Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

WhatsApp New Feature: आता, WhatsApp वर व्हिडीओ रेकॉर्ड करणे व शेयर करणे होणार अधिक सोपे

WhatsApp New Feature

WhatsApp New Update: मेटाचे WhatsApp हे अॅप प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये असणार यात शंकाच नाही. या व्हाॅटसअॅप च्या चॅटिग सुविधेमुळे लोक व्हर्च्युली अधिक जवळ आले आहे. या अॅपची लोकप्रियता प्रचंड आहे. म्हणूनच या अॅपमध्ये युजर्सला आधिकाधिक चांगली सुविधा देण्यासाठी नवीन फीचर आणले जाते किंवा पूर्वीचे फीचर अपडेट केले जाते. आता व्हाॅटसअॅप ने एक व्हिडीओ फीचर अपडेट केले आहे, त्याविषयी जाणून घेवुयात.

WhatsApp New Feature Update: मेटा (Meta)च्या व्हाॅटसअॅपव्दारा (WhatsApp) आता व्हिडीओ रेकॉर्ड  करणे व शेयर करणे पूर्वीपेक्षा ही होणार अधिक सोपे. या अॅपमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करण्याची कटकट संपणार यासाठी अधिक सोपी ट्रिक व्हाॅटसअॅपने आणली आहे. ती काय आहे, याबाबत जाणून घेवुयात. 

काय आहे नवीन फीचर? (WhatsApp New Feature)

व्हाॅटसअॅपने एक नवीन व्हिडीओ मोड आणला आहे. आता अँड्रॉइड डिव्हाइसव्दारा व्हिडीओ रेकाॅर्ड करणे व शेयर करण्याची सोपी ट्रिक साधता येणार आहे. पूर्वी युजर्सला व्हिडीओ रेकाॅर्ड करण्यासाठी शटर बटणावर टॅप करून धरून ठेवावे लागत असे. आता हे टॅप बटण युजर्सला धरावे लागणार नाही. आता युजर्स थेट व्हिडीओ रेकाॅर्ड करू शकतात.  

व्हाॅटसअॅप नवीन अपडेट (WhatsApp New Update)

व्हाॅटसअॅपमध्ये व्हिडीओ मोडमध्ये नवीन अपडेट करण्यात आली आहे. या अपडेटचा उपयोग Google Play Store वरून सर्व युजर्स करू शकतात. म्हणजेच Play Store जावा आणि व्हाॅटसअॅपला अपडेट करा.

हे नवीन फीचर कसे काम करेल (How the New Feature will Work)

पूर्वी Whatsapp व्दारा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी शटर किंवा कॅमेराचे बटण धरून ठेवावे लागत होते. जसे फोनवरून हात काढला की, युजर्स व्हिडीओ रेकाॅर्ड करू शकत नव्हते. पण आता युजर्सची ही धावपळ बंद होणार आहे. आता या नवीन अपडेटमुळे युजर्सला व्हिडीओ मोड क्लिक केले, तरी व्हिडीओ रेकाॅर्ड होईन. यासाठी बटणावर हात ठेवायची गरज पडणार नाही.

Whatsapp दिसणार नवीन फाॅन्टमध्ये (WhatsApp will Soon See a New Font)

काही दिवसात Whatsapp नवीन फाॅन्टमध्ये दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. हा प्लॅटफॉर्म काही नवीन, सुंदर व आकर्षक फॉन्टवर काम करत आहे. हे युजर्सला पुढील काही दिवसात पाहायला मिळेल. कॅलिस्टोगा, कुरियर प्राइम, डॅमियन, एक्सो 2 आणि मॉर्निंग ब्रीझ या फॉन्टचा यामध्ये समावेश आहे.