कार खरेदी करण्यापूर्वी खरेदीदारानं आपलं बजेट (Budget), गरजा (Need) आणि लाइफस्टाइल (Lifestyle) यासारख्या विविध गोष्टींचा विचार करायला हवा. तसंच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नवीन कार घ्यायची की जुनी कार? कारण दोन्हींचे फायदे तसंच तोटेदेखील आहेत. नवीन कार सर्व सर्व अद्ययावत वैशिष्ट्यं (Features) आणि तंत्रज्ञानानं (Technology) सुसज्ज असते. ती वॉरंटीसह आपल्याला मिळते. जुन्या कारपेक्षा नवीन कार जास्त महाग असते. दुसरीकडे, वापरलेल्या किंवा जुन्या कारसाठी खरेदीदारांना कमी पैसे खर्च करावे लागतात. या कारमध्ये अद्ययावत वैशिष्ट्यं किंवा तंत्रज्ञान नव्या गाडीच्या तुलनेत कमी असते. कार जुनी झाल्यानं त्याची झीजदेखील दिसून येते.
Table of contents [Show]
कसं ठरवायचं?
तुम्हाला नवीन कार घ्यायची आहे की वापरलेली हे आर्थिकदृष्ट्या कसं ठरवायचं? हा संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहोत. कार खरेदी करताना या बाबी तुम्हाला उपयोगी पडतील. फायनान्शियल एक्स्प्रेसनं याचा आढावा घेतला आहे.
बजेट किती?
तुमच्या बचतीपैकी किती रक्कम तुम्ही कार खरेदी करण्यासाठी गुंतवू शकता याचा विचार आधी करणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे कार खरेदी करण्यासाठी लिमिटेड बजेट असेल, तर नवीन कारऐवजी वापरलेली कार खरेदी करणं हा एक चांगला पर्याय ठरतो. BankBazaar.com चे सीईओ आदिल शेट्टी यांनी याबाबत सांगितलं आहे. ते म्हणतात, की नवीन कार खरेदी केल्यानं प्रतिष्ठेची भावना येते. नवी कारमध्ये सर्व लेटेस्ट फीचर्स असतात.
ते म्हणतात, की असा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या आर्थिक स्थितीवर काय परिणाम होणार आहे, याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण कार खरेदी केल्यानंतर बजेटवर दबाव वाढेल. तुम्ही ठरवलेली आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य करण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. याउलट वापरलेल्या कारचा निर्णय घेतला तर पैसे वाचतात आणि शक्यतो खर्चही कमी येतो.
गरज ओळखा
तुम्हाला खरोखरच कारची गरज आहे का, हे आधी तपासा. जर तुम्हाला रोजच्या प्रवासासाठी कार गरजेची असेल तर वापरलेली कार खरेदी करणं हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तर तुम्हाला कामासाठी किंवा लांब कुठेतरी सहलीसाठी कार हवी असेल तर नव्या कारचा पर्याय चांगला ठरू शकतो.
कशाप्रकारे करता कारचा वापर?
तुम्ही तुमची कार नेमकी कशी वापरता? जर तुम्ही तुमची कार ऑफ रोड ड्रायव्हिंगसाठी वापरत असाल तर नवीन कार हाच एक चांगला पर्याय असू शकतो. दुसरीकडे, जर तुम्ही तुमची कार येण्या-जाण्यासाठी किंवा कामासाठी वापरत असाल, तर जुनी कार हा एक चांगला पर्याय असू ठरतो.
कधीपर्यंत वापरावी कार?
काही वर्षांनंतर कारची किंमत किती असेल? जर तुम्ही काही वर्षांत कार विकण्याचा विचार करत असाल, तर नव्या कारमध्ये गुंतवणूक करणं हा चांगला पर्याय असू शकत नाही. दुसरीकडे, जर तुम्ही कार दीर्घकाळ ठेवण्याचा विचार करत असाल तर नवी कार ही यातली एक चांगली गुंतवणूक ठरू शकते.