Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EPFO Scheme Certificate: नोकरी बदलल्यानंतर EPFO कडून प्रमाणपत्र मिळवण्याची आवश्यकता का असते? जाणून घ्या

EPFO Scheme Certificate

Image Source : www.mid-day.com

EPFO Scheme Certificate: नोकरी बदलल्यानंतर ईएफओकडून सर्टिफिकेट मिळवणे आवश्यक आहे. कारण या सर्टिफिकेटच्या मदतीने खातेदाराला पेन्शन खाते ट्रान्सफर करता येते. EPFOकडून हे स्कीम सर्टिफिकेट कसे मिळवायचे? हे जाणून घ्या.

कोणतेही खाजगी किंवा सरकारी कर्मचारी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे  (EPFO) सदस्य असतात. कर्मचाऱ्याने 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ EPF मध्ये गुंतवणूक केली असेल, तर वयाच्या 58व्या वर्षानंतर सदर व्यक्ती पेन्शनसाठी पात्र ठरते. परंतु कर्मचाऱ्याचा एकूण सेवेचा कालावधी 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर ती व्यक्ती पेन्शनसाठी पात्र नसते. असे झाल्यास, गुंतवलेले पैसे परत मिळवण्यासाठी पेन्शन विथड्रॉल व PF म्हणून गुंतवलेली सर्व रक्कम काढून तुम्ही हे खाते बंद करू शकता किंवा भविष्यात नवीन नोकरी सुरू केल्यास तुम्ही पूर्वीचे पेन्शन खाते जोडून हा 10 वर्षाचा कालावधी पूर्ण करू शकता. तेव्हा तुम्ही पेन्शनसाठी पात्र व्हाल. पण यासाठी खातेदाराला स्कीम प्रमाणपत्र मिळवणे गरजेचे असते.

स्कीम सर्टिफिकेट म्हणजे काय?

स्कीम सर्टिफिकेटच्या मदतीने नोकरी बदलल्यानंतर पेन्शन ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळते. पेन्शनचा दावा करण्यासाठी, खातेदाराकडे हे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. जर तुम्ही 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी पीएफमध्ये योगदान दिले असेल, तरीही तुम्ही पेन्शन सेवा सुरू ठेवण्यासाठी योजनेचे प्रमाणपत्र घेऊ शकता.

नियमानुसार, पीएफ ग्राहक जेव्हा आपली नोकरी बदलतो. तेव्हा त्याने आपले पीएफ खाते नवीन कंपनीकडे वळवले पाहिजे. पण नव्याने जॉईन केलेली कंपनी EPFच्या कक्षेत येत नसेल तर, पेन्शन मिळवण्यासाठी हे सर्टिफिकेट मिळवणे आवश्यक आहे. काही प्रकरणांमध्ये ज्यांनी 10 वर्षे ईपीएफमध्ये योगदान दिले आहे आणि यापुढे काम करण्याची ज्यांची इच्छा नाही. ते वयाच्या 50 ते 58 वर्षांत पेन्शन मिळविण्यासाठी प्रमाणपत्र घेऊ शकतात.

स्कीम सर्टिफिकेट कसे मिळवायचे?

स्कीम सर्टिफिकेट मिळविण्यासाठी फॉर्म 10C भरणे आवश्यक आहे. हा फॉर्म EPFO ​​च्या वेबसाईटवरून डाऊनलोड करता येतो. हा फॉर्म भरून जवळच्या EPFO ​​कार्यालयात प्रत्यक्ष जमा करावा लागतो. तसेच सरकारच्या उमंग अॅपवर देखील ही सुविधा उपलब्ध आहे . यासोबतच जन्मदिनांक, रद्द केलेला चेक, कर्मचार्‍याच्या बायकोची-मुलांची नावे आणि इतर तपशील, कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास मृत्यूचा दाखला, वारसदाराची माहिती आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जमा करावी लागतात. तसेच या प्रक्रियेसाठी प्रक्रिया शुल्क देखील भरावे लागते.

Source: www.zeebiz.com