कारमध्ये असणारं आरपीएम (Revolutions per minute) मीटर अनेक अर्थानं महत्त्वाचं आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊ... तुम्हाला तुमच्या वाहनाच्या डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर सर्वात आधी जावं लागेल. त्याठिकाणी तुम्हाला 1 ते 8 पर्यंतचे आकडे दिसतील. त्यावेळी तुमच्या लक्षात येईल, की मीटरवरचं (Meter) 1 रीडिंग म्हणजे 1000 आरपीएम, 2 म्हणजे 2000 आरपीएम आणि 3 म्हणजे 3000 आरपीएम.
आरपीएम महत्त्वाचं का?
मॅन्युअल ट्रान्समिशन वाहनं आणि नवीन ड्रायव्हर्ससाठी हे आरपीएम मीटर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. स्वयंचलित वाहनांमध्ये (Automatic vehicles) आपोआपच कॅलक्यूलेशन होतं, की किती स्पिन आणि किती रोटेशन होत आहेत. ट्रान्समिशन किंवा गियर त्यानुसार नियंत्रित (Control) केलं जातं. जर तुम्ही मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये नवीन ड्रायव्हर असाल तर ते तुम्हाला अंदाज देतं, की तुम्ही कोणत्या गियरमध्ये गाडी चालवावी.
आरपीएम कसं असावं?
तुम्ही तुमच्या वाहनानं प्रवास करत असाल तर नेमकं आरपीएम प्रमाण कसं असावं, हे माहीत असणं गरजेचं आहे. चला पाहू... आयडियल रोटेशन 650 ते 1000 आरपीएमच्या दरम्यान असतं. 1000 ते 2000 आरपीएम म्हणजे तुम्ही पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या गियरमध्ये गाडी चालवू शकता. 1500 ते 3000 आरपीएम हे हायर गियरसाठी असतं. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर कमी वेग, कमी गियर आणि कमी आरपीएम. तर जास्त स्पीड, हायर गियर आणि हायर आरपीएम असतं.
...तर इंजिनचं नुकसान
समजा तुम्ही कमी गियरमध्ये गाडी चालवत असाल आणि तुम्ही अचानक गाडीचा वेग वाढवला तर गाडीचा आरपीएम वाढणार आहे. तो 6, 7 आणि 8पर्यंतदेखील पोहोचू शकतो. आता होतं असं, की तुम्ही कमी गिअरमध्ये गाडी चालवत आहात आणि तुम्ही वेग वाढवला पण गिअर बदलला नाही तर तुमच्या इंजिनचं नुकसान होऊ शकतं.