Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Property documents: मालमत्तेची कागदपत्रे हरवल्यास काय करावे? माहित करून घ्या

Property documents

Property documents: आपल्याकडे असलेली मालमत्ता (property) आपलीच आहे, हे सिद्ध करण्यासाठी महत्वाचे असते ते म्हणजे कागदपत्रे. कागदपत्रांशिवाय मालमत्तेच्या बाबतीतील कोणतेही काम होत नाही. मग जर तुमच्या मालमत्तेचे कागदपत्रे हरवले तर काय कराव? जाणून घ्या या लेखातून

Property documents: जेव्हा तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी करता तेव्हा त्याचा मागोवा घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीच्या मालकीचे प्रूफ.  त्यात जमीन किंवा मालमत्तेची संपूर्ण माहिती असते. त्यामध्ये मालमत्तेविषयी सर्व डिटेल्स दिलेल्या असतात. जर तुम्ही भविष्यात मालमत्ता विकण्याचा विचार करत असाल तर या कागदपत्रांशिवाय (Property documents) तुम्ही ते करू शकणार नाही. एखाद्या वेळी चुकीने कागदपत्रे हरवले तर तुम्ही काय केले पाहिजे? हे माहित करून घेऊया. ते कागदपत्रे भविष्यात वेळोवेळी कामी येणार असल्याने ते नवीन बनवणे किंवा त्याच कागद पत्रांचा शोध घेणे महत्वाचे ठरते. 

एफआयआर नोंदविणे महत्वाचे.. (Registration of FIR is important..)

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांना याची माहिती देणे. कागदपत्रे शोधणे सोपे नाही, परंतु एफआयआर नोंदविल्यानंतर तुमच्या मालमत्तेच्या कागदपत्रांचा (Property documents) काही गैरवापर झाला तरी तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. कागदपत्रे शोधण्यास सुद्धा मदत होऊ शकते. 

वर्तमानपत्रात जाहिरात दिली पाहिजे (Advertisement should be given in newspaper)

मालमत्तेची कागदपत्रे (Property documents) हरवल्यास, तुम्ही वर्तमानपत्रात जाहिरात प्रकाशित करू शकता. त्यात तुमचा मोबाइल नंबर सुद्धा द्या. जेणेकरून कोणाला कागदपत्रे मिळाली तर तो तुमच्याशी संपर्क साधू शकेल, आणि तुमचे कागदपत्रे तुमच्या पर्यंत पोहचवू शकेल. 

हरवलेल्या कागदपत्रांबाबत रजिस्ट्रारकडे सुद्धा नोंद करा  (Also report the lost documents to the registrar)

जर तुमच्या मालमत्तेची कागदपत्रे हरवली असतील तर त्याबाबत सर्व डिटेल्स स्टॅम्प पेपरवर लिहा. मालमत्तेची डिटेल्स, एफआयआर लेटरची झेरॉक्स आणि जाहिरातीची झेरॉक्स (Property details, xerox of FIR letter and xerox of advertisement) त्याला जोडा.  हे संपूर्ण कागदपत्रे रजिस्ट्रारकडे सबमिट करा. हे सर्व कागदपत्रे नोटरीद्वारे नोंदणीकृत, प्रमाणित आणि नोटरी केलेले असावेत.

हरवलेल्या कागद पत्रांची नवीन कॉपी मिळवू शकता  (You can get new copies of lost documents)

वर दिलेल्या  तिन्ही गोष्टींची पूर्तता केल्यावर तुम्हाला प्रॉपर्टीच्या कागदपत्रांची डुप्लिकेट कॉपी मिळू शकते. त्यासाठी एफआयआरची कॉपी, वृत्तपत्राची नोटीस आणि नोटरीकृत पडताळणी कागदपत्रे  निबंधकाकडे जमा करावे लागतील. हे सबमिट केल्यानंतर, तुम्हाला एक निश्चित शुल्क भरावे लागेल आणि त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रार कार्यालयातूनच डुप्लिकेट पेपर घेऊ शकता.