• 03 Oct, 2022 22:56

अमेरिका आणि ब्रिटनमध्ये कार इन्श्युरन्सचा प्रिमियम किती असतो?

car insurance

कार इन्श्युरन्स देताना विमा कंपन्यांकडून अनेक गोष्टी तपासल्या जातात; यात बऱ्याच गोष्टींचा समावेश होत असल्याने कार इन्श्युरन्सची सरासरी किंमत बदलते.

अमेरिकेतील वाहनचालक प्रत्येक वर्षी कार इन्श्युरन्ससाठी अंदाजे 1,771 ते 545 डॉलर (भारतीय चलनात 1,40,595 ते 43,304 रूपये) म्हणजे प्रत्येक महिन्याला किमान 148 डॉलर (11,745 रूपये) खर्च येतो. तर ब्रिटनमध्ये सरासरी एका वर्षाला कार इन्श्युरन्ससाठी 416 पाऊंड (भारतीय चलनात 39,533 रूपये) खर्च येतो. पण कार इन्श्युरन्स देताना विमा कंपन्यांकडून अनेक गोष्टी तपासल्या जातात. यात बऱ्याच गोष्टींचा समावेश होत असल्याने कार इन्श्युरन्सची सरासरी किंमत बदलते.

कार इन्श्युरन्सची सरासरी किंमत काढण्यासाठी विविध घटकांची माहिती करून घेणं आवश्यक आहे. जसे की, इन्श्युरन्स काढायचा आहे ते राज्य, इन्श्युरन्स कंपनी, वाहन चालकाचे वय, त्याचा ड्रायव्हिंग रेकॉर्ड इत्यादी घटकांचा समावेश असू शकतो. अमेरिकेमध्ये एका अहवालानुसार, 2022 मध्ये एका कारच्या संपूर्ण कव्हरेजसाठी प्रत्येक वर्षाला 1771 डॉलर खर्च येऊ शकतो. पण इथे बऱ्याचवेळा कार इन्श्युरन्स हा वैयक्तिक घटकांवर आधारित असल्यामुळे वाहनचालकानुसार त्याची कमी-जास्त होऊ शकते.

महिलांच्या तुलनेत पुरूषांचा विमा महाग !

अमेरिकेत पूर्ण कव्हरेज असलेल्या कारच्या विम्याची किंमत प्रत्येक वर्षी कमाल 1771 आणि किमान 545 डॉलर असू शकते. USAA, Geico आणि Erie या विमाकंपन्या स्वस्तात इन्श्युरन्स देतात. पण त्या सर्व ड्रायव्हर्ससाठी लागू नाहीत. तरूणींच्या तुलनेत तरूणांसाठी कार विमा तुलनेने जास्त आहे. तसेच तुमच्या कार रेकॉर्डमध्ये काही गंभीर गुन्हे दाखल असतील तर तुमचा प्रीमियम वाढ शकतो.

ब्रिटनमध्ये साधारणपणे कार इन्श्युरन्सची सरासरी किंमत 2022 च्या पहिल्या तीन महिन्यांसाठी £416 (39,533 रूपये) होती. पण तरीही वाहनचालकाचे वय, तुमचे राज्य, गाडीची किंमत, तसेच कार कशी वापरली जाते, यानुसार विम्याच्या किमती बदलतात. डिलिव्हरी आणि कुरिअर सर्व्हिससाठी वापरल्या जाणाऱ्या एका कारमागे वर्षाला 2000 युरो (1,90,222 रूपये) खर्च करावा लागू शकतो.