Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Single Premium Insurance Policy: सिंगल प्रीमियम इन्शुरन्स पॉलिसी का खरेदी केली जाते?

Single Premium Insurance Policy

Single Premium Insurance Policy: सिंगल प्रीमियम पॉलिसीसाठी प्रीमियम पेमेंट पद्धतीत मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेमेंट ऐवजी एकरकमी पेमेंट करण्याची सोय असल्याने विना पेमेंट पॉलिसी लॅप्स होण्याची भीती राहत नाही.

Single Premium Insurance Policy: सिंगल प्रीमियम इन्शुरन्स पॉलिसी, ही जीवनाच्या एका विशिष्ट टप्प्यावर आर्थिक सुरक्षितता मिळविण्यासाठी केलेली महत्त्वपूर्ण गुंतवणूक ठरू शकते. यात सिंगल प्रीमियम म्हणून ओळखल्या जाणार्‍या विशिष्ट रकमेचा समावेश असतो. जो इन्शुरन्स  कंपनीला तिच्यासोबत केलेल्या कायदेशीर करारासाठी एकरकमी अदा केला जातो. त्या बदल्यात, कंपनी (इन्शुरर) पॉलिसी टर्मच्या दरम्यान पॉलिसीधारकाचा (इन्शुअर्ड) मृत्यू झाल्यास किंवा पॉलिसी मॅच्युअर्ड झाल्यावर  विशिष्ट रक्कम देते.

पॉलिसी लॅप्स होण्याची भीती नाही

सद्यस्थितीमध्ये कोणतीही लाईफ इन्शुरन्स पॉलिसी तिच्यासाठीच्या प्रीमियमचे पेमेंट आणि पे-आउटचे स्वरूप  या दोन्ही पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणात फ्लेक्झिबिलिटी देते. पण, सिंगल प्रीमियम पॉलिसीसाठीच्या प्रीमियम पेमेंट पद्धतीचे वैशिष्ट्यच आहे की, तिचे Fill it, Shut it and Forget it स्वरूपाचे असणे. कारण मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक प्रीमियम पेमेंट ऐवजी एकरकमी प्रीमिअमचे पेमेंट केलेले असल्याने, पॉलिसीधारकाला पुढील पेमेंट भरण्याची किंवा कोणतेही पेमेंट करण्यास विसरल्यास, त्याची पॉलिसी लॅप्स (LAPSED) होण्याची भीती, काळजी अथवा शक्यताच राहत नाही. त्यामुळेच, बहुतेक इन्शुरन्स कंपन्यांनी ऑफर केलेल्या प्रीमियम भरण्याच्या विविध पद्धतींपैकी, सिंगल प्रीमियम पेमेंट हा सर्वात जास्त मागणी असलेला पर्याय आहे.

ॲडिशनल लाईफ कव्हर

बहुतेक लोक स्वतःकडे असलेली सुरक्षित रक्कम गुंतवणूक करून एकरकमी स्वरूपात खरेदी करता येऊ शकणारी सिंगल प्रीमियम इन्शुरन्स पॉलिसी घेण्यास प्राधान्य देतात. काही वेळा यामागील हेतू हा टॅक्स वाचविणे, तसेच एखाद्या नातेवाईकाकडून वारसा म्हणून मिळालेल्या गिफ्ट कॅशची किंवा बिझनेस-पर्सन्सच्या बाबतीत अचानक झालेल्या नफ्याची (ज्याला Windfall Gains म्हणतात) देखील गुंतवणूक असू शकते. एखाद्याला त्याच्याकडे असलेली रक्कम लगेचच खर्च करायची नसल्‍यास आणि विशेषतः स्टॉक मार्केटमधील इन्वेस्टमेंट्सची खात्री नसलेल्या व्यक्ती ॲडिशनल लाईफ कव्हर (Additional Life Cover) म्हणून देखील सिंगल प्रीमियम पॉलिसी खरेदी करतात.

80C अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत कर सवलत

सिंगल प्रीमियम प्लॅनसाठीच्या प्रिमिअमच्या स्वरूपामध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट टॅक्स-डिडक्शनसाठी उपयुक्त ठरत असली, तरी देखील, इन्कम टॅक्स कायदा, 1961 अंतर्गत सेक्शन 80C अंतर्गत, केवळ 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या केलेल्या गुंतवणुकीसाठी ही  सूट दिली जाते. तसेच डेथ क्लेमची रक्कम ही पॉलिसीधारकाच्या नॉमिनीला सेक्शन 10 (10 (D)) अंतर्गत करमुक्त स्वरूपात प्राप्त होत असते. अर्थात, सिंगल प्रीमियम लाईफ इन्शुरन्स पॉलिसीवर पॉलिसीधारकाला फक्त एकदाच टॅक्स-बेनिफिट्स एन्जॉय करता येतात. कारण त्याने 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या इन्व्हेस्टमेंट-लिमिटचा भाग असणारा प्रीमिअम एकरकमी भरलेला असतो. प्रीमियम एकदाच भरला असला तरी, संपूर्ण पॉलिसी-टर्मसाठी लाईफ-कव्हर प्रदान केले जात असते.

कम्फर्टेबल प्लॅन

याव्यतिरिक्त, पॉलिसीधारक जेव्हा त्याच्या इन्शुरन्स पॉलिसीवर सिंगल प्रीमियम भरत असतो, तेव्हा तो स्वतःसाठी एक मालमत्ता (asset) तयार करीत असतो. ज्याचा त्याला भविष्यात लोन-फॅसिलिटी (कर्ज-सुविधा) एन्जॉय करताना किंवा वर्षानुवर्षे रेग्युलर इन्व्हेस्टमेंट न करताही, एकदाच केलेल्या इन्व्हेस्टमेंटचे रोख मूल्य (Cash Value) तयार करण्यास फायदा होतो. ज्या व्यक्तींकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसे आहेत आणि ज्यांना केलेल्या इन्व्हेस्टमेंट संबधी रेग्युलर-शेड्यूलमध्ये सतत देखरेख ठेवण्यापासून स्वातंत्र्य एन्जॉय करायचे आहे, अशा व्यक्तींसाठी सिंगल प्रीमियम पॉलिसी एक कम्फर्टेबल प्लॅन आहे. याव्यतिरिक्त, ज्या व्यक्तींची उत्पादक-वर्षे (म्हणजे Productive Years) संपत आलेली आहेत किंवा ज्या व्यक्ती वारंवार प्रवास करीत असतात, अशा व्यक्तीदेखील, आपला फंड सिंगल प्रिमिअमद्वारे lumpsum पद्धतीने गुंतवून स्वतःला फायनान्शिअली फ्री घोषित करू शकतात. 

दीर्घकालीन दृष्टीकोनातून बघायचे झाल्यास, रेग्युलर प्रीमियम पेमेंट करायच्या पॉलिसींच्या तुलनेत सिंगल प्रीमिअम पॉलिसीजमुळे लक्षणीय बचत देखील होत असते. या परिस्थितीत पॉलिसीधारक जवळजवळ 30 टक्क्यांपर्यंत बचत करू शकतो.