Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Debt Fund: इंडेक्सेशन बेनिफिट काढून घेतल्यानंतरही डेट फंडातील गुंतवणूक फायद्याची ठरेल का?

debt fund

डेट फंड योजनांवरील इंडेक्सेशन बेनिफिट काढून घेतल्याने आता यापुढे डेट फंडातील गुंतवणूक फायद्याची ठरेल का? असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. डेट फंडाच्या अनेक लाभांपैकी इंडेक्सेशन हा एक लाभ होता. त्यासोबत तरलता (लिक्विडिटी) कमी जोखीम, स्थिरता आणि गुंतवणुकीची सुरक्षितता अशा लाभांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

Debt Fund: संसदेत मार्च 2023 मध्ये फायनान्स बिल मंजूर झाले. नव्या बदलानुसार डेट फंडावर इंडेक्सेशनचा लाभ मिळत नाही. दरम्यान, डेट फंडाच्या अनेक लाभांपैकी इंडेक्सेशन हा एक लाभ होता. त्यासोबत तरलता (लिक्विडिटी) कमी जोखीम, स्थिरता आणि गुंतवणुकीची सुरक्षितता अशा लाभांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. 

मार्केट लिंक्ड डिबेंचर्सवरही आता इंडेक्सेशनचा लाभ मिळणार नाही. (Are debt funds beneficial even after indexation benefit removed) दीर्घकाळ गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्यावर कर आकारताना महागाई विचारात घेतली जाते. त्यामुळे गुंतवणूकदारास करलाभ मिळतो, यास इंडेक्सेशन बेनिफिट असे म्हणतात. हे इंडेक्सेशन बेनिफिट Cost Inflation Index वर अवलंबून असते. CII दर देशात किती महागाई आहे हे दर्शवतो. 

लिक्विडिटी 

तीन वर्षांपेक्षा जास्त काळ डेट फंड योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर इंडेक्सेशन बेनिफिट मिळत होते. डेट फंडातील गुंतवणुकीत तरलता जास्त असते. (debt funds beneficial or not) म्हणजे तुम्ही कधीही गुंतवणूक काढून घेऊ शकता. मार्च 2023 नंतरही हा लाभ मिळत आहे. निश्चित मुदतीचे डेट फंड वगळता इतर डेट फंड योजनांमधील गुंतवणूक 24 ते 48 तासात गुंतवणूक काढून घेता येते. तसेच यावर कोणताही दंडही आकारला जात नाही. इतर पारंपरिक निश्चित परतावा योजनांचा विचार करता जर मुदतीआधी गुंतवणूक काढून घेत असाल तर दंड आकारला जातो.

प्रोफेशनल फंड मॅनेजर 

डेट म्युच्युअल फंड हे प्रोफेशनल फंड मॅनेजरद्वारे व्यवस्थापित केले जातात. बाजार नियामकाने आखून दिलेल्या नियम आणि अटींच्या अधीन राहूच हे फंड मॅनेजर गुंतवणूक करतात. त्यामुळे एका ठराविक पातळीपेक्षा जास्त जोखीम फंड मॅनेजर घेऊ शकत नाही. तसेच एका फंड योजनेतील विविध रोख्यांमध्ये गुंतवणूक वळवता येते त्यामुळे जोखीमही कमी होते. त्यामुळे बाजारात जरी पडझड झाली तरी कमीतकमी धोका पोर्टफोलिओला पोहचतो.

3 ते 7 वर्ष कालावधीतील गुंतवणूक ठरू शकते फायद्याची

सध्या डेट फंडातून 8% सरासरी परतावा मिळत आहे. तसेच अमेरिकेत महागाई वाढत आहे. त्यामुळे फेडरल बँक आणखी दरवाढ करू शकते. त्यामुळे डेट फंड योजनांमध्ये 3 ते 7 वर्ष कालावधीची गुंतवणूक फायद्याची ठरू शकते, असा अंदाज गुंतवणूक तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. 

डेट फंड गुंतवणूक नफ्यावरील कर हा मुद्दा जेव्हा गुंतवणूक काढता तेव्हा विचारात घ्यायला हवा. फक्त नफ्यावरील कर लाभ या एकाच मुद्द्यावरुन डेट फंडात गुंतवणूक न करणे योग्य ठरणार नाही. कोणतीही गुंतवणूक करताना फोकस्ड राहणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच शिस्तीने तुमच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करायला हवी. जेव्हा दीर्घकाळ गुंतवणुकीचा विचार करता तेव्हा संयम राखणे फायद्याचे ठरते. दरम्यान, भारताच्या विकासाने इंजिन वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे डेट सोबतच इक्विटी मार्केटमधील गुंतवणूकही दीर्घकाळात नफा कमावून देऊ शकते.