सेवानिवृत्तीचे नियोजन (Retirement Planning) करताना महिलांना अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागतो. स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी सेवानिवृत्ती संकल्पना समान असलीतरी स्त्रियांचे वयोमान पुरुषांपेक्षा जास्त असते. पण पारंपरिक लिंगभेदामुळे स्त्रियांना अतिरिक्त समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे वयाच्या 65 नंतर पैशांची चणचण स्त्रियांना अधिक जाणवते. युबीएस वेल्थ मॅनेजमेंटच्या एका सर्व्हेक्षणानुसार, बहुतांश विवाहित स्त्रिया घरातील आर्थिक व्यवहार पतीवर सोपवतात. त्यामुळे त्यांच्या हाती आर्थिक अधिकार काहीच राहत नाहीत.
Table of contents [Show]
स्त्रियांना पुरूषांपेक्षा कमी मिळकत!
आजही आपल्याकडे एखाद्या समान कामासाठी महिलांना पुरुषांपेक्षा कमी पगार दिला जातो. यामुळे अर्थातच महिलांची आर्थिक बचत कमी होते आणि त्यामुळे सेवानिवृत्तीसाठी कमी निधी जमा होतो.
मुलांच्या संगोपनासाठी करिअरमध्ये ब्रेक!
एआयजी लाईफ इन्शुरन्स कंपनीने केलेल्या संशोधनानुसार, स्त्रियांना मुलांची काळजी घेण्यासाठी काम सोडावं लागण्याची शक्यता 3 पटीने जास्त असते. स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक काळजीवाहू असल्याने त्यांनाच करिअरमधून विश्रांती घ्यावी लागते. नोकरीमधून विश्रांती घेण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. जसे की, बाळंतपण, घरातील वृद्धांची काळजी घेणे किंवा जोडीदाराची बदली. यामुळे नोकरदार महिलांच्या उत्पन्नात अचानक खंड पडतो. यामुळे अशा महिलांचे आर्थिक प्लॅनिंग अधिक काळजीपूर्वक करणे महत्त्वाचे आहे.
पुरुषांपेक्षा महिलांचे आयुर्मान अधिक
महिलांचे आयुर्मान हे पुरुषांपेक्षा जास्त असते. हे विविध सर्व्हेक्षणातून स्पष्टही झाले आहे. भारतात पुरुषांचे सरासरी आयुर्मान 68.4 वर्षे आणि महिलांचे आयुर्मान 71.1 वर्षे आहे. म्हणजेच महिला जास्त आयुष्य जगतात आणि यासाठी लागणाऱ्या आर्थिक खर्चाची जबाबदारी त्यांनाच पूर्ण करावी लागते. बऱ्याचवेळा नोकरदार स्त्रियाही पैसे सांभाळण्यासाठी किंवा निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी पतीवर अवलंबून असतात. अशावेळी त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांना त्यांचे आर्थिक व्यवस्थापन करणे कठीण होते.
सेवानिवृत्ती बचत
जेव्हा कमी पैसे येतात, तेव्हा सेवानिवृत्तीसाठी बचत करणे किंवा तितकी बचत करणे कठीण होऊ शकते. सेवानिवृत्ती योजनांवर मिळणारे योगदान सामान्यत: एकूण उत्पन्नावर आधारित असते. त्यामुळे कमी उत्पन्न म्हणजे खात्यात कमी पैसे जमा होतात. परिणामी स्त्रियांचे लक्षणीय नुकसान होते.
घरगुती आर्थिक सहभाग
घरगुती आर्थिक व्यवहारात महिलांचा सहभाग हे ही त्यांना अनेक समस्या पासून मुक्त करतात. यूबीएस वेल्थ मॅनेजमेंटच्या सर्वेक्षणातील जवळपास निम्म्या महिलांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या जोडीदाराला आर्थिक बाबींमध्ये पुढाकार घेऊ दिला. लग्नापूर्वीचा त्यांचा हेतू घरच्या आर्थिक व्यवहारातही तितकाच सहभाग असायचा तेव्हाही असेच दिसते.
सामाजिक सुरक्षा उत्पन्न
सामाजिक सुरक्षा हा अनेक सेवानिवृत्तांसाठी उत्पन्नाचा महत्त्वाचा सोर्स आहे; 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या म्हणजे सुमारे 70 टक्के लोकांना सामाजिक सुरक्षा योजने अंतर्गत मदत पुरवली जाते.
सेवानिवृत्ती नियोजन ही संकल्पना प्रत्येकासाठी तितकीच महत्त्वाची आहे. पण महिलांसाठी ती अधिक गरजेची आहे. कारण महिलांना करिअरमध्ये ब्रेक घ्यावा लागतो, वेतनातील फरकामुळे कमी कमाई आणि कमी बचत होते. तसेच महिलांचे आर्युमान पुरुषांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे महिलांना जास्तीत जास्त बचत करणे आवश्यक आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            