Bank locker rules : तुम्ही बँक लॉकर घेण्याचा विचार करत असाल तर त्याची प्रोसेस तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इतरही माहिती असणे महत्वाचे ठरते. त्याचा फायदा कसा घेतला जाऊ शकतो आणि त्याच्याशी संबंधित नियम काय आहेत? याबाबत माहिती जाणून घेऊया. सर्वप्रथम, तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या लॉकर नियमांबद्दल माहित करून घ्या.
1 जानेवारी 2023 रोजी नवीन वर्षाची सुरुवात होताच रिझर्व्ह बँकेने लॉकरशी संबंधित नियम बदलले आहेत. हा नियम लागू झाल्यानंतर बँकांना लॉकरबाबत ग्राहकांशी कसेही वागून चालणार नाही. लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूचे खूप नुकसान झाले तर त्याची जबाबदारी आता बँकेची असणार आहे. याशिवाय आता ग्राहकांना बँकेसोबत करार करावा लागणार आहे. याद्वारे ग्राहकांना लॉकरच्या नियमांमध्ये झालेल्या बदलाची माहिती एसएमएस आणि इतर माध्यमातून बँकेला द्यावी लागेल.
तुम्ही लॉकर कसे मिळवू शकता?
तुम्हाला ज्या शाखेत लॉकर उघडायचे आहे तेथे अर्ज करावा लागेल. प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा या तत्त्वावर लॉकर सुविधा उपलब्ध करून देते. तुमचे नाव वेटिंग लिस्टमध्ये असल्यास, बाकी एखाद्या युजर्सने लॉकर सोडल्यानंतर तुम्हाला लॉकर मिळू शकते. यासाठी बँक खात्यात किमान रक्कम असणेही आवश्यक असून खात्यातून वार्षिक रेंट आकारले जाते.
लॉकर फी किती असू शकते?
लॉकरचा आकार आणि स्थान यावर अवलंबून, त्याचे वार्षिक शुल्क देखील निश्चित केले जाते. हे सर्व बँकांमध्ये भिन्न असू शकते. SBI मध्ये बँक लॉकरचे शुल्क 2 हजार ते 12 हजारांपर्यंत आहे. बँक लॉकरसाठी PNB 1250 ते 10 हजार रुपये आकारते. कॅनरा बँकेत हे शुल्क 2 हजार ते 10 हजारांपर्यंत आहे. एचडीएफसीमध्ये हे शुल्क 3 हजार ते 20 हजारांपर्यंत आहे. आयसीआयसीआय बँकेत, हे शुल्क 1200 रुपयांपासून सुरू होते आणि 5000 रुपयांपर्यंत जाते.
बँक कोणत्या परिस्थितीत भरपाई देते?
आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, बँकेच्या निष्काळजीपणामुळे लॉकरमध्ये ठेवलेल्या सामग्रीचे काही नुकसान झाल्यास, बँकेला त्याची भरपाई द्यावी लागेल. ज्या जागेत सेफ डिपॉझिट व्हॉल्ट्स ठेवल्या जातात त्या जागेच्या सुरक्षेसाठी सर्व पावले उचलणे ही बँकांची जबाबदारी आहे. बँकेच्या कर्मचार्यांनी केलेल्या फसवणुकीमुळे नुकसान झाल्यास, बँकेचे दायित्व लॉकरच्या वार्षिक रेंटच्या 100 पटपर्यंत असेल.
Source : hindi.news18.com