Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gautam Adani: गौतम अदानी यांच्या पत्नी कोण आहेत, लग्नापूर्वी त्यांनी केली या क्षेत्रात नोकरी

Gautam Adani Wife

Image Source : http://www.facebook.com/

Gautam Adani Wife: अदानी ग्रुप हा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. जगातील श्रीमंताच्या यादीमध्ये असणारे 'गौतम अदानी' हे आता श्रीमंताच्या यादीतूनदेखील बाहेर फेकले गेले आहेत. या बिझनेसमॅनची पत्नी कोण आहे व यापूर्वी त्यांनी कोणत्या क्षेत्रात काम केले आहेत, या सर्व गोष्टी जाणून घेवुयात.

Gautam Adani News: गौतम अदानी हे नाव सध्या अडचणीत सापडले आहे. बिझनेससंबंधी फेरफारबाबत त्यांच्यावर एका ना आरोप  लावले जात आहे. काही महिन्यांपासून श्रीमंताच्या यादीत असणारे हे नाव अचानक या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत. मात्र त्यांची पत्नी कोण आहे व त्यांनी पूर्वी कोणत्या क्षेत्रात काम केले हे जाणून घेण्यासाठी नेटकऱ्यांनी गुगलची भेट घेतली आहे.

गौतम अदानी यांच्या पत्नीचे नाव (Gautam Adani's Wife Name)

उदयोगपती गौतम अदानी यांच्या पत्नीचे नाव प्रिती अदानी (Preeti Adani) आहे. त्यांनी पूर्वी डाॅक्टर म्हणून काम केले आहे. त्यांनी आपल्या कुटुंबासाठी हे क्षेत्र सोडले आहे. यानंतर त्या अदानी फाउंडेशनमध्ये सहभागी झाल्या. त्यांच्यावर या फाउंडेशनची मोठी जबाबदारी देण्यात आली होती. 

अदानी फाउंडेशनमध्ये प्रिती अदानी यांचे मोठे योगदान (Priti Adani's Major Contribution to Adani Foundation)

ज्यावेळी अदानी फाउंडेशनची स्थापना झाली होती, त्यावेळी अदानी ग्रुपमध्ये फक्त दोनच कर्मचारी काम करत होते. मात्र आज ही परिस्थिती बदलली आहे. आज या फाउंडेशनच्या माध्यमातून भारतात दरवर्षी 32 लाख लोकांची मदत केली जाते. या सर्व गोष्टींमध्ये प्रिती अदानी यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले जात आहे. 


अदानी फाउंडेशन व्यतिरिक्त काय करतात प्रिती अदानी (What does Priti Adani do apart from Adani Foundation)

उदयोगपती गौतम पत्नी यांच्या पत्नी प्रिती अदानी या आपला जास्तीत जास्त वेळ अदानी फाउंडेशनला देतात. याव्यतिरिक्त त्या आपला वेळ पुस्तके वाचण्यात घालवितात तसेच नवनवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यास त्या उत्सुक असतात. त्यांचे असे म्हणणे आहे की, स्टार्टअप्स साठी या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. तसेच नवीन आयडिया व प्रेरणा मिळण्यासाठीदेखील फायदेशीर ठरतात. त्यांना गार्डेनिंग करण्याचीदेखील आवड आहे.