जेव्हा ग्राहक एखादे नवीन वाहन खरेदी करतो; तेव्हा कार कंपनीकडून एक वर्षापर्यंत फ्री इन्शूरन्स (Free Insurance) दिला जातो. 1 वर्षानंतर कार मालकाला आपल्या गरजेनुसार इन्श्युरन्स नुतनीकरण (Insurance Renovation) करता येते. नवीन कारला डेप्रिसिएशन कव्हर (Depreciation Cover) देण्यात येतो आणि त्याचा खिशावर पडणारा ताण हा जवळपास शून्यच असतो. हा विमा (Insurance) आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक नुकसानीपासून बचाव करतो. तसेच गाडीच्या एखाद्या पार्टची हानी झाल्यास त्याची भरपाई देखील देतो. मग कोणत्याही प्रकारचे वाहन असो, दुचाकी असो किंवा चारचाकी. झिरो डेप्रिसिएशन कव्हरचे अनेक फायदे आहेत.
डेप्रिसिएशन म्हणजे काय? What is Depreciation?
डेप्रिसिएशन या शब्दाचा शब्दश: अर्थ झिज, असा होतो. गाडीच्या स्पेअर पार्टची कालांतराने झीज होत असते. त्यामुळे कार कितीही चांगल्या पद्धतीने वापरत असलो तरी कारच्या झिजेमुळे तिचे पुर्नविक्री मूल्य किंवा किंमत (Resale Value or Price) देखील कमी होते. त्यामुळे दरवर्षी इन्श्युरन्सचे रिनिव्हल (Insurance Renewal) करताना गाडीच्या किमतीबरोबरच इन्श्युरन्सची रक्कम देखील कमी होते. डेप्रिसिएशन कव्हर केले नाही आणि कारमध्ये नवीन पार्टस् बसवायचे असतील तर त्याचा खर्च इन्श्युरन्स कंपनी उचलत नाही.
झीरो डेप म्हणजे काय? What is Zero Dep?
झीरो डेप कव्हर घेतल्यानंतर कारचे एखाद्या दुर्घटनेत नुकसान होत असेल तर इन्श्युरन्स कंपनी (विमा कंपनी) दाव्याची (Claim) संपूर्ण रक्कम देते. त्यास झीरो डेप कव्हर (Zero Dep Cover) म्हटले जाते.
या गोष्टी लक्षात ठेवा!
- मुख्य इन्श्युरन्स पॉलिसीसह झिरो डेप कव्हर (Zero Dep Cover) जोडल्याने प्रीमियमचा बोजा वाढतो. कव्हरचा प्रीमियम जनरल कार इन्श्युरन्सपेक्षा 20 टक्क्यांनी जास्त महाग असू शकतो.
- झिरो डेप कव्हर (Zero depreciation cover) फक्त नवीन वाहन किंवा 3 वर्षांपेक्षा जुन्या कारवर उपलब्ध आहे. म्हणजेच चौथ्या वर्षापासून तुम्हाला सामान्य विमा पॉलिसी (General Insurance Policy) घ्यावी लागेल.
- झिरो डेप कव्हरमध्ये दाव्याची संख्या (Claim Numbers) मर्यादित असू शकतो. बऱ्याचवेळा लोक लहान-मोठ्या क्लेमसाठीसुद्धा दावे दाखल करतात. त्यामुळे एका वर्षात किती क्लेम केले जाऊ शकतात, याची माहिती घेणं गरजेचं आहे.
- कार विकत घेतल्यानंतर त्याची वर्षे जसजशी वाढत जाईल, त्यानुसार क्लेमच्या तुलनेत प्रीमियमची रक्कमसुद्धा वाढेल.
नवीन कार असेल तर आपल्याला झिरो डेप्रिसिएशन कार इन्श्युरन्सचा (Zero Depreciation Car Insurance) पर्याय मिळतो. पण झीरो डेप कव्हरला इन्शुरन्स पॉलिसीसोबत अॅड ऑन (Add-on with Zero Dep Cover Insurance) केल्यास इन्श्युरन्सचा हप्ता काही प्रमाणात वाढतो.