Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

106 वर्षानंतर मुघल गार्डनचे नाव बदलून 'अमृत उद्यान' का केले? या उद्यानचा इतिहास व खासियत..पर्यटकांसाठी FREE तिकिट

Why was the name of Mughal Garden changed

Image Source : http://www.news18.com/

Mughal Garden: देश-विदेशातील करोडो पर्यटक राष्ट्रपती भवनातील 'मुगल गार्डन'ला भेट देतात. आता मात्र पर्यटकांचे लोकप्रिय असणारे हे गार्डन मुघल नाही तर 'अमृत उद्यान' म्हणून यापुढे ओळखले जाणार आहे. पण या गार्डनचे नाव का बदलले यापासून ते त्याच्या वाद-विवाद होण्यापर्यंतची सर्व माहिती जाणून घेवुयात एका क्लिकवर....

Amrit Udyan Ticket Booking: दिल्ली (Delhi) येथील राष्ट्रपती भवनातील (Rashtrapati Bhavan) मुख्य आकर्षण असलेले मुघल गार्डन (Mughal Garden) आता ‘अमृत उद्यान’ (Amrit Udyan) म्हणून ओळखले जाणार आहे. नुकतेच या गार्डनचे नामकरण करण्यात आले आहे. मात्र देशातील काही भागातून यावरून टीका होताना दिसत आहे. या सर्व बाबी पाहता, मुघल गार्डनचे नाव का बदलले, त्यामागील कारण, गार्डन कधी खुले होणार, तिकिट किंमतसह कुठे मिळणार व त्याचा इतिहास याबाबत सविस्तर जाणून घेवुयात.  

मुगल गार्डनचे नाव का बदलले? (Why was the name of Mughal Garden changed)

भारत देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले आहेत. म्हणूनच या अमृत महोत्सवाचा मुहुर्त साधत या मुघल गार्डनचे  नाव बदलून 'अमृत उद्यान' असे केले आहे. रविवार, 29 जानेवारी 2023 रोजी, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते या गार्डनचे नामकरण करण्यात आले आहे. थोर लोकांच्या विचारातून प्रेरणा घेऊन हे नाव बदलण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

या गार्डनचे मुख्य आकर्षण काय आहे? (The main attraction of this garden)

मुघल म्हणजेच आताच्या अमृत उद्यानचे मुख्य आकर्षण म्हणजे साधारण टयुलिप्स फुले फक्त कश्मीर किंवा स्विर्त्झलॅंड येथेच पाहायला मिळतात, त्याच फुलांच्या 12 प्रकारच्या जाती, 138 प्रकारची गुलाबाची फुले, 10,000 पेक्षा अधिक टयुलिप जातीचे फुले, 70 विविध जातींचे रंगबेरंगी व आकर्षित फुले, 5,000 हंगामी फुलांच्या प्रजाती आहेत. हे गार्डन 15 एकरमध्ये उभे करण्यात आले आहे. येथे फुलांच्या माहितीसाठी त्या त्या फुलांसमोर QR कोड लावले आहेत, स्कॅन करताच त्या त्या फुलांविषयीची माहिती मिळेल तसेच फुल झाडांविषयी पीएचडी केलेले 12 विद्यार्थीदेखील मार्गदर्शन म्हणून येथे उपस्थित असणार आहे.

कधी होणार खुले व वेळ?(When will be Open and Time)

मुघल गार्डन म्हणजे अमृत उद्यान हे पर्यटकांना पाहण्यासाठी दरवर्षी वसंत ऋतूमध्ये खुले केले जाते. यंदा ही हे गार्डन 31 जानेवारीपासून ते 26 मार्चपर्यंत ओपन राहणार आहे. यानंतर 28 मार्चला फक्त शेतकऱ्यांसाठी, 29 मार्चला दिव्यांग व्यक्तींसाठी तर 30 मार्चला पुलिस, सुरक्षा दल व सेनेतील कुटुंबातील सदस्यांना प्रवेश दिला जाणार आहे. हे गार्डन सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुले राहणार आहे.  

