Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सेकंडहँड वाहनाचा विमा (Car Insurance) का आवश्यक? Second Hand Car Insurance

सेकंडहँड वाहनाचा विमा (Car Insurance) का आवश्यक? Second Hand Car Insurance

जो ग्राहक सेकंड हँड गाडी आपल्या नावावर करणे जितके महत्वाचे मानतो, तितकाच विमाही ही महत्वाचा मानला पाहिजे

विमा कंपन्यांकडे अनेक वेळा सेकंड हँड गाड्यांच्या विम्याचे क्लेम येतात. या गाड्यांचे मालक गाडी आपल्या नावावर करून घेतात पण विम्याची पॉलिसी आपल्या नावावर करून घ्यायला विसरतात. विमा कंपनी असा क्लेम मान्य करत नाही. कारण गाडीचा नवा मालक आणि कंपनीत कोणताही करार झालेला नसतो. म्हणूनच जो ग्राहक सेकंड हँड गाडी आपल्या नावावर करणे जितके महत्वाचे मानतो, तितकाच विमाही ही महत्वाचा मानला पाहिजे. शिवाय ही बाब गाडी विकणार्‍यानेही लक्षात घेतली पाहिजे. कारण जर पॉलिसी ट्रान्सफर झाली नाही तर तोही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतो.

जेव्हा एखादी व्यक्ती आपली गाडी दुसर्‍या व्यक्तीला विकते त्यावेळी गाडीची सर्व कागदपत्रे त्या व्यक्तीकडे सुपूर्द करते. त्याचबरोबर गाडीच्या विम्यासंदर्भातील कागदपत्रेही देणे गरजेचे असते. मोटर वाहन कायद्यानुसार कार खरेदी केल्यानंतर 14 दिवसांच्या आत त्याने इन्शुरन्स पॉलिसीही आपल्या नावावर ट्रान्सफर करून घेण्याची जबाबदारी वापरलेली कार खरेदी करणार्‍या व्यक्तीची आहे.

चौदा दिवसांनंतरही नव्या मालकाने जर पॉलिसी आपल्या नावावर करून घेतली नाही तर विमा कंपनी थर्ड पार्टी आणि ऑन डॅमेज विम्याचा क्लेम देण्यास बांधील राहात नाही. 

जर विमा ट्रान्सफर झाला नसेल आणि पॉलिसीवर जुन्या मालकाचेच नाव असेल तर अपघात झालेल्या स्थितीत न्यायालय नुकसानीचा क्लेम जुन्या मालकाला पाठवू शकते. विमा कंपनीवर हा क्लेम देण्याची कोणतीही जबाबदारी राहात नाही. तसेच वाहन विकण्याची सर्व प्रक्रिया न्यायालयाला सांगणे हीदेखील कठीण प्रक्रिया होऊ शकते.

वाहन विमा (Car Insurance) ट्रान्सफर करण्यासाठी एका नव्या प्रपोजल फॉर्मवर सही करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला विक्रीचे पुरावे द्यावे लागतील, उदाहरणार्थ रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट (RC) ट्रान्सफर, फॉर्म 29 आणि 30. या दोन्हींवर जुन्या मालकाची सही असायलाा हवी. त्याचबरोबर ट्रान्सफर फीचा पुरावा आणि जुन्या पॉलिसीची प्रतही द्यावी लागते. यानंतर विमा कंपनी विमा ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू करेल.

आरसी वरील नाव बदलायला आरटीओत काही कालावधी जाऊ शकतो. वर उल्लेख केलेली कागपत्रे तुम्ही जमा केली असतील तर पॉलिसी सहजपणे तुमच्या नावावर होईल. आरटीओकडून नवी आरसी मिळाल्यावर त्याची कॉपी विमा कंपनीला दिल्यास क्लेमच्या वेळी कोणतीही अडचण येणार नाही.

तुमची पॉलिसी ट्रान्सफर झाली आणि आरसीत नाव ट्रान्सफर झाले नसेल किंवा विमा कंपनीकडे त्याचा पुरावा दिला गेला नसल्यास क्लेमच्यावेळी विमा कंपनीला नवी आरसी कॉपी द्यावी लागते.

नाव ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच्या काळात क्लेम दिला जात नाही. विमा कंपनीत आरसीच्या ट्रान्सफरची कॉपी जमा केल्यावरच क्लेम दिला जातो, हे लक्षात ठेवा.