• 05 Feb, 2023 13:25

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Electric Car Charging: पेट्रोल पंपप्रमाणे इलेक्ट्रिक कार चार्जिगं स्टेशनचं जाळ भारतभर कधी पसरणार?

electric car charging

चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांबरोबरच दुचाकींच प्रमाणही वाढत आहे मात्र, या सगळ्या गाड्यांना चार्ज करण्यासाठी पब्लिक चार्जिंग स्टेशन किंवा कम्युनिटी चार्जिंग स्टेशनची संख्या पाहिजे त्या प्रमाणात वाढलेली नाही. पेट्रोल डिझेल वाहन घेऊन घरातून बाहेर पडल्यावर सहज कुठेही पेट्रोल पंप मिळतो. तसे इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट कधी उभे राहतील?

भारतामध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेय. पेट्रोल, डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या असल्याने दीर्घ काळाचा विचार करुन ग्राहकांची पसंती इव्ही कारला मिळायला लागलीय. आघाडीच्या वाहन निर्मिती कंपन्यांनीही इव्ही कारची नवनवीन मॉडेल्स बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. वाहन निर्मिती कपंन्यांना सरकारी सहाय्यही मिळत आहे. मात्र, इव्ही वाहन घराघरात पोहचण्यासाठी चार्जिंगसाठीच्या पायाभूत सुविधा उभ्या राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

चार्जिगं स्टेशनची संख्या कमी (Few EV charging station in India)

चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांबरोबरच दुचाकींच प्रमाणही वाढत आहे मात्र, या सगळ्या गाड्यांना चार्ज करण्यासाठी पब्लिक चार्जिंग स्टेशन किंवा कम्युनिटी चार्जिंग स्टेशनची संख्या पाहिजे त्या प्रमाणात वाढलेली नाही. पेट्रोल डिझेल वाहन घेऊन घरातून बाहेर पडल्यावर सहज कुठेही पेट्रोल पंप मिळतो. एखादी गोष्ट सहज मिळणं त्यासाठी जास्त फिरत बसावं न लागणं, ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे चिंता वाटत नाही. इलेक्ट्रिक वाहन चालक सध्या या चिंतेतून जात आहेत. गाडी घेऊन कोठेही जाताना आधी त्या ठिकाणी चार्जिंगची सुविधा आहे का? हे त्यांना पहावे लागते, त्यानुसारच प्रवासाचे नियोजन करावे लागते. अन्यथा अडकून पडण्याची शक्यता आहे.

ग्रामीण भागात चार्जिंग स्टेशन उभारण्यात आव्हान (Very Few EV charging Station in India)

अद्याप भारतातील टायर-1 आणि टायर-2 शहरांमध्ये चार्जिंग स्टेशनचे नेटवर्क पुरेसे उभे राहिले नाही. ग्रामीण भाग तर यापासून अद्याप बराच दूर आहे. भारतातील ग्रामीण भागात विजेची समस्या मोठी आहे. कायम लोडशेडिंग असते. तसेच गावागांवातील अंतरही जास्त असते. अशा वेळी महामार्गांवर चार्जिगं पाँइंट भविष्यात येण्यास आणखी बराच काळ जाऊ शकतो. वाहन निर्मिती कंपन्यांनी हे काम खासगी कंपन्यांवर सोडले आहे. त्यामुळे भविष्यात चार्जिंग सुविधा देणारी एक वेगळीच इंडस्ट्री उभी राहू शकते. ग्राहकांना जर सहज चार्जिंगची सुविधा उपलब्ध झाली तर भविष्यात भारतात मोठ्या प्रमाणात इव्ही गाड्या वाढतील.

मागील वर्षापर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये फक्त 2,700 चार्जिंग स्टेशन्स होते. तर साडेपाच हजार चार्जिंग कनेक्टर्सची सुविधा होती. 2025 पर्यंत चार्जिंग स्टेशनची भारतातील संख्या पाच हजारांवर जाण्याची शक्यता आहे. 2030 पर्यंत भारताला सुमारे वीस लाखांपेक्षा जास्त चार्जिंग स्टेशनची गरज पडू शकते. हे खूप मोठे आव्हान आहे. त्यामुळे या क्षेत्राकडे खासगी कंपन्या आकर्षित झाल्या असून अनेक कंपन्या आपलं चार्जिंग स्टेशनचं नेटवर्क वाढवत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीसाठी सरकारी योजनांमधूनही मदत दिली जात आहे.

हिरो इलेक्ट्रिक कंपनीचे सीइओ सोहिंदर गील यांनी नुकतेच माध्यमांशी बोलताना सांगितले की, Statiq, BOLT, Charzer, Massive Mobility, and Log9 या कंपन्यांशी सहकार्य करून आम्ही देशामध्ये 1 लाख चार्जिंग पाँइट उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यासोबतच इतरही अनेक आघाडीच्या वाहननिर्मिती कंपन्या चार्जिगं स्टेशन उभारणीसाठी इतर खासगी कंपन्यांशी सहकार्य करत आहे. स्वस्तात, सहज, आणि सोप्यापद्धतीने ही सुविधा ग्राहकांना उपलब्ध झाली तर तरंच भारताचं इव्ही ड्रीम पूर्ण होईल.