जेव्हा तुम्ही बँक खाते उघडता तेव्हा तुम्हाला एटीएम कार्ड देखील मिळते. ज्याद्वारे तुम्ही ऑनलाइन पेमेंटपासून रोख पैसे काढण्यापर्यंतचे काम करू शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का? की पैसे काढण्याव्यतिरिक्त तुमच्या एटीएम कार्डचा (ATM Card) तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला पैसे काढण्याव्यतिरिक्त तुमचे एटीएम कार्ड कुठे वापरू शकता ते सांगणार आहोत. तुम्ही तुमच्या एटीएम कार्डवर 5 लाखांपर्यंतचा विमा (Insurance) देखील घेऊ शकता. तुम्हाला एटीएम कार्डवर 25 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचा लाभ मिळतो, ज्याची माहिती सामान्यांना नसते. यामुळे त्यांना हा मोठा फायदा घेता येत नाही. (Insurance on ATM Card) त्याबद्दल जाणून घेऊया.
Table of contents [Show]
कॅटेगरीनुसार विमा मिळतो
तुम्हाला मिळणाऱ्या विम्याची रक्कम कार्डच्या कॅटेगरीवर अवलंबून असते. तुमचे कार्ड क्लासिक कॅटेगरीचे असल्यास, तुम्हाला विमा म्हणून 1 लाख रुपये, प्लॅटिनम कार्डवर 2 लाख रुपये आणि प्लॅटिनम मास्टर कार्डवर 5 लाख रुपये मिळतील. त्याच वेळी, तुम्ही व्हिसा कार्डवर 1.5 ते 2 लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचा दावा करू शकता. त्याचबरोबर मास्टरकार्डवर 50 हजार रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. प्रधानमंत्री जन धन खात्यांवर उपलब्ध असलेल्या रुपे (RuPay) कार्डवर ग्राहकांना 1 ते 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.
25 हजार ते 5 लाखांपर्यंत विमा काढता येतो
खातेदारांना एटीएम कार्डवर 25 हजार रुपयांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचा लाभ मिळतो. हा लाभ सरकारी बँका आणि खाजगी बँकांच्या कार्डवर उपलब्ध आहे. मात्र, तुम्हाला मिळणाऱ्या विम्याची रक्कम तुमच्या एटीएम किंवा डेबिट कार्डच्या कॅटेगरीवर अवलंबून असते. प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या कॅटेगरीतील एटीएम कार्ड जारी करते आणि तुम्हाला प्रत्येक कार्डवर वेगवेगळ्या सुविधाही मिळतात.
असा दावा करू शकता
अपघातात एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 5 लाखांपर्यंतच्या विम्याचा लाभ मिळतो. या विम्याचा दावा करण्यासाठी, कार्डधारकाच्या नॉमिनीला बँकेच्या शाखेत जावे लागेल आणि तेथे भरपाईसाठी अर्ज द्यावा लागेल. बँकेत आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर, नॉमिनीला विमा दावा मिळतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बँकेचे एटीएम कार्ड वापरल्यानंतर 45 दिवसांच्या आत मृत्यू किंवा अपघात झाल्यास, संबंधित व्यक्तीवर अवलंबून असलेला व्यक्ती विमा पॉलिसी अंतर्गत नुकसानभरपाईचा दावा करू शकतो. एटीएम कार्डधारकाचा अपघात झाल्यास त्याला विम्यासाठी दावा करता येतो. यामध्ये दोन्ही हात किंवा पाय गमावल्यास 1 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो. आणि जर मृत्यू झाल्यास नॉमिनीला कार्डच्या कॅटेगरीनुसार 1 ते 5 लाख रुपयांचा विमा मिळतो.
ही कागदपत्रं सादर करावी
- जर एटीएम कार्डधारकाचा अपघात झाला असल्यास विम्याचा दावा करण्यासाठी कार्डधारकाच्या नॉमिनीला बँकेकडे अर्ज करावा लागतो. त्यासोबत अपघाताची एफआयआर प्रत, हॉस्पिटल उपचाराचे प्रमाणपत्र सादर करावे लागतात.
- मृत्यू झाल्यास एटीएम कार्डधारकाच्या नॉमिनीला मृत्यू प्रमाणपत्र, एफआयआर प्रत आदी गोष्टी सादर कराव्यात.
विमा दावा करण्याबाबतच्या अटी
- विम्याचा दावा करण्यासाठी महिन्यातून दोनदा त्या एटीएम कार्डवरुन ट्रान्झॅक्शन होणे गरजेचे आहे.
- बँक अकाऊंटला नॉमिनी असावा.
अधिक माहितीसाठी तुमच्या बँकेला भेट द्यावी.