Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

वॉशिंग मशीन, फ्रिज, टीव्ही किंवा लॅपटॉप घेण्याआधी कोणत्या गोष्टींचा विचार करावा?

वॉशिंग मशीन, फ्रिज, टीव्ही किंवा लॅपटॉप घेण्याआधी कोणत्या गोष्टींचा विचार करावा?

कपडे वॉश करण्यासाठी वॉशिंग मशीन, पदार्थ थंड होण्यासाठी तसेच टिकवून ठेवण्यासाठी फ्रिज, मनोरंजन आणि ज्ञान मिळवण्यासाठी टीव्ही आणि ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप अत्यंत महत्त्वाचा ठरू लागला आहे. या वस्तू खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

वॉशिंग मशीन, फ्रिज, टीव्ही आणि लॅपटॉप ही इलेक्ट्रिक साधने सध्याच्या काळात गरजेची ठरत आहेत. कपडे वॉश करण्यासाठी वॉशिंग मशीन, पदार्थ थंड होण्यासाठी तसेच टिकवून ठेवण्यासाठी फ्रिज, मनोरंजन आणि ज्ञान मिळवण्यासाठी टीव्ही आणि कार्यालयीन कामाच्या निमित्ताने किंवा शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने लॅपटॉप अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. ही उपकरणे खरेदी करण्याआधी जागा, रंग, आकारमान, शैली याशिवाय कोणत्या गोष्टींचा विचार करावा याबाबत माहिती या लेखातून जाणून घ्या. 

वॉशिंग मशीन (Washing Machine)

कपडे धुवण्यासाठी तसेच सुकवण्यासाठी वॉशिंग मशीनचा मोठा वाटा आहे. वॉशिंग मशीन विकत घेतांना लोडींगचा प्रकार अर्थात वजन पेलण्याची क्षमता, मशीन ऑटोमॅटिक हवी की सेमी ऑटोमॅटिक याचा विचार करावा. कुटुंबातील संख्या लक्षात घेऊन कपड्यांची संख्या किती असणार आहे? याचा विचार करून जास्त वजन पेलण्याची क्षमता असणाऱ्या मशीनची निवड करावी. सेमी ऑटोमॅटिक मशीन या ऑटोमॅटिक मशीनच्या तुलनेने स्वस्त असतात. वॉशिंग मशीनच्या आतील ट्यूब ही स्टीलची असावी जेणेकरून ती जास्त वर्ष टिकू शकेल. टॉप लोड वॉशिंग मशीन ही आकाराने उभी असते तर फ्रंट लोड वॉशिंग मशीन आकाराने आडवी असते. फ्रंट लोड वॉशिंग मशीन पाण्याचा वापर कमी करते तर टॉप लोड वॉशिंग मशीनमध्ये जास्त पाणी वापरण्याची सेटिंग उपलब्ध असते. स्पिन सायकल तसेच वॉशिंग सेटिंगची तपासणी करूनच मशीनची खरेदी करावी.

फ्रिज (Fridge)

वेगवेगळे पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी तसेच थंड करण्याच्या दृष्टीने फ्रीजला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक ऋतूमध्ये वापरला जाणारा फ्रीज डबल डोअर, साईड बाय साईड डोअर तसेच सिंगल डोअर मध्ये उपलब्ध असतो. पाणी आणि बर्फ तयार होण्याची क्षमता, इन्वर्टर कॉम्प्रेसर टेक्नॉलॉजी, टेम्परेचर कंट्रोल फंक्शन तसेच कुटुंबाची संख्या आणि वापर लक्षात घेऊन कोणता  फ्रिज विकत घ्यावा याचा विचार करणे गरजेचे आहे. एनर्जी रेटिंगची पाहणी करून फ्रिजची खरेदी करावी. 

टीव्ही (TV)

सध्याच्या काळात टीव्हीची खरेदी करताना अनेक फंक्शन्स आणि तंत्रज्ञान असलेल्या टीव्ही उपलब्ध आहेत. स्मार्ट टीव्ही, एलईडी तसेच 4K अल्ट्रा एचडी असे एक ना अनेक टेलिव्हिजनचे प्रकार अपग्रेड होत आहेत. टीव्हीची खरेदी करताना स्क्रीन साइज, स्क्रीन रेसोल्युशन, रिफ्रेश रेट, कनेक्टीव्हिटी ऑप्शन्स, साऊंड सिस्टम आणि किंमत या गोष्टी विचारात घ्यायला हव्या.

लॅपटॉप (Laptop)

ऑनलाईन क्लासेस, वर्क फ्रॉम होम तसेच कॉलेज-स्कुलच्या प्रोजेक्ट्ससाठी लॅपटॉप महत्त्वाचा दुवा आहे. स्क्रीन साइज, डिस्प्ले टाईप, रॅम अँड रोम तसेच बॅटरी हे मुद्दे लॅपटॉपची खरेदी करतांना लक्षात घ्यावेत. 12 ते 14 इंच आकाराचा लॅपटॉप वापरण्यासाठी उत्तम ठरतो. 512GB स्टोरेज कॅपॅसिटी आणि 8 तासांपर्यंत बॅटरीची क्षमता असणारा लॅपटॉप खरेदी करावा. टच स्क्रीन, वाय-फाय, डिस्प्ले, ग्राफिक्स चीप, यूएसबी पोर्ट या गोष्टी विचारात घेऊन तसेच वापराची आवश्यकता पाहून लॅपटॉप खरेदी करावा.