तिकिटाची किंमत (Ticket Price)

अमृत गार्डन हे दरवर्षी सर्वसामान्य लोकांसाठी मोफत असते. यंदा ही या गार्डनमधील प्रवेश मोफत असला, तरी ऑनलाइन बुकिंग (Online Booking) पास असणे आवश्यक आहे. ऑफलाइन असे कोणतेही तिकिट व बुकिंगची सुविधा उपलब्ध नाही.

नामकरण विषयी वाद-विवाद (Controversy Over Naming)

कारण देशात नामकरण व्यतिरिक्त महागाई, बेरोजगारी सारख्या अनेक समस्या आहेत, ज्यावर सर्वप्रथम काम केले पाहिजे असे काही राजकीय लोकांचे  म्हणणे आहे.  

मुगल गार्डनचा इतिहास (History of Mughal Gardens)

1911 मध्ये ब्रिटिशांनी कोलकत्ता ऐवजी दिल्लीला आपली राजधानी बनविली होती. त्यावेळी उंच उंच पहाडी असणाऱ्या जागी ‘वायसराय हाऊस’ची निर्मिती केली होती. हे हाऊस उभारण्यासाठी खास इंग्लंडवरून ब्रिटिश वास्तूकार ‘सर एडविन लूटियंस’ (Sir Edwin Lutyens) यांना बोलाविण्यात आले होते. त्यांनीच हे हाऊस म्हणजेच आताच्या राष्ट्रपती भवनाची डिझाइन केली होती. त्यांनी 1917 मध्ये या हाऊस बांधणीची सुरूवात केली. या हाऊसचे सौदर्यं वाढविण्यासाठी एक गार्डन बनविण्यात आले, ते गार्डन म्हणजे मुगल म्हणजेच सध्याचे अमृत उद्यान होय. हे गार्डन तयार करण्यासाठी संपूर्ण एक वर्ष लागले असल्याचे सांगितले जात आहे.  

मुगल गार्डन नाव का ठेवले? (Why named Mughal Garden)

16 व्या शतकात बाबरच्या हल्ल्यानंतर दिल्लीत मुघल साम्राज्याची सुरुवात झाली. यानंतर हुमायून, अकबर, शाहजहान आणि औरंगजेब यांनी दिल्लीचे तख्त ताब्यात घेतले होते. या दरम्यान मुगलांनी देशभरात बाग-बगीचे उभे केले होते. दिल्लीमध्ये त्यांनी जवळजवळ 1200 गार्डन उभे केले होते. यानंतर इंग्रजांनी मुगल परंपरेचा स्वीकार केला, त्यामुळे या गार्डनचे नाव मुगल गार्डन असे ठेवले. याचे डिझाइन ताजमहल व जम्मू कश्मीरच्या गार्डनने प्रेरित होऊन तयार केले आहे. हे गार्डन चार भागात विभागले आहे.

पहिल्यांदा हे गार्डन कधी खुले केले? (When was this Garden First Opened)

ब्रिटिश काळात हे गार्डन मोजक्याच व खास लोकांसाठी खुले करण्यात आले होते. ब्रिटिश शासन आलेल्या खास पाहुण्यांना हे गार्डन दाखवित असत. पण 26 जानेवारी 1950 रोजी जेव्हा भारत प्रजासत्ताक देश बनला, तेव्हा या वायसराय हाऊसचे नाव बदलून 'राष्ट्रपती भवन' करण्यात आले होते. त्यावेळी  डाॅ. राजेंद्र प्रसाद  यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली होती. त्यावेळी या पहिल्या व नवीन राष्ट्रपतींनी हे गार्डन सर्वसामान्य नागरिकांना पाहण्याची ‘आजादी’ दिली होती. तेव्हापासून ते आजतागायत हे गार्डन पर्यटकांसाठी मोफत खुले करण्यात येते.