा झाली आहे. जेव्हा आपण ट्रेन पकडण्यासाठी घरून निघतो तेव्हा ट्रेन वेळेवर धावते की नाही हे तपासतो. 
ट्रेनची रनिंग स्टेटस जाणून घेण्यासाठी आपण इंटरनेटद्वारे पीएनआर द्वारे माहिती मिळवतो. पण अनेक वेळा योग्य माहिती उपलब्ध होत नाही. परंतु आता आपल्याला याची गरज भासणार नाही. एका बातमीनुसार, आता तुम्ही घरबसल्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून (Whatsapp) ट्रेनचे रनिंग स्टेटस जाणून घेऊ शकता. रेल्वे तुम्हाला ट्रेनची रनिंग स्टेटस व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सहज सांगेल.

ट्रेन लेट आहे की नाही कसे कळणार?

होय, व्हॉट्सअॅपवर मेसेज केल्याने तुमची डोकेदुखी कमी होईल. यासाठी Railofy चा नंबर - 9881193322 तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा आणि तुमचा पीएनआर नंबर टाका. यानंतर Railofy चॅटबॉट तुम्हाला तुमच्या ट्रेनबद्दल अलर्ट करेल आणि रिअल टाइम अपडेट्ससह संपूर्ण माहिती पाठवेल.

ट्रेनची स्थिती कशी तपासायची?

प्रवासाला निघण्यापूर्वी, तुम्ही ज्या ट्रेनमधून प्रवास करणार आहात ती रद्द, डायव्हर्ट आणि रिशेड्यूल गाड्यांमध्ये समाविष्ट नाही ना? याची यादी तपासावी. तुम्हाला या गाड्यांची यादी https://enquiry.indianrail.gov.in/mntes/ वेबसाइटवर मिळेल. वेबसाइटवर अपवादात्मक ट्रेन्स अंतर्गत ट्रेन क्रमांक, मार्ग आणि त्याच्या वेळेची माहिती देखील असेल.

व्हॉट्सअँपवरुन ऑर्डर करा जेवण

प्रवाशांसाठी जेवण ऑर्डर करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी रेल्वेने बिझनेस व्हॉट्सॅप क्रमांक +91-8750001323 सुरू केला आहे. निवडक ट्रेन आणि प्रवाशांना ई-कॅटरिंग सेवा देण्यासाठी व्हॉट्सअॅप कम्युनिकेशन करण्यात आले आहे. यानंतर, फीडबॅक आणि सूचनांनुसार, इतर गाड्यांमध्येही याची अंमलबजावणी केली जाईल. प्रवासी व्हॉट्सअॅपद्वारे जेवण कसे ऑर्डर करू शकतील? ते पाहूया.

  • तिकीट बुकिंगच्या वेळी, www.ecatering.irctc.co.in या लिंकवर क्लिक करून ई-कॅटरिंग सेवा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकाला बिझनेस व्हॉट्सअॅप नंबरवरून मेसेज पाठवला जाईल.
  • वेबसाइटवर आल्यानंतर, ग्राहक वेबसाइटवरून मार्गात स्थानकांवर उपलब्ध असलेल्या त्यांच्या पसंतीच्या रेस्टॉरंटमधून थेट जेवण बुक करू शकतात.
  • यानंतर, व्हॉट्सअॅप नंबर टू वे कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म म्हणून काम करण्यास सुरवात करेल. एआय समर्थित चॅटबॉट प्रवाशांसाठी ई-कॅटरिंग सेवांवरील सर्व प्रश्न हाताळेल.

या कंपनीनेही सुरु केली होती सेवा

गेल्या वर्षी, झूप इंडिया (Zoop India) या ऑनलाइन प्लॅटफॉर्मने, ट्रेनमधील प्रवाशांना जेवण पोहोचवण्यासाठी, व्हॉट्सॅप चॅटबॉट सोल्यूशन प्रदाता, Jio Haptik Technologies Limited सोबत भागीदारी केली. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, प्रवासी त्यांच्या पीएनआर क्रमांकांसह व्हॉट्सॅप बेस्ड सेल्फ-सर्व्हिस फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म वापरू शकतात आणि रिअल-टाइम ऑर्डर ट्रॅकिंग, फीडबॅक आणि सपोर्टसह त्यांच्या डिलिव्हरी थेट त्यांच्या सीटवर पोहोचवू शकतात.