Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best Mutual Fund for Long Term: दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कोणते फंड बेस्ट असू शकतात?

Best Mutual Fund for Long Term

Image Source : www.firstfinancial.com

Best Mutual Fund for Long Term: म्युच्युअल फंड मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य फंड उपलब्ध आहेत. यामध्ये इक्विटी, डेब्ट, हायब्रिड, गोल्ड असे विविध प्रकार आहेत. या प्रकारांमध्ये लार्ज कॅप, मीड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्सी कॅप असे उपप्रकारसुद्धा आहेत. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदारासाठी एकच बेस्ट फंड असू शकत नाही.

Best Mutual Fund 2023: गुंतवणुकीच्या इतर पर्यायांसह आता म्युच्युअल फंड हा वैयक्तिक पातळीवर सर्वसामान्यांना सोयीचा ठरू लागला आहे. पूर्वी मुदत ठेवी किंवा पोस्टातील ठेवींना गुंतवणुकीसाठी प्राधान्य दिले जात होते. पण आता ती जागा म्युच्युअल फंडमधील एसआयपी या पद्धतीने घेतली आहे.

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारतात तसे हजारो फंड आणि स्किम्स उपलब्ध आहेत. पण त्यातील माझ्या गुंतवणुकीसाठी बेस्ट फंड कोणता हे निवडणे वाटते तितके सोपे नाही. तुम्ही सुद्धा अशाच बेस्ट फंडच्या शोधात असाल तर, तुम्हाला काही गोष्टींवर विशेष लक्ष द्यावे लागेल. जसे की, जोखीम, गुंतवणुकीचा कालावधी आणि गुंतवणुकीचे उद्दिष्ट्य. यावर आधारित बेस्ट फंड निवडणे थोडेफार सोपे ठरू शकते.

बेस्ट म्युच्युअल फंड म्हणजे काय?

म्युच्युअल फंड मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य फंड उपलब्ध आहेत. यामध्ये इक्विटी, डेब्ट, हायब्रिड, गोल्ड असे विविध प्रकार आहेत. या प्रकारांमध्ये लार्ज कॅप, मीड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्सी कॅप असे उपप्रकारसुद्धा आहेत. या प्रत्येक प्रकारामधील काही बेस्ट पर्याय असू शकतात. त्यामुळे प्रत्येकासाठी एकच असा बेस्ट म्युच्युअल फंड सांगता येणार नाही.

बेस्ट म्युच्युअल फंड हा जोखीम स्वीकारण्याची तयारी, गुंतवणुकीचे उद्दिष्ट्य आणि गुंतवणुकीचा कालावधी यानुसार मात्र नक्कीच ठरवला जाऊ शकतो.  

बेस्ट फंडाची निवड कशी करायची?

गुंतवणूक करताना सर्वांचे एकच उद्दिष्ट्य असते, ते म्हणजे गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळावा. त्याचबरोबर कोणत्याही फंडमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी टॉप आणि बेस्ट फंडामध्ये गुंतवणूक करावी. तर आपण हे टॉप आणि बेस्ट फंड कसे निवडायचे याबाबत जाणून घेऊ.

गुंतवणुकीचा उद्देश

कोणतीही गुंतवणूक करताना त्याचा उद्देश निश्चित करणे गरजेचे आहे. एकदा का तुमचा उद्देश पक्का झाला की, त्यानुसार फंड शोधण्यात मदत होते. जसे की, म्युच्युअल फंडमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायची असून, त्यातून मुलांच्या भविष्यातील शिक्षणासाठी फंड उभा करायचा आहे. अशावेळी स्पेसिफिक दीर्घकाळात चांगली संपत्ती निर्माण करणाऱ्या फंडांची निवड करण्यास सोपे जाते. यासाठी त्या कॅटेगरीतील फंडांनी मागील 10 ते 15 वर्षांत कशा पद्धतीने परतावा दिला आहे. त्याची तुलना करून निर्णय घेता येतो.

फंड हाऊस आणि स्कीमचा इतिहास

एखाद्या फंड हाऊसच्या मागील काही वर्षातील कामगिरी तपासून त्याच्या चांगल्या-वाईट बाजू समजून घेण्यास मदत होते. तसेच या माहितीच्या आधारावर विविध फंडांची तुलना देखील करता येते. त्यामुळे बेस्ट म्युच्युअल फंडची निवड करताना त्याचा इतिहास व मागील कामगिरी समजून घेणे आवश्यक आहे.

खर्चाचे प्रमाण

गुंतवणूक करताना त्या गुंतवणुकीच्या खर्चाचे प्रमाण नगण्य किंवा नसल्यासारखे असावे. कारण दीर्घकाळातील गुंतवणुकीवर याचा विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ज्या गुंतवणुकीत खर्चाचे प्रमाण कमी आहे. त्याची निवड करावी.

फंड मॅनेजरची कामगिरी

म्युच्युअल फंडमध्ये फंडाची निवड करताना त्याचा फंड मॅनेजर हा खूप महत्त्वाचा असतो. फंडमध्ये जमा होणारा निधी हा कुठे आणि कसा गुंतवायचा याचा निर्णय फंड मॅनेजर घेतो. त्यामुळे त्याची कामगिरी तपासणे सुद्धा गरजेचे आहे.

फंडाची कामगिरी

कोणत्याही फंडमध्ये गुंतवणूक करताना त्याची नियमित कामगिरी तपासणे आवश्यक असते. काही फंडांची स्पेसिफिक सेक्टरमध्ये गुंतवणूक असते. त्याचा परिणाम त्या फंडमधील गुंतवणुकीवरही होत असतो. त्यामुळे वेळोवेळी फंडाची कामगिरी तपासणे आवश्यक आहे.

अशाप्रकारे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या गुंतवणुकीसाठी कोणता फंड बेस्ट ठरू शकतो. हे तुम्हीच ठरवू शकता.