Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

अगदी बजेटमध्ये खरेदी करता येईल 'ही' कार, 24kmpl पेक्षा जास्त मायलेज देण्याचा कंपनीचा दावा

Cheapest Car In India

Image Source : www.cardekho.com

Cheapest Car In India : भारतीय ग्राहक कार खरेदी करतांना, तिची किंमत, कमी देखभाल खर्च आणि ती गाडी किती मायलेज देते यासारख्या बाबी विचारात घेतात. यावेळी आपण जर, देशातील सर्वात स्वस्त कार बाबत बोललो, तर ती मारुती सुझुकी अल्टो K10 मॉडेल आहे. ही कार बजेट फ्रेंडली असण्याबरोबरच मायलेजमध्येही उत्तम आहे.

Alto K10 Model : मारुती सुझुकी कंपनीची अल्टो K10  कार बजेट फ्रेंडली असण्याबरोबरच उत्तम मायलेजही देते. ही कार अनेक प्रकारांमध्ये येते. भारतीय ग्राहक कार खरेदी करतांना, तिची किंमत, कमी देखभाल खर्च आणि ती गाडी किती मायलेज देते यासारख्या बाबी विचारात घेतात. यावेळी आपण जर, देशातील सर्वात स्वस्त कार बाबत बोललो तर ती मारुती सुझुकी अल्टो K10 मॉडेल आहे. आज आपण अल्टो K10 मॉडेलच्या बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी व्हेरिएंटबद्दल सांगणार आहोत. Maruti Suzuki Alto ही कार ४ व्हेरिएंट आणि सहा रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

मारुती सुझुकी Alto K10 ची किंमत

Maruti Suzuki Alto K10 Std ची किंमत 3 लाख 99 हजार रुपये आहे. Maruti Suzuki Alto K10 LXi ची किंमत 4 लाख 83 हजार रुपये आहे. Maruti Suzuki Alto K10 VXi ची किंमत 5 लाख 6 हजार रुपये आहे. तर Maruti Suzuki Alto K10 VXi Plus ची किंमत 5 लाख 35 हजार रुपये आहे.

मारुती सुझुकी Alto K10 Std

Maruti Suzuki Alto K10 Std हा कारचा मूळ प्रकार आहे. यात 13-इंचाची स्टील व्हील, ड्रायव्हर आणि पॅसेंजर सन व्हिझर्स, केबिन एअर फिल्टर, फ्रंट कन्सोल स्टोरेज स्पेस, डिजिटल स्पीडोमीटर, ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि मागील पार्किंग सेन्सर यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

मारुती सुझुकी Alto K10 VXi

Maruti Suzuki Alto K10 VXi या कारच्या VXi व्हेरियंटला पुढील बाजूस पॉवर विंडो देण्यात आली आहे. ही कार LXi प्रकाराप्रमाणेच इंधन कार्यक्षमता राखून ठेवते, परंतु या गाडीची किंमत थोडी जास्त आहे. यात रूफ अँटेना, फ्रंट पॉवर विंडो, AUX आणि USB पोर्ट, मॅन्युअली-अ‍ॅडजस्टेबल विंग मिरर, ब्लूटूथसह 2-DIN स्मार्टप्ले ऑडिओ सिस्टम आणि गीअर शिफ्ट इंडिकेटर यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

मारुती सुझुकी Alto K10 LXi

Maruti Suzuki Alto K10 LXi व्हेरियंटमध्ये बॉडी-रंगीत बंपर, हीटरसह मॅन्युअल एसी आणि खालच्या वेरिएंटवर पॉवर स्टीयरिंग यांसारखी अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत. हा प्रकार ABS, ड्युअल एअरबॅग्ज आणि 24.39 kmpl चे प्रभावी मायलेज देते. यात पॉवर विंडो नाहीत.

मारुती सुझुकी Alto K10 VXi Plus

Maruti Suzuki Alto K10 VXi Plus हा कारचा टॉप व्हेरिएंट प्रकार आहे. यात मागील पार्सल शेल्फ, सिल्व्हर अॅक्सेंट, रिमोट लॉकिंग, 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले, व्हॉईस कंट्रोलसह स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स आणि VXI प्रकारात 4 स्पीकर मिळतात.

उत्तम मायलेज देणारी कार कोणती ?

तुम्हाला जर कमी बजेट मध्ये उत्तम मायलेज देणारी कार पाहिजे असेल, तर तुमच्यासाठी मारुती सुझुकी अल्टो K10 LXi हा सर्वोत्तम पर्याय आहे. याची एक्स-शोरूम किंमत 4 लाख 83 हजार रुपये आहे आणि ही कार तुम्हाला 24.39 kmpl चा मायलेज देते.