Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Motors Dividend : टाटा मोटर्सचा लाभांश कधी येणार? लवकरच होणार फैसला

Tata Motors Dividend : टाटा मोटर्सचा लाभांश कधी येणार? लवकरच होणार फैसला

Tata Motors Dividend : टाटा मोटर्स आपला लाभांश कधी देणार याविषयी चर्चा सुरू आहे. त्यातच आता महत्त्वाची बातमी समोर आलीय. कंपनी सुमारे 5 वर्षांनंतर लाभांश देणार आहे. याआधी 2016च्या आर्थिक वर्षात कंपनीनं लाभांश दिला होता.

स्टॉक रिटर्न्सव्यतिरिक्त (Stock return) लाभांशाच्या माध्यमातून गुंतवणूकदार शेअर बाजारात (Share market) चांगली कमाई करू शकतो. टाटा ग्रुपचे शेअर्स सर्वाधिक पसंतीचे शेअर्स मानले जातात. सामान्य असो अथवा विशेष, सर्वच प्रकारांमध्ये टाटा समुहाला (Tata group) पसंती दिली जाते. त्यातही टाटा मोटर्सच्या शेअर्सना गुंतवणूकदार अधिक पसंती देतात. कंपनीनं याआधी 5 वर्षांपूर्वी लाभांश दिला होता. झी बिझनेच्या वृत्तानुसार, 2016च्या आर्थिक वर्षात ऑटो कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना (Investors) लाभांश दिला होता. मध्यंतरी मात्र सतत तोट्यात राहिल्यानं आपल्या गुंतवणूकदारांना कंपनी लाभांश देऊ शकली नाही.

टाटा मोटर्सची बोर्ड मिटिंग

टाटा मोटर्सची बोर्ड मिटिंग 12 मेला असणार आहे. आर्थिक वर्ष 2016नंतर प्रथमच कंपनी लाभांश जाहीर करू शकते. लाभांश देण्यासाठी कोणत्याही आर्थिक वर्षात नफा असणं गरजेचं आहे. तोट्यामुळे आतापर्यंत कंपनीला लाभांश मिळाला नव्हता. कंपनीच्या लाभांश वितरण धोरणात अनेक बाबींमध्ये नफ्याचा समावेश होतो. मधल्या काळात कंपनीला तोटा झाला. मात्र आता लाभांश दिला जाणार आहे.

कमी नफ्यामुळे लाभांश नाही…

वर्षाचा नफा (कोटींमध्ये)

  • आर्थिक वर्ष 22 -1391
  • आर्थिक वर्ष 21 -2395
  • आर्थिक वर्ष 20 -7290
  • आर्थिक वर्ष 19 +2021
  • आर्थिक वर्ष 18 -1035
  • आर्थिक वर्ष 17 -2480
  • आर्थिक वर्ष 16 234

तिमाही नफा (कोटींमध्ये)

  • Q3 आर्थिक वर्ष 23 506
  • Q2 आर्थिक वर्ष 23 -293
  • Q1 आर्थिक वर्ष 23 -181
  • Q4 आर्थिक वर्ष 22 +413
  • Q3 आर्थिक वर्ष 22 175
  • Q2 आर्थिक वर्ष 22 -659
  • Q1आर्थिक वर्ष 22 -1321
  • Q4 आर्थिक वर्ष 21 +1646
  • Q3 आर्थिक वर्ष 21 -638
  • Q2 आर्थिक वर्ष 21 -1212
  • Q1 आर्थिक वर्ष 21 -2190
  • Q4 आर्थिक वर्ष 20 -4871
  • Q3 आर्थिक वर्ष 20 -1040
  • Q2 आर्थिक वर्ष 20 -1282
  • Q1 आर्थिक वर्ष 20 -97

लाभांश म्हणजे काय?

शेअर मार्केटमध्ये डिव्हिडंड म्हणजेच लाभांश ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. भागधारकांना दिलं जाणारं पेमेंट म्हणजेच लाभांश होय. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या अधिकृत वेबसाइटवर याचा उल्लेख येतो. लाभांश हा आपल्या कंपनीच्या नफ्यातला एक भाग असतो. उत्पन्न मिळवण्यात याची मोठी मदत होत असते. लाभांश देणाऱ्या कंपनीचे भागधारक तोपर्यंत पात्र आहेत, जोवर डिव्हिडंड म्हणजेच लाभांश मुदतीपूर्वी त्यांच्याकडे असतो. कंपनी लाभात असेल म्हणजेच नफ्यात असेल तरच लाभांश दिला जातो. जसं की टाटा ग्रुपची उपकंपनी असलेल्या टाटा मोटर्सनं मागच्या पाच वर्षांत लाभांश दिला नाही. कारण अपेक्षित नफा कंपनीला मिळाला नाही.

कधी दिला जाऊ शकतो लाभांश?

नफा झाल्यावर कंपनी लाभांश देऊ शकते. तर राखून ठेवलेल्या कंपनीच्या कमाईमधूनही लाभांश दिला जाऊ शकतो. वर्षानुवर्षे जमा झालेल्या नफ्याचं ते एक प्रकारचं बचत खातंच असतं. कंपन्या स्टॉकमध्ये लाभांशदेखील देऊ शकतात. याचा अर्थ ते रोख रकमेऐवजी इक्विटी शेअर्स देत असतात. लाभांशचा निर्णय कंपनीचा असतो.  कंपनीच्या समभागांना डिव्हिडंड यील्ड स्टॉक्स म्हटलं जातं. पीएसयू (Performance Stock Unit) क्षेत्रातल्या बहुतांश कंपन्या आपल्या भागधारकांना लाभांश देत असतात.