Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank Locker New Rules: बँक लॉकरबाबत RBI चा नवीन नियम, फक्त 'या' वस्तू लॉकरमध्ये ठेवता येणार

Bank Locker

Image Source : http://www.dnaindia.com/

Bank Locker New Rules: बँक लॉकरमध्ये कोणत्या गोष्टी ठेवता येणार याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियम तयार केले आहे. रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे की बँकांना आता त्यांच्या ग्राहकांसोबत लॉकर भाड्याने देण्याच्या करारामध्ये बदल करावे लागतील. त्यामध्ये सांगितले जाईल की, कोणत्या वस्तु लॉकरमध्ये ठेवता येईल आणि कोणत्या वस्तु ठेवता येणार नाही.

Bank Locker New Rules: आपल्यापैकी बरेच जण दागिन्यांपासून ते महत्त्वाच्या कागदपत्रांच्या सुरक्षिततेसाठी बँक लॉकर वापरतात. तुम्ही देखील बँक लॉकर वापरत असाल किंवा वापरण्याच्या विचार करत असाल तर त्याबाबत असलेले सर्व नियम तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. बँक लॉकरमध्ये कोणत्या गोष्टी ठेवता येणार याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियम तयार केले आहे. रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे की बँकांना आता त्यांच्या ग्राहकांसोबत लॉकर भाड्याने देण्याच्या करारामध्ये बदल करावे लागतील. त्यामध्ये सांगितले जाईल की, कोणत्या वस्तु लॉकरमध्ये ठेवता येईल आणि कोणत्या वस्तु ठेवता येणार नाही. 

आरबीआयच्या नवीन नियमांनुसार 

आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, आता ग्राहकांना बँक लॉकरमध्ये केवळ दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे यासारख्या कायदेशीर वैध वस्तू ठेवता येणार आहेत. बँकेसोबतच्या करारात ग्राहकाला कोणत्या प्रकारचा माल ठेवण्याची परवानगी आहे आणि कोणती नाही, या डिटेल्स सांगितल्या जातील. एवढेच नाही तर बँकेचे लॉकर आता फक्त ग्राहकांना त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी दिले जाणार आहेत. ते दुसऱ्याला देता येणार नाही. 

इंडियन बॅंक असोसिएशन एक मॉडेल करार करणार आहे. या आधारे बँका त्यांच्या ग्राहकांशी करावयाचे करार तयार करतील. बँकेच्या सध्याच्या लॉकर ग्राहकांच्या कराराच्या नूतनीकरणासाठी स्टॅम्प पेपरचा खर्च बँक उचलेल. तर इतर ग्राहकांना बँक लॉकर घेताना कराराच्या स्टॅम्प पेपरची किंमत मोजावी लागेल.

अवैध वस्तु लॉकरमध्ये ठेवता येणार नाही

अनेक लोक त्यांच्या बँक लॉकरमध्ये अशा वस्तू ठेवतात ज्या कायदेशीर वैध नाहीत. कधीकधी ते हानिकारक देखील असते. आता आरबीआयने हेही स्पष्ट केले आहे की, ग्राहक त्यांच्या लॉकरमध्ये कोणत्या वस्तू ठेवू शकत नाहीत. ग्राहकांना लॉकरमध्ये रोख किंवा विदेशी चलन ठेवता येणार नाही, असे केंद्रीय बँकेकडून सांगण्यात आले आहे. यासोबतच शस्त्रे, ड्रग्ज किंवा औषधे (Weapons, Drugs or Medicines) तसेच धोकादायक किंवा विषारी वस्तू ठेवण्यास बंदी असणार आहे.

बँकेचे काही नवीन नियम

पासवर्ड किंवा बँकेच्या लॉकरच्या चावीचा गैरवापर किंवा बेकायदेशीर वापर झाल्यास बँक जबाबदार राहणार नाही. त्याची जबाबदारी फक्त ग्राहकाची असेल. ग्राहकाला त्याचे सामान लॉकरमध्ये ठेवण्याचा अधिकार असेल. बँकेला त्याचे संरक्षण करावे लागेल आणि जर बँकेने तसे केले नाही तर या संदर्भात वेळोवेळी नियमांनुसार ग्राहकाला नुकसान भरपाई द्यावी लागेल.