Credit Score: क्रेडिट स्कोअर हे ग्राहकाची कर्ज मिळवण्याची क्षमता मोजणारे एक परिमाण आहे. क्रेडिट स्कोअरद्वारे ग्राहकाची कर्ज फेडण्याची आणि उत्पन्न मिळवण्याची क्षमता तपासली जाते. क्रेडिट स्कोअर हा एक 3 अंकांचा क्रमांक आहे. यालाच रेटिंग म्हटले जाते. जितके रेटिंग चांगले, तितके कर्ज मिळवण्याची क्षमता अधिक असते.
क्रेडिट कार्डचे रेटिंग 300 अंकापासून सुरू होते आणि 900 हा क्रेडिट स्कोअरमधील कमाल अंक मानला जातो. कर्ज मिळवण्यासाठी संबंधित ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर किमान 750 असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी स्कोअर असलेल्या ग्राहकांना बँका सहसा कर्ज देत नाही. त्यामुळे होम लोन किंवा कोणत्याही प्रकारचे लोन घेतना कर्ज देणाऱ्या बँका क्रेडिट स्कोअर चेक करतात.
Table of contents [Show]
क्रेडिट स्कोअरद्वारे ग्राहकांची उलट तपासणी
होम लोन हे दीर्घकालीन लोन असते आणि होमलोनच्या कर्जाची रक्कम सुद्धा मोठी असते. ते देताना बँका कर्जाची परतफेड होईल यादृष्टीने सर्व कागदपत्रांची माहिती घेते. पण त्यापूर्वी क्रेडिट स्कोअरद्वारे संबंधित ग्राहकाची क्रेडिट हिस्ट्रीमधून त्याचे व्यवहार तपासले जातात. जसे की, यापूर्वी कोणत्या कर्जाचे हप्ते चुकवले आहेत का? किंवा ईएमआय वेळेवर भरला जातो की नाही? याची माहिती क्रेडिट स्कोअरमधून कळते आणि अशा चुकीच्या गोष्टींचा परिणाम क्रेडिट स्कोअरवर होत असतो.
क्रेडिट स्कोअरमधून काय दिसते?
क्रेडिट स्कोअरमधून ग्राहकाची कर्ज फेडण्याची क्षमता, क्रेडिट कार्डद्वारे मिळणाऱ्या क्रेडिटचा वापर, क्रेडिट कार्डची बिल वेळेवर भरले की नाही. तसेच क्रेडिट लिमिट, क्रेडिटचा प्रकार आदी गोष्टींची माहिती संकलित करून त्या आधारे क्रेडिट स्कोअर मोजला जातो. त्यामुळे चांगला क्रेडिट स्कोअर होमलोनसाठी महत्त्वाचा आहे.
घरासाठी दीर्घकालीन आणि मोठ्या रकमेचे कर्ज घ्यायचे असेल तर चांगला क्रेडिट स्कोअर असणे खूप गरजेचे आहे. होमलोनसाठी किमान 750 पेक्षा जास्त स्कोअर असणे आवश्यक आहे. चांगला स्कोअर असलेल्या ग्राहकांना बँका व्याजदरामध्येही काही प्रमाणात सवलती देतात. चला तर मग याव्यतिरिक्त होमलोन मिळवण्यासाठी चांगला क्रेडिट स्कोअर ठेवण्याची आणखी काय कारणे असू शकतात.
कर्ज मिळवण्याची पात्रता
कर्ज आणि क्रेडिट स्कोअर हे आता एक प्रकारचे समीकरणच बनले आहे. कर्ज मिळवण्याची पहिली पात्रता म्हणजे क्रेडिट स्कोअर. होमलोनसाठी 750 किंवा त्यापेक्षा अधिक क्रेडिट स्कोअर चांगला स्कोअर मानला जातो. यामुळे ग्राहक होमलोन घेण्यासाठी पात्र ठरतो.
व्याजदरात सवलत
ज्या ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर चांगला असतो. त्या ग्राहकांची कर्ज परतफेड करण्याची क्षमता चांगली मानली जाते. त्यामुळे अशा ग्राहकांना बँका सवलतीच्या दरात कर्ज देतात. ज्यांचा क्रेडिट स्कोअर किमान क्रमांकापेक्षा कमी असतो. त्या ग्राहकांना बँका अधिक व्याजाने कर्ज देतात.
कर्ज परतफेडीसाठी जास्तीचा कालावधी
क्रेडिट स्कोअर किमान क्रमांकापेक्षा अधिक असेल तर त्या ग्राहकाची आर्थिक स्थिती चांगली मानली जाते. त्यामुळे अशा ग्राहकांना बँका अनेक प्रकारच्या सवलती देऊन जास्तीत जास्त कर्ज देतात. त्यात ग्राहकांना कर्जाच्या परतफेडीचा कालावधी देखील वाढवून मिळतो.
कर्ज त्वरित मंजूर
होमलोनसाठी अर्ज करताना ग्राहकांकडून विविध प्रकारची कागदपत्रे मागवली जातात. त्या कागदपत्रांबरोबरच बँका संबंधित ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर तपासून त्यानुसार त्याची फाईल पुढील प्रक्रियेसाठी फॉरवर्ड केली जाते. त्यामुळे कर्जा लवकर मंजूर करून हवे असेल तर क्रेडिट स्कोअर चांगला ठेवणे ही तुमची जबाबदारी आहे.
प्रोसेसिंग फी मध्ये सवलत
ज्या ग्राहकाचे आर्थिक व्यवहार चांगले असतात. त्या ग्राहकांना बँकांकडून विविध प्रकारच्या सवलती आणि ऑफर दिल्या जातात. यामध्ये काही बँका कर्जाच्या प्रोसेसिंग फी मध्ये ग्राहकांना डिस्काऊंट देतात. तर काही बँका इतर चार्जेसमध्ये सवलती देतात.
अशाप्रकारे होमलोन घेताना क्रेडिट स्कोअर चांगला असलेल्या ग्राहकांना बँकांकडून अनेक प्रकारच्या सवलती तर मिळतात. पण त्याचबरोबर त्यांची कर्जाची प्रक्रिया लवकर पूर्ण केली जाते. कमी व्याजदराने जास्त कर्ज दिले जाते.