PNB Bank Put No Penalty On Premature FD: पीएनबी म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेच्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या सुगम मुदत ठेव एफडी योजनेच्या अंतर्गत गुंतवणूकदारांनी एफडी काढल्यानंतर, कुठल्याही कारणाने त्यांच्यावर एफडी तोडण्याची वेळ आल्यास, त्यांच्याकडून कोणताही दंड आकारला जाणार नाही. अन्य बँकांमध्ये मुदतीपूर्वी एफडी तोडल्यास किंवा वेळेपूर्वी ठेव काढून घेतल्यास बँका ग्राहकांकडून सरासरी एक टक्का किंवा त्याहून अधिक दंड वसुल करतात.
Table of contents [Show]
कमाल गुंतवणूक मर्यादा 10 लाख
पंजाब नॅशनल बँक सुगम मुदत ठेव योजनेतील गुंतवणूकदारांनी मुदतपूर्व पैसे काढल्यास कोणताही दंड किंवा शुल्क आकारणार नाही. PNB तिच्या ठेवीदारांना मुदतपूर्तीपूर्वी कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी देते. PNB ने अलीकडेच जाहीर केले की, PNB सुगम मुदत ठेव योजनेंतर्गत प्रति ग्राहक कमाल गुंतवणूक मर्यादा 10 लाख रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दंड आकारला जाणार नाही
पीएनबी सुगम मुदत ठेव योजनेच्या मुदतीपूर्वी पैसे काढण्यावर कोणताही दंड आकारला जाणार नाही. अंशतः पैसे काढण्यांतर्गत, गुंतवणूकदारांनी प्रति व्यवहार 1000 रुपयांचा किमान व्यवहार केल्यास, त्यांना हा लाभ मिळेल. PNB च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, FD ठेव पावतीचे मूल्य (मूळ रक्कम) त्यानुसार कमी केले जाईल. जर एखाद्या गुंतवणूकदाराला मुदतपूर्तीपूर्वी संपूर्ण ठेव रक्कम काढायची असेल, तर कोणताही दंड आकारला जाणार नाही.
काय आहे व्याजदर
PNB सुगम फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याज दर ठेव रकमेच्या आधारावर आणि कालावधीवर आधारित आहे. बँकेकडे 3 ठेवी रकमेचे पॅकेजेस आहेत. ज्यात 2 कोटींपेक्षा कमी ठेवी, 2 कोटी ते 10 कोटी रुपयांच्या ठेवी आणि 10 कोटी ते 100 कोटीं रुपयांच्या ठेवी पेक्षा कमी ठेवींचा समावेश आहे. गुंतवणूकदार हे लक्षात ठेवू शकतात की, ठेव अंशतः काढल्यामुळे रकमेमध्ये बदल झाल्यास, ठेवीच्या नवीन रकमेच्या एफडीला लागू होणारा व्याज दर पैसे काढण्याच्या तारखेपासून लागू होईल. PNB सुगम मुदत ठेव व्याज दर वेगवेगळ्या कालावधीनुसार आहे, जो 4.50 टक्के ते 7.25 टक्के निश्चित आहे. PNB सुगम FD च्या 666 दिवसांच्या कार्यकाळावर, बँक सामान्य नागरिकांना 7.25 टक्के व्याज दर आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याजदर देत आहे.
व्याज चक्रवाढ आणि तिमाही आधारावर
पीएनबी सुगम मुदत ठेवीच्या गुंतवणूकदाराकडे व्याजाची रक्कम मासिक, त्रैमासिक किंवा मुदतपूर्तीवर काढण्याचा पर्याय आहे. बँकेत ठेवीचा कालावधी 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर व्याज चक्रवाढ आणि तिमाही आधारावर दिले जाते.