Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Scholarship Vs Fellowship: स्कॉलरशिप आणि फेलोशिप या दोन्हीमध्ये काय फरक आहे?

Difference between Scholarship Vs Fellowship

Scholarship Vs Fellowship: स्कॉलरशिप आणि फेलोशिप या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळवून देणारे पर्याय हे एकमेकांपासून खूप वेगळे आहेत. त्यामुळे या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे आणि त्यातील तुम्हाला कोणता पर्याय योग्य ठरू शकतो. हे जाणून घेण्यासाठी त्याच्यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे.

Scholarship Vs Fellowship: सध्याचे शिक्षण खूपच महागडे झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांना चांगले, गुणात्मक शिक्षण घ्यायचे आहे; त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे मात्र घेता येत नाही. बरेच विद्यार्थी निव्वळ घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे उच्च  शिक्षण घेता येत नाही. अशा गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील दोन महत्त्वाचे पर्याय म्हणजे स्कॉलरशिप आणि फेलोशिप. या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे आणि त्याची पद्धत कशी आहे, हे आपण समजून घेणार आहोत.

स्कॉलरशिप आणि फेलोशिप या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळवून देणारे पर्याय हे एकमेकांपासून खूप वेगळे आहेत. त्यामुळे या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे आणि त्यातील तुम्हाला कोणता पर्याय योग्य ठरू शकतो. हे जाणून घेण्यासाठी त्याच्यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे.

स्कॉलरशिप म्हणजे काय? What is Scholarship?

स्कॉलरशिप म्हणजे आर्थिक मदत किंवा एखाद्या गुणवान विद्यार्थ्याला शिक्षणासाठी केली जाणार मदत. ज्या विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे. त्याला मार्कस् चांगले मिळतात आणि भविष्यात त्याला अजून चागले शिक्षण घ्यायचे आहे. अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. स्कॉलरशिप शैक्षणिक संस्था देखील देतात. जसे की, शाळा, कॉलेज आणि विद्यापीठे. स्कॉलरशिप या खासगी आणि सरकारी अशा दोन्ही प्रकारच्या संस्थांमधून दिली जाते. स्कॉलरशिप देण्याचे प्रत्येक संस्थेचे, शाळेचे, विद्यापीठाचे आपापले नियम असतात.

अशाच पद्धतने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शाळा, कॉलेज आणि युनिव्हर्सिटीकडून स्कॉलरशिप दिल्या जातात. या स्कॉलरशिपच्या माध्यमातून दिली जाणारी रक्कम ही पूर्णपणे विद्यार्थ्याची पात्रता, शैक्षणिक गुणवत्ता यावर आधारित दिली जाते. काही स्कॉलरशिमधून विद्यार्थ्यांची ट्यूशन फी, राहण्याचा खर्च, प्रवास आणि इतर शिक्षणाशी संबंधित खर्च दिले जातात.

स्कॉलरशिपचे बरेच प्रकार उपलब्ध आहेत. जसे की, एज्युकेशनल (शैक्षणिक), स्पोर्ट्स (खेळ) आणि इतर कोट्यांमधून स्कॉलरशिप दिली जाते. जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जातात. त्यांच्यासाठी स्कॉलरशिप खूप महत्त्वाची ठरते. ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थितीत चांगली नाही. त्या विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपचा फायदा होतो. शैक्षणिक गुणवत्ता आणि अभ्यासाशी निगडित इतर गोष्टींमधील सहभाग हा स्कॉलरशिप मिळवण्यासाठी एकमेव मार्ग आहे.

फेलोशिप म्हणजे काय? What is Fellowship?

फेलोशिप ही गुणवान विद्यार्थ्यांना दिली जाते. शिष्यवृत्ती आणि स्कॉलरशिप या वेगवेगळ्या आहेत. फेलोशिपमध्ये ही एका विषयाचे सखोल संशोधन किंवा पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते. यामध्ये एक ठराविक रक्कम दिली जाते. त्या रकमेचा उपयोग फेलोशिपमधील संशोधनासाठी करणे अपेक्षित असते. फेलोशिप ही फक्त शैक्षणिक कार्यापुरती मर्यादित असते. यामध्ये पगार किंवा नोकरी याचा काहीही संबंध नसतो.

बहुतांश फेलोशिप या पदवीचे शिक्षण झाल्यानंतर दिल्या जातात. जे विद्यार्थी संशोधन करून, मेहनतीने शिक्षण क्षेत्रात किंवा त्या संबंधित क्षेत्रामध्ये नवीन भर घालतात. यासाठी त्यांना आर्थिक स्वरूपात किंवा त्यांना अभ्यासासाठी उपयोग पडेल अशा वस्तुच्या रुपातही फेलोशिप दिली जाते. पीएचडी हा फेलोशिप प्रोग्रॅमचा एक भाग आहे. पीएचडीमध्ये अभ्यासक स्वत:च्या इच्छेने आणि स्वत:च्या उद्देशांसाठी संशोधन करत असतो. हेच जर त्या संशोधकाने इतरांसाठी किंवा एका संस्थेसाठी, विद्यापीठासाठी केले तर त्या बदल्यात ती संस्था, विद्यापीठ त्या संशोधकाला/विद्यार्थ्याला फेलोशिप ऑफर करते.

फेलोशिपचे प्रामुख्याने दोन महत्त्वाचे प्रकार पडतात. एक डॉक्टरेट किंवा पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप आणि दुसरी मेडिकल फेलोशिप. डॉक्टरेट किंवा पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप ही एखाद्या विषयात सखोल संशोधन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्याना दिली जाते. तर मेडिकल फेलोशिप ही मेडिकल फील्डमधील विद्यार्थ्यांना दिली जाते. ज्यांनी आपला मेडिकलमधील अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि पुढे एका विशिष्ट विषयात सखोल संशोधन करून त्यातून नवीन उत्पादनाचा शोध घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते.

फेलोशिप आणि शिष्यवृत्तीमधील फरक

शिष्यवृत्ती

फेलोशिप

हुशार आणि गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक स्वरूपाद दिल्या जाणाऱ्या मदतीला स्कॉलरशिप म्हटले जाते.

फेलोशिप ही एका विषयामध्ये सखोल संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून दिली जाते.

शिष्यवृत्तीमध्ये विशेषकरून शैक्षणिक खर्चाची रक्कम दिली जाते. 

फेलोशिपमध्ये सूक्ष्म संशोधन करण्यासाठी उपयोगी पडेल या पद्धतीने आर्थिक मदत केली जाते. 

स्कॉलरशिप ही शाळा, कॉलेज आणि विद्यापीठ स्तरावर लागू होते.

फेलोशिप ही फक्त पदवीनंतरच्या अभ्यासक्रमावर आधारित दिली जाते. विशेषकरून पदव्युत्तर, डॉक्टरेट आणि पोस्ट-डॉक्टरेट अभ्यासक्रमासाठी दिली जाते.

गरजू आणि आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळावे. यासाठी स्कॉलरशिप दिली जाते. 

फेलोशिपमधून दिली जाणार आर्थिक मदत ही शिक्षण व्यवस्थेच्या कल्याणासाठी दिली जाते. त्याचा उपयोग त्या क्षेत्राच्या विकासासाठी होणे अपेक्षित आहे.

अशाप्रकारे स्कॉलरशिप आणि फेलोशिप दोन्हींमध्ये फरक आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रकारची मदत अपेक्षित आहे. त्यानुसार तुम्ही तुमच्या निवडीनुसार स्कॉलरशिप किंवा फेलोशिपसाठी अर्ज केला पाहिजे.