डिजीटल व्यवहाराला (Digital payments) प्राधान्य देण्यास सुरुवात झाल्यानंतर आता मोबाइलवरच्या विविध अॅप्सच्या माध्यमातून काही क्षणात पैशांचे व्यवहार पूर्ण होतात. दुसरीकडे एटीएम (Automated teller machine) ही देखील पैशांचा व्यवहार करण्याची एक सुलक्ष पद्धती आहे. दशकभरापासून याचा वापर अधिक प्रमाणात केला जात आहे. केवळ बँक शाखांमध्येच नाही तर शॉपिंग मॉल्स, गॅस, पेट्रोल पंप आणि अन्य खरेदीवेळी एटीएम कार्ड आता अत्यावश्यक झालंय. खरं तर कॅश सांभाळणं हे जिकिरीचं काम असतं. ती हरवण्याचा धोका असतो. शिवाय चोरीचीही शक्यता असते. आपण हा विचार करून एटीएमरुपी बँक जवळ बाळगत असतो. आपले पैसे सुरक्षित असल्याचं आपल्याला वाटतं. मात्र आपली एक चूक सायबर ठगांना मालालाल करते.
Scammers are now using your heat signature to predict your ATM PIN. Stay smart to protect yourself from banking frauds@DFS_India @Cyberdost @AmritMahotsav #UnionBankOfIndia #GoodPeopleToBankWith #CyberJaagrooktaDiwas pic.twitter.com/qo6bB8WBtD
— Union Bank of India (@UnionBankTweets) April 5, 2023
स्कॅमरचा वापर करून फसवणूक
एटीएम कार्डाच्या माध्यमातून आपल्याला विविध सुविधा मिळतात. कार्यक्षमता आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत हे एटीएम कार्ड अॅडव्हान्स्ड आहेत. मात्र हे तंत्रज्ञान जसजसं विकसित होतंय, तसतसं एटीएम फसवणुकीच्या पद्धतीही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. एटीएममधून पैसे काढत असताना टच स्क्रीनचा वापर होतो. तर की-बोर्डवर आपण पिन जनरेट आणि इतर पर्याय ऑपरेट करत असताना आपल्या बोटांचे ठसे मागे राहतात. याचाच गैरफायदा हे ऑनलाइन ठग घेतात. स्कॅमरच्या (Scammers) माध्यमातून एटीएमचा पिन शोधला जातो. तो संबंधित ठगाला कळतो आणि आपण फसवणुकीला बळी पडतो.
कसा करायचा फसवणुकीपासून बचाव?
- 5 एप्रिलला सायबर जागरुकता दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त युनियन बँक ऑफ इंडियानं अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचं आवाहन केलं. आपण जागरुक असू तर सायबर हल्ले होण्याची शक्यता कमी होते. अशा फसवणुकीपासून कशी सावधगिरी बाळगावी, हेही बँकेनं स्पष्ट केलं. एटीएममधून पैसे काढतेवेळी तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. या माध्यमातून तुम्ही सुरक्षित राहू शकाल.
- एटीएममध्ये गेल्यानंतर पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणतेही रॅन्डम क्रमांक टाकावेत, ज्याला कोणताही अर्थ असणार नाही. त्यामुळे एटीएमवर असं काही चित्र तयार होईल, ज्याला काहीही अर्थ असणार नाही. त्याचा परिणाम असा, की स्कॅमर तुमचा पिन शोधून काढू शकणार नाही.
- जशी गरज तसं एटीएम हेच आपण पाहत असतो. जिथे एटीएम दिसेल तिथून पैसे काढण्याचा आपला प्रयत्न असतो. अशावेळी ज्या कोणत्या एटीएममध्ये जाणार आहोत, तिथली उपकरणं योग्य आहेत का, की काही संशयास्पद दिसतंय, हे तपासणं गरजेचं आहे.
- ज्या एटीएममध्ये सुरक्षिततेसाठी व्हिडिओ कॅमेरे किंवा सीसीटीव्ही कॅमेरे नसतील अशा एटीएमचा वापर टाळावा. सीसीटीव्ही बसवलेल्या ठिकाणीही फसवणुका झाल्याची अनेक प्रकरणं आधी घडली आहेत. त्यामुळे कॅमेरे नसलेल्या एटीएममध्ये जाणं टाळायला हवं.
- एटीएम फसवणुसह इतर अशाप्रकारच्या कोणत्याही सायबर फसवणुकीचा आपण बळी पडल्यास तत्काळ 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करावा किंवा cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी.