Did not get cash from ATM but deducted complaint letter: प्रत्येकाच्या बाबतीत ATM बाबत ही गोष्ट घडतेच. एटीएममधून पैसे बाहेर येत नाही, मात्र बॅंकेतून पैसे कट झाल्याचा मॅसेज येतो. पण या परिस्थितीत घाबरू नका, टेंशन बिलकूल घेऊ नका. यापुढे काय करायचे हे खालीलप्रमाणे लक्षात ठेवा.
Where can I complain about ATM withdrawa: आजकाल कॅश रक्कम कोणतीही व्यक्ती सहसा खिशात ठेवत नाही. तो एक तर डिजिटल पेमेंट करतो किंवा एटीएमच्या भरवशावर बसतो. मात्र कधी ही तुम्ही ज्यावेळी एटीएमध्ये (ATM) जाता, त्यावेळी एटीएममधून पैसे निघत नाही, मात्र पैसे कट झाल्याचा मॅसेज येतो. त्यावेळी खूप टेंशन येते. मात्र अशा परिस्थितीत काय करायचे यासंबंधी आम्ही अधिक माहिती तुम्हाला सांगणार आहोत.
5 दिवसात पैसे पुन्हा जमा होतात (Money is Re-Deposited in 5 Days)
जर कधी तुमचे एटीएमधून पैसे आले नाही, मात्र पैसे कट झाल्याचा मॅसेज आला अशावेळी बिलकूल घाबरू नका. कारण ही गोष्ट काहीवेळा तांत्रिक बिघाड असला की घडते. मात्र तुमचे हे कट झालेले पैसे 5 दिवसांच्या आत पुन्हा खात्यात जमा होते. कारण रिझर्व्ह बॅंकेचा तसा नियम आहे. जर त्या बॅंकेने तुमचे हे पैसे कामकाज सुरू असलेल्या पाच दिवसात जमा नाही केले, तर त्या बॅंकेला प्रति दिवशी 100 रूपये दंड दयावा लागतो.
जर हे पैसे 5 दिवसाच्या आत जमा झाले नाही तर...(If this Money is Not Deposited Within 5 Days...)
जर हे पैसे 5 दिवसाच्या आत पुन्हा खात्यात जमा झाले नाही, तर तुम्ही व्यवहार अयशस्वी झाल्यासंबंधी बँकेच्या शाखेकडे तक्रार करावी. जर तुम्ही तक्रार करून ही तुमचे पैसे एका महिन्याच्या आत खात्यात जमा झाली नाही, तर तुम्ही पुन्हा ‘तक्रार निवारण विभागा’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.
ऑनलाइन किंवा फोनवर तक्रार(Complain Online or Over the Phone)
प्रत्येक बॅंकेचा टोल नंबर हा फ्री असतो. त्या त्या बॅंकेच्या फोनवर काॅल करून तुम्ही तक्रार करू शकता. मात्र त्या त्या बॅंकेची एक ठराविक वेळ असते. त्या वेळेतच तुम्ही काॅल करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक बॅंकेच्या वेगवेगळया वेबसाइट असतात. त्या वेबसाइटला भेट देऊन, तुम्ही तेथे ही आपली ऑनलाइन तक्रार करू शकता.