The price of important coins in the crypto market is falling: क्रिप्टो नाण्यांमधील सर्वात विश्वासार्ह नाणे बिटकॉईन (Bitcoin) आणि इथरियम (Ethereum) या दोघांचा दर घसरला असून, एकूणच बाजारात घसरण दिसून आली आहे. मात्र द इंटरनेट कम्युटर (The Internet Computer) या नाण्याच्या दरात मागील चोवीस तासांमध्ये सर्वाधिक 3.83 टक्के एवढी वाढ झाली आहे. तर मागील आठवड्यात जास्त दर मिळवणारे नाणे सोलाना (Solana) हे 8.31 टक्क्यांनी घसरले आहे.
जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप 796.13 बिलियन युएस डॉलरवर होते. मागील चोवीस तासांत 0.76 टक्क्यांची घसरण झाल्याचे नोंदवण्यात आले आहे.
आजच्या क्रिप्टोकरन्सींच्या किंमती Cryptocurrency Prices Today -
- बिटकॉईन (Bitcoin): क्रिप्टोमधल्या या महत्त्वाच्या नाण्याची किंमत 29 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता 16 हजार 580.44 युएस डॉलर एवढी किंमत होती. मागील चोवीस तासात या नाण्याच्या किंमतीत 0.53 टक्के घसरण झाली आहे. भारतीय क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज प्लॅटफॉर्म वझीरएक्सनुसार (WazirX), आज बिटकॉईनचा दर 14.14 लाख एवढा आहे.
- इथरियम (Ethereum): या विश्वासार्ह क्रिप्टो नाण्याच्या किंमतीत मागील चोवीस तासांमध्ये 0.23 टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सतत काही अंशांनी वाढत असलेली या नाण्याची किंमत आज घसरली आहे. या नाण्याची किंमत आज सकाळी 10 वाजता 1 हजार 195.93 युएस डॉलर किंमतीवर ट्रेड करत होती. वझीरएक्सनुसार (WazirX), आज या नाण्याचा भारतीय दर 1.02 लाख एवढा आहे.
- डॉजकॉईन (Dogecoin): या नाण्याची किंमत 0.07074 युएस डॉलरवर सकाळी 10 वाजता ट्रेड करत होती. या नाण्याचा दर मागील चोवीस तासात 1.28 टक्क्यांनी घसरला आहे. वझीरएक्सनुसार (WazirX), भारतातील डोजकॉईनची किंमत 6.1439 रुपये एलढी आहे.
- लाइटकॉईन (Litecoin): मागील चोवीस तासांमध्ये या नाण्याच्या दरात 2.96 टक्क्यांनी घट झाली आहे. दोन दिवसांपूर्वी या नाण्याच्या दरात वाढ झाल्यावर, गुंतवणुकदारांनी लगेचच नाणी विकली ज्यामुळे पुन्हा दर खाली घसरला आहे. तर या नाण्याची किंमत 66.48 युएस डॉलर होती. भारतात या नाण्याची किंमत 5 हजार 800 रुपये आहे.
- रिपल (Ripple): या नाण्याची किंमत सकाळी 10 वाजता 0.3454 युएस डॉलर होती. तर मागील चोवीस तासात या नाण्याची किंमत 4.64 टक्क्यांनी घटला आहे. वझीरएक्सनुसार (WazirX), भारतात या नाण्याची किंमत 29.5201 रुपये एवढी आहे.
- सोलाना (Solana): या नाण्याच्या किंमतीत मागील चोवीस तासांत 8.31 टक्क्यांची घसरण झाली असून, याची किंमत 9.74
युएस डॉलर एवढी आहे. तर याची भारतीय किंमत 855 रुपये एवढी आहे.