Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund : जाणून घ्या, काय आहे व्हाईटओक कॅपिटलची मल्टी कॅप फंड योजना ?

Mutual Fund  : जाणून घ्या, काय आहे व्हाईटओक कॅपिटलची मल्टी कॅप फंड योजना ?

म्युच्युअल फंडातील व्हाइटओक कॅपिटल फंड या कंपनीकडून बाजारात 31 ऑगस्टला मल्टी कॅप फंड योजना लॉन्च करण्यात आली आहे. या योजनेसाठी 14 सप्टेंबर पर्यंत नवीन फंड ऑफर (NFO) सुरू राहणार आहे. व्हाईट ओक कॅपिटल गुंतवणूक दारांचे पैसे निफ्टी 500 मध्ये गुंतवणूक करेल.

वित्तीय बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे नवनवीन पर्याय उपलब्ध होत आहेत. म्युच्युअल फंडात देखील गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्याच प्रमाणे मार्केटमध्ये व्हाईट ओक कॅपिटल म्युच्युअल फंड यांनी  आणखी एक मल्टी कॅप योजना (WhiteOak Capital multi cap fund Mutual Fund) लॉन्च केली आहे. मल्टी कॅप फंडातील गुंतवणूक ही लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप कंपनींमध्ये केली जाते. काय ही योजना याबाबतची माहिती आपण जाणून घेऊयात..

काय आहे मल्टी कॅप फंड?

व्हाईट लूकने लॉन्च केलेली ही म्युच्युअल फंड योजना मल्टी कॅप फंड योजना आहे. मल्टी कॅप फंड मध्ये गुंतवणूकदारांचा पैसा हा 25 % लार्ज कॅप, 25 % मिड आणि 25 % स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये केली जाते. तज्ञांच्या मते दिर्घ कालीन गुंतवणुकीसाठी मल्टीकॅप फंडातील गुंतवणूकीचा पर्याय चांगला आहे. मल्टी कॅप फंडाची गुंतवणूक तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही लार्ज कॅपमध्ये 50% आणि उर्वरीत 25-25% रक्कम मीड आणि स्मॉल कॅपमध्ये देखील गुंतवू शकता.

व्हाइटओक कॅपिटल मल्टी कॅप फंड

म्युच्युअल फंडातील व्हाइटओक कॅपिटल फंड या कंपनीकडून बाजारात 31 ऑगस्टला मल्टी कॅप फंड योजना लॉन्च करण्यात आली आहे. या योजनेसाठी 14 सप्टेंबर पर्यंत नवीन फंड ऑफर (NFO) सुरू राहणार आहे. व्हाईट ओक कॅपिटल गुंतवणूक दारांचे पैसे  निफ्टी 500 मध्ये गुंतवणूक करेल. या योजनेतून लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करत गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देण्याचे कंपनीचे उदिष्ट आहे.

किमान गुंतवणूक किती?


नवीन फंड ऑफर (NFO) कालावधी दरम्यान गुंतवणुकीची किमान रक्कम 500  रुपयांपासून सुरू होईल. तसेच मासिक SIP साठी किमान गुंतवणूक रक्कम 100 रुपये आहे. तर त्रैमासिक SIP साठी किमान गुंतवणुकीची रक्कम 500 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.