वॉरंटी म्हणजे काय? (What is Warranty)
वॉरंटी म्हणजे वस्तू खरेदी केल्यानंतर त्या त्या प्रोडक्टनुसार वापरण्याची काही वर्षाची वॉरंटी (विश्वाससार्हता) दिली जाते. त्यांनी दिलेल्या त्या वर्षात ती वस्तू खराब झाली तर तुम्हाला ती वस्तू मोफतमध्ये दुरूस्त करून मिळते किंवा त्याबदल्यात ती वस्तू सेम दिली जाते. ही वॉरंटी लेखी स्वरूपात दिली जाते. तुम्हाला दिलेल्या या वॉरंटी कालावधीचे फक्त तुमच्याकडे बिल असणे आवश्यक आहे. उदा, समजा तुम्ही एक फ्रीज खरेदी केला आहे. त्यावर तुम्हाला एक वॉरंटी कार्ड दिले जाते. त्यावर एक वर्षाची वॉरंटी असल्याचे नमूद केलेले आहे. तर तुम्ही ते कार्ड सांभाळून ठेवावे. जर तो फ्रीज एक वर्षाच्या आत खराब झाला, तर तुम्ही ते वॉरंटी कार्ड दाखवून दुरूस्ती करून घेवु शकता. यासाठी तुम्हाला काही चार्जेसदेखील लागणार नाही.
गॅरंटी म्हणजे काय? (What is Guarantee)
गॅरंटी म्हणजे खरेदी केलेल्या वस्तू ओरिजिनल व मजबूत असेल हा दिलेला विश्वास. जर ही वस्तू खराब झाली तर तुम्ही खरेदी केलेली वस्तू वॉरंटी कालावधीपर्यंत दुरूस्त करून घेवू शकता. यासाठी तुम्हाला काही चार्जेस देण्याची आवश्यकता नाही.