जर तुमच्याकडे Apple iPhone 6, First Generation iPhone SE किंवा कोणताही जुना Android फोन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. असे होऊ शकते की तुम्हाला WhatsApp वापरण्यात अडचण येत आहे किंवा ते तुमच्या फोनवर चालत नाही. कारण 1 फेब्रुवारीपासून काही स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅपचा (Whatsapp) सपोर्ट बंद करण्यात आला आहे. एचटी टेकच्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपने जुन्या अँड्रॉइड आणि आयओएस व्हर्जनसह स्मार्टफोनमधील सपोर्ट बंद केला आहे.
अँड्रॉइड (Android) फोनवर व्हॉट्सॅप (WhatsApp) चालवण्यासाठी, Android 4.0.3 किंवा नवीन व्हर्जनसाठी सपोर्ट असायला हवा. दुसरीकडे, जर आपण आयओएस (iOS) बद्दल बोललो तर, iOS व्हर्जन 12 किंवा त्यापेक्षा अधिकमध्ये व्हॉट्सॅप सपोर्ट करत आहे. अशा परिस्थितीत या खालील ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणाऱ्या सर्व उपकरणांमध्ये व्हॉट्सॅप (WhatsApp) सपोर्ट बंद करण्यात आला आहे.
व्हॉट्सॅप चालत नसेल तर काय करावे?
जर तुमच्याकडे असा स्मार्टफोन असेल ज्याचा या यादीत समावेश नाही, तरीही WhatsApp चालू नसेल, तर तुमची ऑपरेटिंग सिस्टीम ताबडतोब अपडेट करा. तुम्ही जुनी आवृत्ती असलेला Android स्मार्टफोन वापरत असाल, तर तुमच्याकडे Android आवृत्ती 4.0.3 किंवा अपडेट असायला हवे. अधिक त्याच वेळी, आयफोन वापरकर्त्यांनी त्यांचा फोन iOS 12 सह अपडेट केला पाहिजे.
या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही
- Apple iPhone 6S
- Apple iPhone 6S Plus
- Apple iPhone SE (1st Gen)
- Samsung Galaxy Core
- Samsung Galaxy Trend Lite
- Samsung Galaxy Ace 2
- Samsung Galaxy S3 Mini
- Samsung Galaxy Trend Ii
- Samsung Galaxy X Cover 2
- Vinco Darknight
- Archos 53 Platinum
- ZTE V956 – Umi X2
- ZTE Grand S Flex
- ZTE Grand Memo
- Huawei Ascend Mate
- Huawei Ascend G740
- Huawei Ascend D2
- Lg Optimus L3 Ii Dual
- Lg Optimus L5 Ii
- Lg Optimus F5
- Lg Optimus L3 Ii
- Lg Optimus L7ii
- Lg Optimus L5 Dual
- Lg Optimus L7 Dual
- Lg Optimus F3
- Lg Optimus F3q
- Lg Optimus L2 Ii
- Lg Optimus L4 Ii
- Lg Optimus F6
- Lg Act
- Lg Lucid 2
- Lg Optimus F7
- Sony Xperia M
- Lenovo A820
- Feya F1thl W8
- Vico Sync Five